मकाचे कणसे पोखरणारी अळी (लष्करी अळी) ची लक्षणे आणि व्यवस्थापन

मकाचे कणसे पोखरणारी अळी (लष्करी अळी) – मका पिकामध्ये सर्वात जास्त नुकसान करणारी व डायरेक्ट कणसांवर अटॅक करणारी अळी म्हणजे मकाचे कणसे पोखरणारी अळी जिला आपण लष्करी अळी म्हणून देखील ओळखतो. या अळीमुळे मका पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते व मकाच्या दाण्यांची गुणवत्ता बिघडते तसेच मकाच्या चाऱ्याच्या गुणवत्तेवर परिणाम होतो.
मकाचे कणसे पोखरणारी अळीचे शास्त्रीय नाव Helicoverpa armigera आहे. ही अळी मका बरोबर विविध पिकांवर आढळते जसे की ज्वारी, ऊस इत्यादी.