मित्रांनो कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण आणि स्वाभिमान योजना अंतर्गत आता सध्या वर्धा जिल्ह्यातील तब्बल दोनशे शेतकरी बांधवांना 500 एकर शेतजमीन घेण्यासाठी तब्बल 11 कोटी इतका निधी अनुदान म्हणून देण्यात आलेला आहे. आणि मित्रांनो या योजनेच्या मदतीने शेतकरी बांधवांना जमीन खरेदी करण्यासाठी शंभर टक्के अनुदान मिळते. तसेच मित्रांनो या अनुदानासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये 2022 आणि 2023 साठी तब्बल दीडशे कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. मित्रांनो कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमानी योजनेच्या मदतीने भूमिहीन अनुसूचित जाती तसेच नवबौद्ध शेतकरी बांधवांना जमीन खरेदी करण्यासाठी या अनुदान मिळत आहे. तसेच मित्रांनो नवोदय घटकातील आणि दारिद्र्यरेषेखाली भूमिही कुटुंबांना जमीन खरेदी करण्यासाठी या योजनेमध्ये शासनांतर्गत चालना देण्यात येत आहे. मित्रांनो या योजनेमध्ये अटीन बद्दल तुम्हाला सांगायचं झालं तर दारिद्र रेषेखालील भूमीहीन अनुसूचित जाती आणि नवबौद्ध शेतमजूर जे आहेत यांच्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. आणि मित्रांनो या योजनेच्या मदतीने या गोरगरीब शेतकरी बांधवांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होणारच आहे. तसेच त्यांचे आर्थिक परिस्थिती सुधारून त्यांच्या राहणीमान देखील चांगले होणार आहे. आणि मित्रांनो त्याचबरोबर त्यांची जी मजुरी करण्याची काम आहे ते सुद्धा बंद होऊन ते स्वतःच्या शेतात काम करून पैसे कमवू शकणार आहेत. तर मित्रांनो या जमीन खरेदी अनुदान योजना मध्ये अर्ज करायचा असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

updates a2z