या जिल्ह्यात होणार पुन्हा एकदा आवकाळी.

या जिल्ह्यात होणार पुन्हा एकदा आवकाळी.

 

पश्चिम महाराष्ट्र, कोकण किनारपट्टी, तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मागे झालेल्या पावसामध्ये मका, तुर, केळी, हरभरा यासारख्या पिकांचे नुकसान केल्यानंतर; पाऊस आणखी उरलेल्या पिकांचे नुकसान करतो की काय? अशी भीती शेतकऱ्यांना वाटू लागलेले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पाऊस हिरावून घेतो की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे.

हवामानातील झालेल्या बदलामुळे, समुद्रामध्ये कमी जास्त दाबाचे पट्टे निर्माण होऊ लागले आहेत. त्यामुळे पावसासाठी पोषक वातावरण तयार होऊ लागला आहे. पावसाला अनुकूल असलेले वातावरण निर्माण झाल्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची काळजी वाढली आहे.

जुन्या पिढीतील मान्यतेनुसार फाल्गुन पौर्णिमेच्या आसपास जर अवकाळी पाऊस झाला, तर उन्हाची तीव्रता भयंकर वाढून उष्णते मध्ये वाढ होते. व याचा परिणाम मान्सून मध्ये पाऊस कमी होतो.

महाराष्ट्रातील परफेक्ट हवामान जाणून घ्या.

यावर्षी होळी तसेच गुढीपाडवा या सणांच्या दरम्यान झालेल्या पावसामुळे; सध्याच्या वातावरणामध्ये हा बदल आपण पाहतच आहोत. उन्हाची तीव्रता भयंकर वाढलेली असून वातावरणात जाणून येणे इतका बदल दिसत आहे.

सध्या असलेल्या उन्हाच्या तीव्रतेमध्ये आणखी वाढ होऊन राज्यातल्या अनेक ठिकाणी तापमान 40 अंश आकडे जाताना दिसत आहे. दिवसा एकूण 40 ते 42 अंश असलेले तापमान रात्री वीस पंचवीस च्या घरात असते.

समुद्रामध्ये निर्माण होणाऱ्या कमी जास्त दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्र तसेच देशभरात पाऊस पडत असतो. समुद्रामधील सध्याचे वातावरण जरी पावसासाठी अनुकूल असले तरी वेळोवेळी वातावरण बदलत आहे.

मागील पावसात झालेल्या नुकसानी मधून होरपळून निघालेल्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची योग्य काळजी, व योग्य देखभाल करावी. वातावरणा मधला प्रत्येक बदल वेळोवेळी शेतकऱ्यांना सांगण्यात येईल. व शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्यात येईल.

updates a2z