Namo Shetkari Yojana Yadi अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्य शासनाने अल्पभूधारक शेतकऱ्यांना, पी एम किसान योजनेप्रमाणे प्रत्येक वर्षाला 6 हजार रुपये मिळावेत, यासाठी नमो शेतकरी सन्मान निधी योजनाही सुरू केलेली आहे. आणि या योजनेच्या अंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना वर्षाभरात तीन टप्प्यात 2 हजार रुपये प्रमाणे 6000 रुपये थेट बँक खात्यात जमा केले जाणार आहेत.
आणि जे पी एम किसान योजनेचे लाभार्थी आहेत, त्यांनाच आता 2000 ऐवजी 4 हजार रुपयांचा हप्ता मिळणार आहे.तसेच जे शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभार्थी नसतील, त्यांना दोन हजाराचा हप्ता मिळणार.
तर या योजनेसाठी कोण-कोणते शेतकरी पात्र आहेत ते पाहूया.
1) शेतकरी हा अल्पभूधारक असावा. त्या शेतकऱ्याच्या नावावर 1 फेब्रुवारी 2019 च्या पूर्वी शेती असावी. म्हणजेच जमीन असावी तर तो शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरणार आहे.
2) या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पहिल्या हप्त्यासाठी जवळपास 1600 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.
3) ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा(PM Kisan Yojana) लाभ हा मिळत आहे. त्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही प्रकारचा फॉर्म किंवा कागदपत्रे शासनाला देण्याची आवश्यकता नाही.
4) परंतु ज्या शेतकऱ्यांना, पी एम किसान योजनेचा लाभ हा मिळत नाही. अशा शेतकऱ्यांना,त्यांच्याकडून लवकरच पुढील प्रक्रिया करून घेतली जाणार आहे.
तर अशाप्रकारे,पुढील एप्रिल महिन्यापासून या नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा 2 हजार रुपयांचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना वितरित केला जाणार आहे.आणि ही एक शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे.
Categories