👨🏻‍🌾Farmer update *शेतकऱ्यांची फसवणूक थांबणार? राज्यात नवीन कायदा येणार..*

Farmer-update

 

🌱 राज्यात येत्या काही दिवसांत पाऊस होणार असला तरी या खरीप हंगामामध्ये पीकपेरणी नियोजनाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना कृषी विभागाने उपयुक्त सल्ला द्यावा आणि मार्गदर्शन करावे. याशिवाय, खते, बियाणे आणि कीटकनाशके त्यांना योग्य दरात आणि वेळेवर मिळतील, यासाठीची कार्यवाही करावी, असे निर्देश कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहेत.

🌧️ राज्याच्या काही भागात सध्या पेरणी झाली असून जून महिना अखेरीस पाऊस येईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे पाऊस आल्याशिवाय पेरणीची घाई शेतकऱ्यांनी करु नये, यासाठी कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठांच्या शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवावी. खते, बियाणे, कीटकनाशके विक्रीत काळाबाजार करणारे आणि बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करा, अशा सूचनाही कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिल्या आहेत.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

updates a2z