
केंद्र सरकारने वीज संदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकार वीज दर निश्चित करण्यासाठी ‘टाईम ऑफ डे’ नियम लागू करण्याच्या तयारीत आहे. यामुळे देशभरातील विजेचे योग्यरित्या व्यवस्थापन केले जाणार आहे. आता वीज बिलात 20 टक्क्यांपर्यंत बचत करता येणार आहे. यामुळे ‘टाईम ऑफ डे’ प्रणालीचा ग्राहक आणि वीज पुरवठादारांना निश्चित फायदा होईल असा विश्वास केंद्रीय ऊर्जा आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री आर. के. सिंह यांनी व्यक्त केला आहे.
केंद्र सरकारने राबवलेल्या नवीन प्रणाली अंतर्गत विजेचे दर दिवसा वेगळे आणि रात्री वेगळे दर लागू केले जाणार आहेत. या प्रणालीच्या अंमलबजावणीमुळे ग्राहकांना लागू होणाऱ्या दरानुसार काम करावे लागणार आहे. टीओडी शुल्क प्रणाली 1 एप्रिल 2024 पासून 10 kW आणि त्याहून अधिक मागणी असलेल्या व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांसाठी लागू होणार आहे. त्यानंतर शेती वगळता इतर सर्व ग्राहकांसाठी हा नियम 1 एप्रिल 2025 पासून लागू होणार आहेत.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा