सुकन्या समृद्धी योजना महाराष्ट्र-२०२३ .Sukanya Samrudhhi Yojana.

सुकन्या समृद्धी योजना महाराष्ट्र-२०२३ .Sukanya Samrudhhi Yojana.
केंद्र तसेच राज्य सरकार महिला व मुलींच्या विकासासाठी प्रकारच्या योजना सतत राबवत असतात. लेक लाडकी, माझी कन्या भाग्यश्री याच प्रमाणे सुकन्या समृद्धी योजना 2023 ही एक महत्वाची योजना राज्य आणि केंद्र सरकार मार्फत राबविली जात आहे.
या योजनेअंतर्गत, मुलीचे शिक्षण व तिचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी तिच्या पालकांना मुलीच्या शिक्षणासाठी पैसे उभे करण्यासाठी प्रोत्साहित केले.
जाते. या योजनेमध्ये,मुलीच्या जन्मापासून पालक तिच्या शिक्षणासाठी किंवा तिच्या लग्नासाठी पैसे जमा करू शकतात. मुलगी 21 वर्षाची झाल्यानंतर एक मोठी रक्कम परतावा म्हणून मिळते.
22 जानेवारी 2015 रोजी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू झालेल्या बचाव बेटी पढाव ही एक महत्त्वाची योजना आहे. आणि सुकन्या समृद्धी योजना 2023 ही याच योजनेचा एक उप घटक आहे, असे म्हणावे लागेल.
मुलीचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी फायदेशीर असलेली ही योजना आहे. सदरील योजना सुकन्या समृद्धी खाते या नावाने सुद्धा ओळखली जाते.
सुकन्या योजनेच्या
अधिकृत पोर्टल ला भेट देण्यासाठी
येथे क्लिक करा.
मुलीच्या नावे तिचे आई-वडील पोस्ट ऑफिस मध्ये किंवा कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेमध्ये बचत खाते उघडून या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतात. त्या पोस्ट किंवा बँकेच्या खात्याला, सुकन्या समृद्धी योजना खाते असे नाव दिलेले आहे.
या योजनेमध्ये कमीत कमी अडीचशे रुपये दर वर्षी जास्तीत जास्त दीड लाख रुपये प्रति वर्षी याप्रमाणे गुंतवणूक करून योजनेचा लाभ घेता येतो.
या योजनेमध्ये जन्मापासून पुढे वय 21 वर्षे पूर्ण झाले; की खात्यावर जमा झालेली रक्कम सव्याज सदरील खातेदार मुलीच्या आई-वडिलांना मिळते.
सुकन्या समृद्धी योजना 2023 मध्ये लाभार्थी मुलीचे बँकेत खाते पासून पुढील पंधरा वर्षापर्यंत फक्त त्या खात्यात पैसे भरावे लागतात. पंधरा वर्षापासून 21 वर्षांपर्यंत सदर खात्यामध्ये भरण्याची आवश्यकता नसते.
या योजनेमध्ये जवळपास 64 टक्के पेक्षा ही जास्त रक्कम हि व्याज स्वरूपात दिले जाते. तर केवळ 35 ते 36 टक्के इतकी गुंतवणूक ही लाभार्थीस करावी लागते. केवळ अडीचशे रुपये गुंतवणूक करून उत्तम प्रकारचा परतावा मिळवून देणारी, ही सरकारच्या गुंतवणुकीच्या योजना पैकी, एकमेव योजना आहे.
ही योजना सुरू झाली त्यावेळेस दोनच मुलींना या योजनेचा लाभ घेता येत होता; परंतु सरकारने बदललेल्या धोरणानुसार; आता एकाच आई-वडिलांच्या 3 मुली योजनेचा लाभ घेऊ शकतील.
केंद्र सरकार पुरस्कृत सुकन्या समृद्धी योजनेची पूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत.
सुकन्या समृद्धी योजनेच्या
लाभ देणाऱ्या बँका आणि अर्ज प्रक्रियेची पद्धत
पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
सुकन्या समृद्धी योजना 2023 साठी, पात्रता, या योजनेचे उद्दिष्ट, तिचे वैशिष्ट्य,आवश्यक असणारी कागदपत्रे त्याचबरोबर अर्ज करण्याची पद्धत याविषयी माहिती.
योजनेचे नाव:- सुकन्या समृद्धी योजना.2023.
कोणी सुरू केली:- केंद्र सरकार.
विभाग:- महिला व बाल विकास विभाग.
कधी सुरू केली:- 22 जानेवारी 2015.
लाभार्थी:- कुटुंबातील लहान मुली.
लाभ:-आर्थिक सहाय्य.
उद्देश:- मुलींच्या कल्याणासाठी प्रोत्साहन देणे.
अर्ज करण्याची पद्धत:- पोस्टाच्या माध्यमातून. तसेच बँकेमध्ये.
मुलीच्या जन्मापासून लग्नापर्यंत सर्वच गोष्टींसाठी लागणारा खर्च हा या योजनेमार्फत उभा करता येऊ शकतो.
उदाहरणार्थ; मुलीचे लग्न, शिक्षण, आरोग्य, याच बरोबर मुलीचे भविष्य उज्ज्वल करण्याच्या दृष्टीने या योजनेची अंमलबजावणी केलेले आहे. मुलीचे भविष्य आत्मनिर्भर करण्यासाठी प्रामुख्याने ही योजना सुरू केलेली आहे.