अध्यक्ष पदाच्या चर्चेतील प्रमुख नावे.

अध्यक्ष पदाच्या चर्चेतील प्रमुख नावे.

 

शरद पवार यांनी केलेल्या या घोषणेमुळे, अनेकांच्या भुवया उंचावल्या. राष्ट्रवादी काँग्रेस तसेच इतर पक्षांना देखील पवार यांचा हा निर्णय अनपेक्षित होता.

शरद पवार जर राजकारणातून निवृत्त झाले तर सहाजिकच येथून पुढे राष्ट्रवादी काँग्रेस चा अध्यक्ष कोण असणार अशा चर्चा रंगू लागल्या.

‘लोक माझे सांगाती’ या यांच्या राजकीय आत्मचरित्र मध्ये अनेक धक्कादायक गोष्टींचे खुलासे केलेले आहेत. या पुस्तकाची नवीन आवृत्ती ‘लोक माझे सांगाती भाग 2’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मुंबई येथे पार पडला.

यावेळी शरद पवार यांनी ही घोषणा केली. परंतु आता जर पवार राजकीय निवृत्ती घेत असतील, सहाजिकच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नवा अध्यक्ष मिळेल. परंतु कोण असेल हा नवा अध्यक्ष? याविषयी वेग वेगळ्या चर्चा ऐकायला मिळतात.

रा.कॉं. विषयी आणखी

सविस्तर माहिती पाहण्यासाठी

येथे क्लिक करा.

यामध्ये काही नावांचा प्रामुख्याने उल्लेख केला जातो.
पाहूया, कोण होऊ शकतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष?

सुप्रिया सुळे.

शरद पवार ज्यावेळेस राजकीय निवृत्ती घेतील वेळेस त्यांचा वारसदार म्हणून सुप्रिया सुळे यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. बारामती लोकसभेच्या विद्यमान खासदार असलेल्या सुप्रिया सुळे या शरद पवार यांच्या कन्या सुद्धा आहेत त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसमधील मोठ्या नेत्या आहेत.

तसेच गेले कित्येक वर्ष राजकारणामध्ये आहेत. त्यामुळे त्यांचे नाव पहिला क्रमांक ला येत.

जयंत पाटील.

महाराष्ट्राच्या राजकारणामधील मोठे नेते असलेले जयंत पाटील हे बरीच वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राहिलेले आहेत.

जयंत पाटील हे सध्या इस्लामपूर विधानसभेचे आमदार असून त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकार मध्ये अर्थ मंत्री पद भूषविलेले आहे. त्यामुळे जयंत पाटील यांचेही नाव राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहे.

अजित पवार.

अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील घरचे कुठे आहेत. सध्या विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा राहिलेले आहेत.

गेले बरेच दिवस पवार हे भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चा येत होत्या. परंतु जर पवार निवृत्त होत असतील, तर कॉंग्रेसच्या अध्यक्षपदासाठी अजित पवार यांचं नाव येणे सहाजिक आहे.

प्रफुल्ल पटेल.

तब्बल चार वेळा लोकसभेवर निवडून गेलेले प्रफुल्ल पटेल माजी केंद्रीय मंत्री आहेत. त्याच बरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्रातील एक मोठे नेते आहेत. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष असलेले पटेल हे पवार यांची विश्वासू मानले जातात. त्यामुळे प्रफुल्ल पटेल यांचं नाव राष्ट्रवादीच्या नवीन अध्यक्षाच्या शर्यतीमध्ये बर्‍याच वरच्या क्रमांक.

 

तर हि होती राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या नव्याने होऊ शकतील अशी काही ठराविक नावे. परंतु शरद पवारांचा राजकीय इतिहास पाहता त्यांची राजकीय सन्यास घेण्याची इच्छा आणि त्यांच्या घोषणेतील सत्यता कितपत खरी आहे हे तर येणारा काळच सांगेल.

 

updates a2z