सचिन तेंडुलकरच्या मुलाला(arjun tendulkar) मिळणार IPL मध्ये जागा, काय म्हणाला रोहित शर्मा

अर्जुन तेंडुलकर(arjun tendulkar) आयपीएलच्या गेल्या दोन हंगामात मुंबई इंडियन्स संघाचा भाग आहे, परंतु त्याला आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळालेली नाही.
आज आयपीएल 2023 मध्ये, मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर हे दोन्ही संघ या हंगामातील पहिला सामना खेळणार आहेत.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आयपीएलमध्ये पदार्पण करू शकतो. आयपीएल (IPL 2023) सुरू होण्यापूर्वी आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान मुंबई संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक (MI कोच) मार्क बाउचर यांनी अर्जुन तेंडुलकरबद्दल मोठे वक्तव्य केले.
रोहित शर्माने म्हटले आहे की व्यवस्थापन अर्जुनवर लक्ष ठेवून आहे आणि त्याला यावर्षी प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते. सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर गेल्या दोन हंगामांपासून मुंबई इंडियन्स संघाचा भाग आहे. मात्र, अर्जुनने अद्याप आयपीएलमध्ये पदार्पण केलेले नाही.
अर्जुन तेंडुलकर दोन्ही हंगामात बेंचवर होता. त्यामुळे अर्जुनला यंदा आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळेल का? याबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक मार्क बाउचर यांना याबाबत विचारले असता त्यांनी अर्जुनने गोलंदाजीत चांगली कामगिरी केली असल्याचे सांगितले. गोलंदाज म्हणून त्याला संघात संधी दिली जाऊ शकते.
अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा
updates a2z