१२ वी आर्ट नंतरचे आणखी महत्वाचे कोर्सेस.

 

१२ वी आर्ट नंतरचे सोपे आणि महत्वाचे कोर्सेस. Easy and importent courses after 12th.

१२ वी आर्ट नंतरचे सोपे आणि महत्वाचे कोर्सेस.

 

१२ वी नंतरचे आणखी महत्वाचे कोर्सेस कोणते याचाही विचार होणे गरजेचे वाटते. पुढे अशाच काही कोर्सेस ची माहिती दिलेली आहे. ती काळजीपूर्वक वाचा.

बी. एच. एम. बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट.

सध्याच्या काळामध्ये असंख्य विद्यार्थ्यांसाठी मध्ये हॉटेल मॅनेजमेंट हे एक आवडतं करिअर बनवू पाहत आहे. वेगवेगळ्या विभागांमध्ये करिअरच्या संधी उपलब्ध असलेला बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट हा एक उत्तम पर्याय आहे.

तीन वर्षांचा पुर्णवेळ अभ्यासक्रम आणि एक ते दोन वर्षाचा डिप्लोमा अशा दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध असलेला हा कोर्स आहे. या कोर्स नंतर सरकारी नोकरी किंवा स्वतःचा हॉटेल व्यवसाय करण्याचा पर्याय उपलब्ध होतो.

 

बी. इ. एम. ( बॅचलर ऑफ इव्हेंट मॅनेजमेंट )

 

बी. इ. एम. कला शाखेतील बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी इव्हेंट मॅनेजमेंट हा एक चांगला पर्याय आहे. आज-काल राजकीय, घरगुती, व्यावसायिक, सामाजिक आणि सांस्कृतिक सोहळे खूप प्रमाणात साजरे होत असतात. आणि आशा सोहळ्यांसाठी उत्तम व्यवस्थापनाची गरज पडत असते.

अशा प्रकारच्या कार्यांमध्ये उत्तम व्यवस्थापक म्हणून भूमिका पार पाडण्याची संधी देणारा हा महत्त्वाचा कोर्स आहे. जर तुमच्यामध्ये उत्तम व्यवस्थापन करण्याची आणि योग्य नियोजन करण्याची कला अवगत असेल, तर बॅचलर ऑफ इव्हेंट मॅनेजर हा तुमच्यासाठी अतिशय योग्य पर्याय आहे.

स्वतःचा व्यवसाय किंवा नोकरी करण्याची संधी देणारा हा कोर्स डिग्री आणि डिप्लोमा अशा दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

 

बी. बी. ए. ( बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन )

 

बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन हा शब्द पाहिला की अनेक विद्यार्थ्यांचा समज होतो की हा कोर्स वाणिज्य अर्थात कॉमर्स शाखेतील विद्यार्थ्यांसाठी असेल. परंतु हा एक गैरसमज आहे. कारण बीबीए हा कोर्स बारावी आर्ट नंतर सुद्धा करू शकता.

या कोर्सच्या माध्यमातून असंख्य कॉर्पोरेट सेक्टरमध्ये करिअरच्या उत्तम संधी उपलब्ध आहेत.

फॅशन डिझायनिंग.

फॅशन विश्व मध्ये आपली स्वतंत्र ओळख निर्माण करण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी, फॅशन डिझाईन हा कोर्स अतिशय योग्य असा पर्याय. आहे हा कोर्स सुद्धा फाईन आर्ट यासारखाच असून आपल्या सर्जनशीलतेला पूर्ण वाव देणारा असा हा कोर्स आहे.

चार वर्षाचा पूर्णवेळ अभ्यासक्रम असणाऱ्या कोर्समध्ये पदवी आणि पदविका असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत.

महाराष्ट्रातील

Collage of fashion designing

ची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

ग्राफिक डिझायनिंग

फोटोग्राफी, जाहिरात, प्रिंटिंग, वेब डिझाईनिंग त्याचबरोबर ॲनिमेशन यासारख्या विविध विषयांचा समावेश असलेला हा एक विस्तृत अशा प्रकारचा कोर्स आहे.

वरीलपैकी कुठलाही एक स्पेशल विषय घेऊन आपण आपल्या करिअरची सुरुवात करू शकतो.

इंटेरियर डिझायनिंग.

इंटेरियर डिझाईनिंग हा देखील फॅशन डिझाईन सारखाच एक ग्लॅमर मिळवून देणारा कोर्स आहे.

बारावी आर्ट नंतर इंटेरियर डिझाईनर हा डिग्री किंवा डिप्लोमा या दोन्हीपैकी कोणताही पर्याय आपण निवडू शकतो.

इंटेरियर डिझायनर हे फक्त घर किंवा ऑफिस यापुरते मर्यादित क्षेत्र नाही. हॉस्पिटल, मल्टिप्लेक्स, मॉल यासारख्या ठिकाणी सुद्धा इंटिरियर डिझाईनर हा आवश्यक असतो.

त्यामुळे करिअरच्या दृष्टीने विचार केल्यास बारावी आर्ट नंतर इंटेरियर डिझाईन हा एक उत्तम करिअर पर्याय ठरू शकतो.

एवेशन कोर्सेस.

विमानतळ व्यवस्थापनाशी संबंधित असलेल्या या कोर्समध्ये विमानतळाच्या व्यवस्थापनापासून ते विमानतळ सुरक्षा पर्यंत अनेक गोष्टी समाविष्ट आहेत हा तीन वर्षाचा परिपूर्ण मॅनेजमेंट कोर्स आहे.

गृहविज्ञान किंवा होम सायन्स.

घरगुती आर्थिक योजना, बाल विकास, अन्न आणि पोषण विषयक पाया, यासारख्या अनेक गोष्टींचा समावेश असलेला होम सायन्स हा तीन वर्षाचा ग्रॅज्युएट कोर्स आहे.

कापड आणि कपडे, माणूस संसाधन, व्यवस्थापन त्याचबरोबर संसाधन विकास यासारख्या वेगवेगळ्या प्रकारच्या क्षेत्रामध्ये कार्य करण्याची संधी मिळवून देणारा होम सायन्स हा बारावी आर्ट नंतर करता येणारा एक महत्त्वाचा कोर्स आहे.

वरती पाहिलेले व असे अनेक पर्याय बारावी कला शाखेनंतर उपलब्ध आहेत.

तसेच हे कोर्स करण्यासाठी केंद्र तसेच राज्य शासनातर्फे सुलभ हप्त्यात कर्ज सुविधा सुद्धा दिली जाते.

वरील कोर्स साठी

शैक्षणिक कर्ज कसे मिळवावे

यासाठी येथे क्लिक करा.

 

आपल्या अंतर्गत कलागुणांना वाव देण्यासाठी आणि आपले अंतर्गत कलागुण नावीन्यपूर्ण पद्धतीने समाजासमोर व्यक्त करण्यासाठी बारावी कला शाखेतील विद्यार्थी हे योग्य ठरू शकतात.

विज्ञान आणि वाणिज्य शाखा याच फक्त विद्यार्थ्याचं उत्तम भवितव्य घडवू शकतात, हा खरोखरच एक गैरसमज आहे. कारण काला शाखेतील विद्यार्थी स्पर्धा परीक्षा सारख्या माध्यमातून सुद्धा स्वतःचं उत्तम करिअर घडू शकतात.

कष्ट करण्याची तयारी आणि संयम या दोन गोष्टी असतील तर कला शाखा ही विज्ञान आणि वाणिज्य शाखेत इतकीच महत्त्वाची शाखा आहे.

ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला करियर करायचे आहे, ते क्षेत्र योग्य पद्धतीने हाताळता येण्याची हातोटी जर आपल्याकडे असेल तर कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण यशस्वी होऊ शकतो. गरज आहे फक्त कष्ट आणि संयमची.

थोडक्यात.

दहावीच्या वर्षाला कमी मार्क असतील तर आर्ट शाखेला प्रवेश घ्यायला हवा, असा काही नियम नाही.

उत्तम मार्क असलेले विद्यार्थी सुद्धा कला शाखेकडे वळताना दिसतात.

बारावी आर्ट नंतर वकील, प्राध्यापक, सरकारी अधिकारी, उत्तम पत्रकार, त्याचबरोबर राजकीय पुढारी यासारख्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करण्याची संधी मिळू शकते.

बारावी कला शाखेनंतर करता येणाऱ्या महत्त्वाच्या काही कोर्सेसची आज आपण माहिती पाहिली. या आणि अशा अनेक महत्त्वाच्या कोर्सेस मधून विद्यार्थी आपले भवितव्य घडविण्यासाठी प्रयत्न करू शकतो.

योग्य वेळी घेतलेला योग्य निर्णय आपले भविष्य योग्य दिशेने नेत असतो.

म्हणून वेळीच योग्य निर्णय घेऊन आपले भविष्य उज्ज्वल करण्याची आवश्यकता असते.

ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट द्वारे नक्की कळवा.

त्याचबरोबर योग्य करियर मार्गदर्शन आणि शैक्षणीक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.

updates a2z