12 वी आर्ट नंतर चे करियर पर्याय. Career option for Art student.

१२ वी आर्ट नंतरचे करियर पर्याय कोणते.
मित्रांनो,खरंतर दहावीनंतरच आपण आपल्या करिअरची दिशा ठरवत असतो. अकरावीला आपण कोणत्या शाखेत प्रवेश घेतो यावरून आपलं करियर निश्चित होत असतं.
ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला आवड असते ते क्षेत्र आपण दहावी किंवा बारावीनंतर निश्चित करतो. यातच अकरावीमध्ये प्रवेश घेत असताना आपण कला विज्ञान किंवा वाणिज्य यापैकी कोणती शाखा निवडतो यावर बहुतेक आपलं भविष्य ठरलेलं असतं.
यापैकी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये विज्ञान आणि वाणिज्य या दोन शाखा म्हणजेच उत्तम करिअर आणि भरपूर पगाराच्या नोकऱ्या देणाऱ्या शाखा असं मानलं जातं.
परंतु कला शाखेकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा काही विद्यार्थ्यांचा वेगळा आहे. आज आपण कला शाखेमध्ये बारावी झालेले असताना सुद्धा उत्तम करिअर आणि उच्च पदस्थ नोकऱ्या कोणत्या करता येतील याविषयीचा विचार करूया.
Career option for Art student.
मागच्या लेखामध्ये आपण बारावी सायन्स नंतर होणार करियर पाहिलं, तर आज बारावी कला शाखेमध्ये असणाऱ्या करिअरच्या संधी पाहूया.
विज्ञान आणि वाणिज्य शाखेतच उत्तम करिअर आहे हा गैरसमज आहे. कारण कला शाखेमध्ये शिक्षण घेतलेले असंख्य विद्यार्थी आज उच्च पदस्थाधिकारी आणि हाय प्रोफाईल लाईफ जगताना दिसतात. उत्तम करिअर हे फक्त विज्ञान आणि वाणिज्य शाखेतच नाही तर कला शाखेमध्ये सुद्धा आहे.
तर चला मग पाहूया बारावी कला शाखे नंतर करता येणारे काही महत्त्वाचे करिअर ऑप्शन्स.
१२ वी आर्ट नंतर चे करियर पर्याय.
1) बी. एफ. ए. ( बॅचलर ऑफ फाईन आर्ट ).
बॅचलर ऑफ फाईन आर्ट हा चार वर्षाचा पूर्णवेळ पदवी अभ्यासक्रम असून तुमच्या करिअरसाठी अगदी योग्य पर्याय ठरू शकतो.
जर तुमच्यामध्ये गायन अभिनय नृत्य शिल्प चित्रलेखन यासारखे विशेष कलागुण असतील, तर बॅचलर ऑफ फाईन आर्ट हा तुमच्यासाठी एक उत्तम कोर्स ठरू शकतो.
या कोर्ससाठी बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अभ्यासक्रमाचे उपविभाग असून, पदविका आणि पदवी अभ्यासक्रम ही उपलब्ध आहेत. या कोर्स नंतर आपण शासकीय, निमशासकीय नोकरी किंवा स्वतःचा व्यवसाय देखील करू शकता.
बी. एफ. ए. केल्यानंतर भारतातच नाही तर विदेशातही तुम्हाला नोकरीच्या संधी मिळू शकतात.
महाराष्ट्रातील प्रसिद्ध
फाईन आर्ट कॉलेज पाहण्यासाठी
येथे क्लिक करा.
2) बी. जे. एम. ( बॅचलर ऑफ जर्नलिझम अँड मास कमुनिकेशन).
पत्रकारितेची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तीन हा वर्षाचा पूर्णवेळ पदवी अभ्यासक्रम आहे. बॅचलर ऑफ जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन हा एक उत्तम करिअर पर्याय ठरू शकतो. प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया त्याचबरोबर आकाशवाणी या उपविभागांमध्ये वेगवेगळ्या करिअरच्या संधी उपलब्ध आहेत.
यामध्ये पदवी आणि पदविका असे दोन्ही अभ्यासक्रम उपलब्ध असून नोकरी किंवा व्यवसाय करण्याची उत्तम संधी देणारा हा एक करिअरचा पर्याय आहे.
3) बी. एस. डब्ल्यू. (बॅचलर ऑफ सोशल वर्क)
.समाजसेवा आणि करियर या दोन्हींचा एकत्र विचार करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बॅचलर ऑफ सोशल वर्क अर्थात बीएसडब्ल्यू हा तीन वर्षांचा पूर्णवेळ पदवी अभ्यासक्रम एक चांगला पर्याय आहे. हा अभ्यासक्रम केल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या सहकारी संस्था यामध्ये काम करण्याची संधी मिळते.
4 ) बी. ए. (बॅचलर ऑफ आर्ट्स).
कला शाखेतील विद्यार्थ्यांसाठी हा उत्तम पर्याय आहे. पुरातत्व शास्त्र, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, खगोलशास्त्र यासारख्या अनेक विभागांमध्ये करिअर करण्याचे संधी बॅचलर ऑफ आर्ट्स च्या विद्यार्थ्यांना मिळते.
कला शाखेमध्ये बारावी उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, कला शाखेची पदवी असणारा बॅचलर ऑफ आर्ट हा एक महत्त्वाचा कोर्स आहे.
5 ) बी. एफ. ए. ( बॅचलर ऑफ एलिमेंटरी एज्युकेशन )
शैक्षणिक क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त असलेला चार वर्षे पूर्ण वेळ कालावधीचा हा पदवी अभ्यासक्रम आहे. पदविका आणि पदवी अशा दोन्हीही पर्यायांमध्ये हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. या कोर्स नंतर सरकारी किंवा खाजगी अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.
संबंधित कोर्सेस उपलब्ध असणाऱ्या
विध्यापीठांची माहिती मिळवण्यासाठी
येथे क्लिक करा.
6 ) बी.पी. एड. ( बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन ).
क्रीडा आणि फिटनेस यांची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन हा एक उत्तम पर्याय आहे. तीन ते चार वर्षाचा कालावधी असणारा हा कोर्स कला शाखेतील विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा कोर्स आहे. याच्या माध्यमातून शारीरिक शिक्षण या विभागासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत.
7 ) एल. एल. बी. ( इंटिग्रेटेड लॉ कोर्स ).
कला शाखेतील विद्यार्थ्यांसाठी कायदा या क्षेत्राशी संबंधित असलेला पाच वर्ष पूर्ण वेळ कालावधीचा हा अभ्यासक्रम एक उत्तम करिअर पर्याय आहे.
यामध्ये प्रामुख्याने व्यापारी कायदे, प्रशासकीय कायदे, दिवाणी कायदा, कंपनी कायदा, प्रदूषण नियंत्रण कायदा, ग्राहक संरक्षण, वनविषयक, सहकार कायदे इत्यादी अभ्यासक्रमांचा समावेश असतो.
समाजा मध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये कायदेविषयक ज्ञानाची आवश्यकता पडत असल्याने, इंटिग्रेटेड कोर्सला अनेक विद्यार्थी पसंती देतात.
करार कायदा, मिळकतीचा कायदा, कामगार कायदा, पेटंट कायदा, इन्कम टॅक्स, सेल्स टॅक्स यासारख्या कायदेशीर गोष्टींचा समावेश असलेला हा पाच वर्षाचा कोर्स आहे. बारावी कला शाखेतून उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा एक उत्तम करिअर पर्याय आहे.
आणखी काही सोपे आणि महत्वाचे
कोर्सेस पाहण्यासाठी
येथे क्लिक करा.
बी. एच. एम. बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट.
सध्याच्या काळामध्ये असंख्य विद्यार्थ्यांसाठी मध्ये हॉटेल मॅनेजमेंट हे एक आवडतं करिअर बनवू पाहत आहे. वेगवेगळ्या विभागांमध्ये करिअरच्या संधी उपलब्ध असलेला बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट हा एक उत्तम पर्याय आहे.
तीन वर्षांचा पुर्णवेळ अभ्यासक्रम आणि एक ते दोन वर्षाचा डिप्लोमा अशा दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध असलेला हा कोर्स आहे. या कोर्स नंतर सरकारी नोकरी किंवा स्वतःचा हॉटेल व्यवसाय करण्याचा पर्याय उपलब्ध होतो.