cotton market rate : कापुस बाजार भावाने गाठला उच्चांक झाले 10 हजार पार पहा जिल्हा नुसार बाजार भाव..!!
cotton market rate : आजचे कापूस बाजार भावात मोठे बदल,जाणुन घ्या आजचे नविन दर.
cotton market rate : नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण कापूस बाजार भाव याविषयी सविस्तर माहिती या लेखात जाणून घेणार आहोत .तुम्हाला माहीतच आहे जवळजवळ आता मे महिना सुरू झालेला आहे. तरीपण कापसाचे बाजार भाव cotton market Price म्हणावे तसे वाढलेले आपल्याला पाहायला मिळत नाही. साधारणपणे कापूस सुरुवातीला जवळपास नऊ ते साडेनऊ हजार रुपये विक्री झालेला तर हा भाव बऱ्याच काळ टिकून राहिला नाही त्यामुळे आज कापसाला साडेसात ते आठ हजार रुपये भाव मिळत आहे.
तर कापसाचे भाव वाढतील की नाही याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे पण शेतकऱ्याची कापूस भाव वाढीची आशा आज पर्यंत वाया गेलेली आहे.यावर्षी कापसाचे भाव शेवटच्या टप्प्यात जर नऊ हजार झाले नाही तर पुढील वर्षी कापसाच्या लागवडीत दहा टक्के घट येऊ शकते असे जाणकार लोक सांगतात.
जानेवारी मध्ये कापसाचे बाजार भाव सात ते आठ हजार तसेच फेब्रुवारीमध्ये पण आठ हजारापर्यंत आणि मार्चमध्ये सुद्धा आठ हजारापर्यंत पाहायला मिळाली. एप्रिलच्या सुरुवातीला कापसाचे बाजार भाव 8200 पर्यंत गेले होते परंतु सध्या कापसाचे बाजार भाव कमी झालेले पाहायला मिळत आहे. मे महिना सुरू झाला तरी कापसाला सात हजार सहाशे दरम्यान भाव मिळत आहे.
आता एक महिन्याच्या अंतराने डबल कापूस लागवड होईल तरीसुद्धा कापसाचे बाजार भाव वाढायला तयार नाहीत मग काय कापसाचे भाव कापूस लागवड झाल्यानंतर भाव वाढतील का असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात आलेला आहे.