१२ वी कॉमर्स नंतरचे सर्वोत्तम करियर पर्याय.

१२ वी कॉमर्स नंतरचे सर्वोत्तम करियर पर्याय. Best career option after 12th commerce.

१२ वी कॉमर्स नंतरचे सर्वोत्तम करियर पर्याय.

दहावी आणि बारावी नंतर प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांच्या मनात पडणारा एक कॉमन प्रश्न; म्हणजे आता पुढेअसलेले काय? १२ वी कॉमर्स नंतरचे सर्वोत्तम करियर पर्याय कोणते? हा प्रश्न प्रत्येक कॉमर्स च्या विद्यार्थ्याला पडणे साहजिक आहे.

दहावी नंतर कोणतीही शिक्षण शाखा निवडताना, आपली आवड आणि आपण भविष्यात करणार असलेले करियर यांचा विचार करूनच शाखा निवडत असतो.

यामध्ये तुम्ही जर बारावी साठी कॉमर्स निवडले असेल तर, यातही तुम्हाला उत्तम करियर आणि भरपूर पगाराच्या नोकऱ्या  मिळवून देण्याची क्षमता आहे. कारण कॉमर्स च्या विध्यार्थ्याचं सुद्धा भविष्य उज्ज्वल आहे.

१२ वी कॉमर्स नंतरचे सर्वोत्तम करियर पर्याय कोणते? याबाबत अनेक विद्यार्थी अनभिज्ञ असतात. बऱ्याच जणांचा असा गैरसमज झालेला असतो, कि १२ वी कॉमर्स नंतर बी.कॉम. व्यतिरिक्त दुसरा पर्याय आहे की नाही.

परंतु तुमच्या करियर हि सुरुवात करण्यासाठी कॉमर्स हि एक उत्तम शाखा आहे. कारण या शाखेत असंख्य व्यावसायिकअभ्यासक्रमांचा समावेश आहे.

कॉमर्स मध्ये उत्तम करियर पर्याय शोधण्यासाठी, आज आपण १२ वी कॉमर्स नंतरचे सर्वोत्तम करियर पर्याय कोणते या विषयी सविस्तर माहिती पाहू.

१ ) बी.कॉम.

कॉमर्स शाखेतून बारावी उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांसाठी बी. कॉम. हा तीन वर्षांचा पूर्णवेळ पदवी अभ्यासक्रम आहे. १२ वी कॉमर्स नंतर सर्वोत्तम करियर पर्याय म्हणून असंख्य विद्यार्थी बारावी नंतर या पदवीला पसंती देतात.

जवळपास देशातील सर्वच मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून या विद्या शाखेमधील अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

कॉमर्स मधील

प्रतिष्ठित व सर्वोच्च पगाराच्या नोकऱ्या देणारे कोर्स

येथे क्लिक करून पहा.

अर्थशास्त्र, सांखिकी, मानव संसाधन, लेखा आणि संगणक अनेक अभ्यासक्रम यात समाविष्ट आहेत. शासकीय तसेच खासगी क्षेत्रात सुद्धा, उत्तम पगाराच्या नोकऱ्या या बी.कॉम. पदवी धारकांना मिळू शकतात.

 

२ ) बॅचलर ऑफ बँकिंग अँड इन्शुरन्स (B.B.I.)

जर तुम्हाला बँकिंग आणि विमा उद्योगांमध्ये आवड असेल तर B.B.I. हा एक उत्तम पर्याय आहे. १२ वी कॉमर्स मधील सर्वोत्तम करियर मधील हा एक विद्यार्थ्यांचा आवडता कोर्स आहे.

हा कोर्स पूर्णतः वित्तीय क्षेत्राशी संबंधीत असल्याने एक उत्तम करियर पर्याय आहे. हा अभ्यासक्रम सहा सेमिस्टर मध्ये विभागलेला आहे. बी.कॉम. प्रमाणेच हा हि तीन वर्षाचा कोर्स आहे.

बँकिंग, विमा, वाणिज्य अशा आर्थिक क्षेत्राशी निगडीत असलेला हा एक महत्वाचा पर्याय आहे.

3 ) बॅचलर ऑफ बिझनेसस्टडीज ( B.B.S. )

व्यावसाईक जगताचा महत्वाचा घटक बनण्याची इच्छा असलेला पत्येक विद्यार्थी हा या कोर्स कडे वळतोच.

आपली ज्ञानची आणि बौद्धिक क्षमतेची संपूर्ण जगताला ओळख करून देण्याचे स्वप्न या कोर्स मध्ये पूर्ण होते.

या मध्ये बँकिंग, फायनान्स, इकॉनॉमिक्स, इत्यादी विषय शिकवले जातात. तसेच या संबंधित प्रत्यक्ष अनुभव सुद्धा दिला जातो. उत्तम करियर आणि असंख्य संधी यामुळे हा विद्यार्थीप्रिय कोर्स बनत आहे.

B.B.S. हा सुद्धा १२ वी कॉमर्स नंतरचा सर्वोत्तम करियर पर्याय आहे.

4 )बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन ( B.C.A.)

जर तुम्हाला जागतिक पातळीवर वेगाने प्रगती करणाऱ्या I.T. क्षेत्रात करियर करायचे असेल तर; बी.सी.ए. हा उत्तम पर्याय आहे.

१२ वी कॉमर्स मधील उत्तम करियर च्या संधी देणारा हा एक महत्वाचा कोर्स आहे.

बी.सी.ए. हा कोर्स देशात उच्च पातळीवरचे आय टी तंत्रज्ञ निर्माण करत आहे. डेटाबेस, वेब डिझायनिंग, सोफ्टवेअर डिझायनिंग असे असंख्य विषय यात शिकवले जातात.

भारतीय विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण या कोर्समुळे मिळत आहे. देशांतर्गत आणि देशाबाहेरसुद्धा आपली चमक दाखवण्याची  संधी देणारा हा कोर्स आहे.

5 )जर्नालीजम एंड मास कम्युनिकेशन .

१२ वी कॉमर्स नंतर सर्वोत्तम करियर मध्ये पत्रकारिता आणि जनसंवाद हा कोर्स सुद्धा समाविष्ट आहे. मिडिया लाईन मध्ये करियर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा एक महत्वाचा कोर्स आहे.

इलेक्ट्रॉनिक मिडिया तसेच प्रिंट मिडिया मध्ये संधी देणारा हा महत्वाचा कोर्स आहे. हा तीन वर्षाचा पूर्णवेळ अभ्यासक्रम आहे.

उत्तम संवादकौशल्य आणि जनसंपर्काची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे.

महाराष्ट्रातील प्रसिद्ध

कॉमर्स कॉलेज पाहण्यासाठी

येथे क्लिक करा.

updates a2z