S.S.Y. मध्ये अर्ज करण्याची पद्धत-२०२३.

S.S.Y. मध्ये अर्ज करण्याची पद्धत-२०२३.

S.S.Y. मध्ये अर्ज करण्याची पद्धत.

S.S.Y. मध्ये अर्ज करण्याची पद्धत-२०२३.

सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी, वर्षाकाठी अडीचशे रुपये भरावे लागतील. नसता सदरील खाते हे निष्क्रिय केले जाईल. व जर खाते सुरु करायचे असेल 50 रुपये प्रति वर्ष याप्रमाणे दंड आकारला जाईल.

ही अत्यंत सुरक्षित अशी योजना आहे. सदरील योजनेचा घेणारी लाभार्थी; जर काही कारणामुळे मृत झाल्यास तिच्या खात्यावर जमा झालेली संपूर्ण रक्कम ही तिच्या आई-वडिलांना दिली जाईल.

सुकन्या समृद्धी योजना चे फायदे:-

सुकन्या समृद्धी योजना ही एक सुरक्षित योजना आहे.

सदर योजनेमध्ये लाभार्थ्यास कर्जाचा व्याजदर मिळतो.

या योजनेमध्ये कोणत्याही लाभार्थीचे पैसे कधीही बुडणार नाहीत.

मुलीचे भवितव्य सुरक्षित होते.

मुलीचे लग्न शिक्षण तिचे आरोग्य यांच्यासाठी ही एक अतिशय उपयुक्त अशी योजना आहे.

या योजनेमध्ये जमा झालेल्या रकमेवर चक्रवाढ व्याज मिळते.

शासनाच्या नवीन धोरणानुसार आता कुटुंबातील प्रत्येक मुलीला या योजनेचा लाभ घेता येईल.

उत्तम भविष्यासाठी एक चांगली योजना आहे.

राष्ट्रीयकृत बँक त्याचबरोबर पोस्ट ऑफिस मध्ये खाते उघडले कि  या योजनेचा लाभ घेता येईल.

महत्वाचे म्हणजे दत्तक घेतलेली मुलगी देखील सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असेल.

 

अधिक माहितीसाठी

केंद्र सरकारच्या

महिला व बाल विकास मंत्रालयाच्या

संकेतस्थळाला भेट द्या.

या योजनेमध्ये असलेल्या तोट्यांचा विचार करू:-

 

या योजनेचा कालावधी 21 वर्षांचा त्यामानाने बराच मोठा आहे.

जवळपास साडे सात टक्के इतका व्याजदर सध्या या योजनेमध्ये जमा झालेल्या जखमेवर मिळतो. हा व्याजदर शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंड फंड मध्ये केलेल्या गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याज दरापेक्षा कमी आहे.

21 वर्षाच्या आत सदरील लाभार्थी मुलीचे लग्न झाले, तर या योजनेमधून बाद ठरवले जाते.

या योजनेमध्ये भरावी लागणारी रक्कम ही जास्त रक्कम ही दीड लाख असून सुद्धा या रकमेवर त्यामानाने हवे तितके व्याज मिळत नाही.

नियम अटी व पात्रता;

मुलीच्या जन्मानंतर दहा वर्षाच्या आतच सुकन्या समृद्धी योजना चे उघडता येईल. म्हणजेच दहा वर्षाखालील मुलीचा फक्त या योजनेसाठी पात्र असतील.

एखाद्या कुटुंबात दोन मुली असतील तर दोघींसाठी स्वतंत्र खाते उघडावे लागेल.

जरी या योजनेमध्ये दोन मुलींची आठ असली तरी त्यांच्या मातेच्या बाळंतपणामध्ये जुळ्या मुली झाल्या तर त्याही या योजनेसाठी पात्र असतील.

लाभार्थी मुलीचे वय 21 वर्ष झाल्यानंतर तिच्या खात्यावर जमा असलेली संपूर्ण रक्कम ही  व्याजासहित सदरील आई-वडिलांच्या किंवा तिचा सांभाळ करणाऱ्या पालकांच्या स्वाधीन केली जाते व सदरील खाते हे बंद करण्यात येते.

डिमांड ड्राफ्ट, कोअर बँकिंग, चेक किंवा रोख रकमेच्या सहाय्याने सुकन्या समृद्धी योजना मधील खात्यावर भरता येतील.

जन्मतः जर मुलीचे नाव ठेवले नसेल तर तिच्या आईच्या नावावर या योजनेचे खाते उघडता येईल. व भविष्यात मुलीचे नाव ठेवल्यानंतर सदरील खाते आईच्या नावावरून मुलीच्या नावावर करता येईल.

योजनेचे नावच सुकन्या समृद्धी योजना असल्याने या योजनेमध्ये फक्त मुलींनाच लाभ घेता येईल.

जर काही कारणास्तव सुकन्या समृद्धी योजना चे खाते बंद करावयाचे त तशीही सोय लाभार्थींना देण्यात आलेली आहे.

सदर खाते उघडल्यानंतर पाच वर्षात किंवा वर्ष पूर्ण झाल्यानंतर हे खाते बंद करता येते.

लाभार्थी मुलगी जर एखाद्या दुर्धर आजाराने ग्रस्त असेल तर हे खाते बंद करता येईल.

या योजनेचे खाते ज्या मुलीच्या नावे आहे क्या लाभार्थी मुलीचा मृत्यू झाल्यास सदरील खाते बंद करता येईल.

लाभार्थी मुलीच्या पालकाचा मृत्यू झाल्यास व पुढील पैसे भरण्यास कुटुंब सक्षम नसल्यास ते बंद करता येते.

सुकन्या समृद्धी योजना साठी कोण कोणती कागदपत्रे लागतात.

मंत्री मंडळातील महत्वाचे निर्णय

जाणून घेण्यासठी य्र्थे क्लिक करा.

 •  मुलीचे जन्माचे प्रमाणपत्र.
 • आधार कार्ड.
 • मुलीच्या आई-वडिलांचे मतदान ओळखपत्र.
 •  पॅन कार्ड.
 •  विज बिल.
 • आईवडिलांचे पासपोर्ट साईज फोटो.
 • रहिवासी प्रमाणपत्र.

वरील कागदपत्रे हे मुलीच्या आई-वडिलांचे असावेत. परंतु एखाद्या मुलीचे आई-वडील नसतील, मुलीची देखभाल करणारे पालक यांच्या कागदपत्रांची आवश्यकता आहे.

सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत झालेल्या रकमेवर किती व्याज दर मिळतो.
या योजनेच्या सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजेच पंधरा साल इ व्याजदर हा 9.1 टक्का इतका होता. परंतु सध्याच्या काळामध्ये हाच व्याजदर 7.6 टक्के इतका कमी झालेला आहे. म्हणजेच भारतीय अर्थव्यवस्थेवर भारतीय अर्थव्यवस्थेच्या चढ उतारानुसार योजनेत दिला जाणारा व्याजदर हा अवलंबून असतो.
या योजनेमध्ये जर तुम्ही पाच हजार रुपये इतकी रक्कम 7.6 टक्के इतक्या व्यास दरानुसार 14 वर्षांनी सदरील रक्कम; 1 लाख 26 हजार 607रुपये इतकी होते. त हीच रक्कम 21 वर्षांनंतर; 2 लाख 11 हजार चारशे वीस रुपये इतकी मिळते. याचाच अर्थ असा होतो कि; सुकन्या समृद्धी योजना मध्ये जास्त गुंतवणूक केले 21 वर्षांनंतर मिळणारा परतावा सुद्धा तितकाच जास्त असेल.

सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत खाती उघडता येणे योग्य बँक पुढील प्रमाणे आहेत:-

 1. बँक ऑफ महाराष्ट्र.
 2. कॉर्पोरेशन बँक.
 3. देना बँक.
 4. आयसीआयसीआय बँक
 5. इंडियन बँक.
 6. सेंट्रल बँक ऑफ इंडिया.
 7. कॅनरा बँक.
 8. आयडीबीआय बँक.
 9. इंडियन ओव्हरसीज बँक.
 10. इंडियन बँक.
 11. बँक ऑफ बडोदा.
 12. आंध्रा बँक.
 13. ॲक्सिस बँक.
 14. स्टेट बँक ऑफ म्हैसूर.
 15. स्टेट बँक ऑफ हैदराबाद.
 16. त्रावणकोर बँक.
 17. पंजाब नॅशनल बँक.
 18. युनायटेड बँक ऑफ इंडिया.
 19. युको बँक.
 20. स्टेट बँक ऑफ पटियाला.
 21. पंजाब अँड सिंध बॅंक.

 

सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत खाते कसे उघडावे.

सर्वप्रथम सुकन्या समृद्धी योजना मध्ये खाते उघडण्यासाठी, अर्जदाराला ऑनलाइन पद्धतीने विहित नमुन्यातील अर्ज, हा डाऊनलोड करून घ्यावा लागेल.

सदरील अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती भरून त्यासोबत मागितलेल्या प्रत्येक कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती या अर्जासोबत जोडावे लागतील.

सदरील पूर्णपणे भरलेला अर्ज कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेमध्ये करावा लागेल. बँकेमार्फत संपूर्ण पत्रांची पडताळणी केली जाईल, व सदरील  खात्यासाठी आवश्यक असलेल्या; कमीत कमी अडीचशे रुपये इतकी रक्कम भरल्यानंतर बँकेकडून पासबुक मिळेल.

व उघडलेल्या खात्यामध्ये पंधरा वर्षापर्यंत पैसे जमा करता येतील.

या योजनेमध्ये पोस्टात खाते उघडायचे असेल तर; ऑनलाइन पद्धतीने अर्ज डाऊनलोड करून किंवा आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिस मधून या योजनेचा घेता येईल.

संबंधित अर्जात संपूर्ण माहिती व मागितलेल्या संपूर्ण कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती जोडून हा अर्ज पोस्ट ऑफिसमध्ये जमा करावा लागेल.

त्यानंतर नियमानुसार अडीचशे रुपये भरल्यानंतर पोस्ट मधून एक पासबुक मिळेल.

बँकेप्रमाणे यातही पंधरा वर्षापर्यंत पैसे जमा करता येतील.

अशाप्रकारे पोस्ट ऑफिस आणि बँक दोन्ही माध्यमातून सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेता येईल.

थोडक्यात,

सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत मिळणारे लाभ, या योजनेचे फायदे, त्याचबरोबर या योजनेसाठी लागणारे कागदपत्र, उद्दिष्ट आणि कोणत्या बँकांमार्फत योजनेचा लाभ घेता येतो याविषयी सविस्तर माहिती आपण पाहिली.

केंद्र राज्य शासनाच्या आज या योजनेविषयी आपणास माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. आम्ही सदरील योजना आपल्या पर्यंत लवकरात लवकर पोहोचू.

तुमच्या काही सूचना असतील तर त्याही आम्हाला कळवा, व अशाच महत्वाच्या अपडेट साठी आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.

 

updates a2z