१२ वी कॉमर्स नंतरचे सोपे महत्वाचे कोर्सेस.

१२ वी कॉमर्स नंतरचे सोपे महत्वाचे कोर्सेस. Courses After 12th Commerce

१२ वी कॉमर्स नंतरचे सोपे महत्वाचे कोर्सेस.

Table of Contents

 1. वाणिज्य पदवी.
 2. बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन.
 3. बॅचलर ऑफ बिझनेसस्टडीज.
 4. पत्रकारिता आणि जनसंवाद.
 5. डेटा सायन्स.
 6. बॅचलर ऑफ लॉ.
 7. बॅचलर ऑफ बँकिंग अँड इन्शुरन्स.
 8. व्यवसाय प्रशासन पदवी.
 9. चार्टर्ड अकाउंटन्सी.
 10. अर्थशास्त्र पदवी.
 11. लेखा आणि वित्त पदवी.
 12. खर्च आणि व्यवस्थापन लेखापाल.
 13. कंपनी सचिव.
 14. प्रमाणित वित्तीय नियोजक.
 15. डिजिटल मार्केटिंग.

चार्टर्ड अकाउंटन्सी (CA).

इंस्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया ही संस्था; १२ वी कॉमर्स च्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची आहे. सी.ए. हा बारावी कॉमर्स नंतर चा एक महत्वाचा कोर्स आहे.

१२ वी आर्ट मधील

उत्तम करियर च्या संधी पाहण्यासाठी

येथे क्लिक करा.

पदवी च्या तुलनेत सी.ए.चा अभ्यास थोडा कठीण असतो. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर सी.ए. हि पदवी दिली जाते. सर्वाधिक पगार तसेच प्रतिष्ठित नोकरी ची इच्छा असणारे विद्यर्थी या कोर्सकडे वळतात.

एल.एल.बी. (L.L.B. )

एल.एल.बी. हा तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम असला तरी; अनेक कॉलेज आणि विद्यापीठे असे आहेत जे पाच ते सहा वर्षांपर्यंत अभ्यासक्रम चालवतात. या कोर्स मध्ये कॉमर्स बरोबरच आर्ट आणि सायन्स शाखेचे विद्यार्थी सुद्धा प्रवेश घेऊ शकतात.

कायद्याचा अभ्यास करून वकील होण्यसाठी ही पदवी आवश्यक आहे. घटनात्मक कायदा, कामगार कायदा, करार कायदा,बौद्धिक संपदा कायदा, बँकिंग आणि विमा कायदा यांसारख्या अनेक कायद्यांचा यात अभ्यास केला जातो.

१२ वी कॉमर्स नंतर च्या यादीमध्ये वकिलीचा समावेश करावाच लागेल.

अर्थशास्त्र पदवी.

१२ वी कॉमर्स नंतरच्या उपयुक्त कोर्सेस मधील अर्थशास्त्र पदवी हा एक महत्वाचा अभ्यासक्रम आहे. विविध आर्थिक संकल्पना आणि आर्थिक घटकावर आधारित असलेला; हा तीन वर्षाचा पदवी अभ्यासक्रम आहे. १२ वी कॉमर्स नंतरचे सोपे महत्वाचे कोर्सेस पाहताना याचा विचार करावाच लागतो.

सूक्ष्म अर्थशास्त्र, राजकीय अर्थशास्त्र, अर्थशास्त्रीय आकडेवारी, अर्थशास्त्राचा इतिहासहि; या महत्वाच्या अभ्यास घटकांमुळे हि पदवी महत्वाची ठरते.

खर्च आणि व्यवस्थापन लेखापाल .

द इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया या संस्थेद्वारे चालवला जाणारा हा कोर्स सी.ए. प्रमाणेच उच्च पातळीची आहे. वेगवेगळ्या अभ्यासक्रमाच्या स्तरांची निर्मिती असलेला हा कोर्स ही तितकाच वरिष्ठ पातळीचा आहे.

खर्च व्यवस्थापन,व्यावसाईक कायदे,औद्योगिक कायदे आणि नैतिकता, इत्यादी विषयांचा समावेश असलेला हा कोर्स; सर्वोच्च पगाराच्या  नोकऱ्या मिळवून देणाऱ्या कोर्स पैकी एक आहे.

कंपनी सचिव.

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज भारतातील शैक्षणिक संस्थेद्वारे चालवला जाणारा अभ्यासक्रम आहे. पदवी नंतर केल्या जाणाऱ्या या कोर्ससाठी बारावी नंतर लगेच नाव नोंदणी करता येते.

या मध्ये प्रोफेशनल, फौंडेशन आणि एक्झिक्युटिव्ह या तीन स्तरावर अभ्यास करावा लागतो. हा एक उच्च प्रोफेशन देणारा कोर्स आहे. १२ वी कॉमर्स नंतरचे सोपे महत्वाचे कोर्सेस मध्ये हा एक प्रमुख कोर्स आहे.

प्रमाणित वित्तीय नियोजक.

प्रमाणित वित्तीय नियोजक हे एक कॉमर्स मधील सर्वोत्तम करियर आहे. फायनान्शियल प्लॅनिंग स्टँडर्ड्स बोर्ड इंडिया मार्फत या अभ्यासक्रमाचे व्यावास्थापन व नियोजन केले जाते.

महाराष्ट्रातील महत्वाच्या प्रसिद्ध

कॉमर्स कॉलेज ची सविस्तर माहिती

पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

आर्थिक नियोजन आय मध्ये रुची असणारे विद्यार्थी हा कोर्स करू शकतात. आर्थिक नियोजन आणि करप्रणाली, विमा आणि इस्टेट प्लानिंग या बाबतीतले कौशल्य तसेच ज्ञान मिळवण्यासाठी या कोर्सची आवश्यकता आहे.

थोडक्यात.

१२ वी कॉमर्स नंतर करता येणाऱ्या महत्वाच्या कोर्समध्ये हे काही महत्वाचे कोर्सेस होते. दिलेली माहिती हि विद्यार्थ्यांच्या करियर प्लानिंगच्या दृष्टीने महत्वाची वाटली असेल अशी खात्री आहे.

तुम्हाला एखाद्या अभ्यासक्रमाबद्दल अधिक माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा आणि अशाच करियर मार्गदर्शन साठी आमच्या वेबसाईट ला नक्की भेट द्या.

updates a2z