स्कायमेटचा अंदाज यावर्षी मान्सून कमी असणार

Skymate - update
यावर्षी मान्सून कमी असणार असल्यायाचा हवामान अंदाज स्कायमेट या संस्थेने वर्तविला आहे. मान्सून सरासरीपेक्षा कमी असणार असल्याचा अंदाज स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने वर्तवला आहे.

मान्सून पावसाचे जे प्रमाण असणार आहे ते ९४ टक्के असणार असल्याचा अंदाज या संस्थेने वर्तविला आहे. यामुळे शेती व्यवसायावर याचा परिणाम होणार असून शेती उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे

स्कायमेटचा अंदाज यावर्षी मान्सून कमी असणार

स्कायमेटच्या अंदाजानुसार  महाराष्ट्रासह गुजरात व मध्यप्रदेशात यंदाच्या मान्सूनमध्ये कमी पाऊस पडणार आहे, तर पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये सामान्य सरासरीपेक्षा कमी मान्सून पाऊस पडेल.

संपूर्ण जगाच्या हवामानावर आणि पर्जन्यमानावर एल निनोचा डायरेक्ट परिणाम होत असतो.

शेतकरी बांधवांसाठी हि काहीशी नकारात्मक बातमी असू शकते. त्यामुळे हवामानाचा अंदाज घेऊन त्या प्रमाणे पिक पद्धतीचा अवलंब शेतकरी बांधवानी केला पाहिजे.

पावसाचा अंदाज सरासरीपेक्षा कमी असल्याने कमी पाण्याच्या आणि लवकर येणाऱ्या पिकांची लागवड करण्याकडे शेतकरी बांधवांचा कल असला पाहिजे.

पिक विमा उतरविणे फायद्याचे

शेती करत असताना शेतीमध्ये बियाणे औषधी व शेती संबधित इतर साहित्य खरेदीसाठी शेतकरी बांधवास खूप मोठा खर्च करावा लगतो. त्यामध्ये कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होते.

शेतीमध्ये विविध संकटाचा सामना शेतकरी बांधवाना करावा लागतो. त्यातच स्कायमेट या हवामान संस्थेचा हा अंदाज शेतकरी बांधवांची काहीशी चिंता वाढविणारा ठरणार आहे.

नैसर्गिक संकटामुळे शेतातील पिकांचे नुकसान झाल्यास पिक नुकसानभरपाई मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी आपापल्या शेतातील पिकांचा पिक विमा काढल्यास पिक विमा कंपनीकडून नुकसानभरपाई मिळू शकते.

त्यामुळे पिक विमा उतरविणे खूपच फायद्याचे ठरते

खालील स्कायमेटचे ट्वीट पहा

कसा असेल यावर्षीचा पावसाचा अंदाज?

चालुज वर्षी म्हणजेच २०२३ वर्षासाठी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला असून किती कमी पाऊस पडणार आहे या संदर्भात सविस्तर या लेखामध्ये माहिती देण्यात आलेली आहे.

कोणकोणत्या राज्यांना बसणार फटका?

यावर्षी पाऊस कमी पडणार असून त्याचा फटका कोणकोणत्या राज्यांना बसणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती वाचा या लेखामध्ये.

 

updates a2z