Educational Updates:ऑनलाईन परीक्षा अर्ज करण्याची अंतिम तारीख पुढे ढकलली

Educational-Updates

 

जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 5वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 8वी) पुढील वर्षी 12 फेब्रुवारी 2023 रोजी होणार आहे. 5वी व 8वी च्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी..

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने इयत्ता पाचवीच्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व इयत्ता आठवीच्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचे ऑनलाइन आवेदनपत्र भरण्यासाठी .

अगोदर पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 5वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 8वी) या परीक्षेसाठी शाळा माहिती प्रपत्र व ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 20 डिसेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

शासनमान्य शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्र ठरतात. 5वी व 8वी च्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी..

या मुदतवाढी संदर्भातील परिपत्रक आज विभागाद्वारे प्रकाशित करण्यात आले आहे.शिष्यवृत्ती परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ केली असून ती राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 5वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 8वी) पुढील वर्षी 12 फेब्रुवारी 2023 रोजी होणार आहे.

 

▪️ ऑनलाईन अर्ज करण्यास व नियमित शुल्क भरण्यास उशीर झाल्यास विलंब शुल्क आकारण्यात येणार आहे.

विलंब शुल्क 21 डिसेंबर ते 25 डिसेंबर 2022 दरम्यान भरावे लागणार आहे. तर अतिविलंब शुल्क 26 ते 31 डिसेंबर 2022 दरम्यान भरावे लागणार आहे.

हेही पाहा: महाराष्ट्रात नव्या प्रकल्पाची 35000 कोटीची गुंतवणूक 11 क्षेत्रात नवीन रोजगार

Scholarship on-line application करण्यासाठीं अंतिम तारीख: 

या परीक्षेचे ऑनलाइन आवेदनपत्र भरण्यासाठी 15 डिसेंबरपर्यंत अंतिम मुदत दिली होती.

काही शाळांनी ऑनलाईन माहिती आणि अर्ज भरले नसल्या कारणाने ही मुदतवाढ देण्यात आली असून आता संबंधित शाळांनी आपली माहिती व अर्ज दिलेल्या मुदतीत भरण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे उपायुक्त संजयकुमार राठोड यांनी केले आहे.

गुणवत्ता यादीत येणार्‍या विध्यार्थ्यांना किती असेल शिष्यवृत्ती :

शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालात गुणवत्ता यादीत येणार्‍या इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना इयत्ता सहावी ते आठवीपर्यंत दरमहा 100 रुपये शिष्यवृत्ती दिली जाते.

तर आठवीच्या विद्यार्थ्यांना दोन वर्षे म्हणजेच दहावीपर्यंत दरमहा 150 रुपये शिष्यवृत्ती मिळते.

 

Leave a Comment

updates a2z