आजचे नवीन कृषी अपडेट्स शेतकऱ्यांना होईल हा फायदा

आजचे नवीन कृषी अपडेट्स शेतकऱ्यांना होईल हा फायदा

 

 

 

 

अतिवृष्टी पीकविमा नुकसान भरपाई शासनाने आधीच जाहीर केलेली आहे. शासन हे शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत असतो आम्ही असेच शासनाने घेतलेल्या निर्णय तुम्हाला सांगू.

 

प्रत्येक जिल्ह्यात एकाच दिवशी 75 हजार लाभार्थ्यांना लाभ देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. सरकारने असा महसंकल्प केला आहे. शासनाने योजनांची जत्रा अस या अभियानाला नाव दिले आहे. सर्व शासकीय योजनांचे लाभार्थी असणाऱ्यांना व्यक्तीला एकाच छताखाली लाभ मिळणार आहे.

 

बौद्ध व नवबौध्द समाजातील बचत गटांना ट्रॅक्टर घेण्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे. त्यात शासन त्यांना 90 टक्के अनुदान देणार आहे. त्यांना शेतीची उपकरणे घेण्यासाठी अनुदान मिळणार आहे. 9 ते 18 हॉर्स पावर चा ट्रॅक्टर आणि त्याची साधने घेण्यासाठी अनुदान मिळणार आहे.

 

आनंदाचा शिधा या उपक्रमाला दिवाळीत चांगला प्रतिसाद मिळाला असता शासनाने आता पुन्हा गुढी पाडवा आणि बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आनंदाचा पुन्हा 8 दिवस वाटप करणार आहे.

 

PM किसान संमान योजना ही देशात शेतकऱ्यांसाठी चालवली जाणारी सर्वात मोठी योजना आहे मोदी सरकारने ही योजना 2018 मध्ये सुरू केली होती. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याला काही अटींची पूर्तता करावी लागते. सरकारने शेतकऱ्यांना eKYC करणे बंधनकारक केले आहेत. eKYC केली नाही तर शेतकऱ्यांना 2000 रुपयाचं हप्ता मिळणार नाही म्हणून शेतकऱ्यांनी eKYC करून घ्यावी.

 

तसेच eNAM पोर्टल ला 7 वर्ष पूर्ण झाली आहेत. या पोर्टल मुळे शेतकऱ्यांना मंडई मध्ये माल पोहचवणे सहज शक्य होत आहे. सर्व बाजारपेठ साठी हे पोर्टल उपयुक्त आहे.

updates a2z