सन २०२५-२६ या वर्षामध्ये राज्यातील सर्व शाळा, विद्यार्थी व शिक्षकांची माहिती दि.३०/०९/२०२५ पर्यंत अद्ययावत करुन अंतिम करणेबाबत मार्गदर्शक सूचना shikshak mahiti updation shasan nirnay
संदर्भ:
शासन निर्णय येथे पहा pdf download
१) केंद्र शासनाचे पत्र क्र. D.O.No. २३-२/२०२५-Stats दि. ३०/०४/२०२५.
२) या कार्यालयाचे पत्र क्र. मप्राशिप/सशि/संगणक/U-DISE/२०२५-२६/१५५४ दि.०६/०६/२०२५.
उपरोक्त संदर्भिय पत्रान्वये राज्यातील सर्व शाळा, विद्यार्थी व शिक्षकांची माहिती यु-डायस प्लस प्रणालीत दि. ३० सप्टेंबर, २०२५ पर्यंत अद्ययावत करुन अंतिम करण्यासाठी केंद्र शासनाकडून कळविण्यात आले आहे. केंद्रशासनाकडून शाळा, विद्यार्थी, शिक्षकांची माहिती अद्ययावत करण्यासाठी यु-डायस प्रणाली सुरु करण्यात आलेली आहे. त्यानुसार पुढील प्रमाणे प्रामुख्याने माहिती तपासून कार्यवाही व प्रशिक्षण होणे आवश्यक आहे.
शाळा तपशील :
> दि.१०/०७/२०२५ पासून यु-डायस प्रणालीमध्ये शाळेची भौतिक माहिती अद्ययावत करण्याची सुविधा सुरु करण्यात आलेली आहे.
> शाळा मुख्याध्यापक माहिती शाळेच्या मुख्याध्यापक यांच्या प्रशासकीय कारणास्तव बदल्या होत असतात. त्याअनुषंगाने यु-डायस प्रणालीमध्ये सद्यस्थितीमध्ये कार्यरत असलेले मुख्याध्यापक यांचे नाव, मोबाइल नंबर, ईमेल आयडी प्रथम अद्ययावत करण्यासाठी कळविण्यात यावे. जेणेकरुन, शाळेचे मुख्याध्यापक यांना यु-डायस प्रणालीमध्ये माहिती अद्ययावत करण्यासाठी अडचणी येणार नाहीत.
शाळेचा पत्ता: शाळेच्या मुख्याध्यापकांनी यु-डायस प्रणालीमध्ये अचूक शाळेचा पत्ता, गाव, तालुका, जिल्हा, पिनकोड, Logitutde, Latitude माहिती भरणाऱ्याचे नाव, मोबाइल क्रमांक इत्यादी बाबी अचूक भरल्याचे खात्री करुन घेण्यासाठी आदेशित करावे.
सदर विद्यार्थ्यांना शासनाकडून / इतर माध्यमातून उपलब्ध करुन दिलेले शैक्षणिक साहित्य याची नोंद यु-डायस प्रणालीमध्ये करण्यात यावी.
शासन निर्णय येथे पहा pdf download
> विद्यार्थी आधार: सन २०२४-२५ मध्ये राज्यातील ९५% विद्यार्थ्यांची आधार नोंदणी
झालेली आहे. सन २०२५-२६ या वर्षामध्ये नव्याने समाविष्ट झालेले विद्यार्थी यांचे आधार व्हॅलिडेशन पूर्ण करुन घेण्यात यावे. आधार व्हॅलिडेशन करताना अडचणी येत असल्यास विद्यार्थ्याच्या आधारकार्ड वरील माहिती व नोंदणी करण्यात आलेली माहिती तपासून घेण्यात यावी. तपासणी केल्यानंतरही आधार व्हॅलिडेशन होत नसल्यास विद्यार्थ्याच्या पालकास विद्यार्थ्यांची आधार माहिती आधार केंद्रावर जाऊन अद्ययावत करण्यासाठी कळविण्यात यावे.
> अपार सन २०२४-२५ मध्ये राज्यातील ८६% विद्यार्थ्यांचे अपार नोंदणी शाळास्तरावरुन यु-डायस प्रणालीमध्ये करण्यात आली आहे. विद्यार्थ्याची पूर्ण माहिती अद्ययावत करुन झाल्यानंतर, ज्या विद्यार्थ्यांची अपार नोंदणी झालेली नाही त्या विद्यार्थ्यांचे संमती पत्रक पालकांकडून घेऊन अपार नोंदणीची कार्यवाही शाळास्तरावरुन केंद्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार पूर्ण करण्यात यावी.
शिक्षक तपशील :
> शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळेतील शिकविणाऱ्या सर्व शिक्षकांची अचूक माहिती (शिक्षकाचे नाव, जन्मतारीख, मोबाइल क्रमांक, ईमेल आयडी, शाळेत नियुक्तीची तारीख, शैक्षणिक पात्रता, व्यवसायिक पात्रता, जात संवर्ग, मुख्य शिकविण्याचे विषय, प्रशिक्षण, इत्यादी) भरली असल्याचे खात्री करणे बंधनकारक आहे.
> आधार व्हॅलिडेशन सन २०२४-२५ मध्ये राज्यातील ९३% शिक्षकांचे आधार व्हॅलिडेशन यु-डायस प्रणालीमध्ये पूर्ण झालेले आहे. शिक्षकांची पूर्ण माहिती अद्ययावत करुन झाल्यानंतर, ज्या शिक्षकांची आधार व्हॅलिडेशन करताना अडचणी येत असल्यास त्या शिक्षकांची नोंदविलेली माहिती समान आहे की नाही याची खात्री करुन घेण्यात यावी.
> शिक्षकांचे व्यवसायिक शिक्षण: यु-डायस प्रणालीमध्ये शिक्षकांचे व्यवसायिक शिक्षण D.Ed., B.Ed., M.Ed. इत्यादी झालेले आहे. त्या शिक्षकांची माहिती यु-डायस प्रणाली मध्ये अचूक नोंदविण्यात यावी.
जिल्हास्तरावरुन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा स्तरावरील संगणक प्रोग्रामर यांनी एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करुन सदर कार्यशाळेस जिल्हा व तालुका स्तरावरील अधिकारी यांना उपस्थित राहणेबाबत आदेशित करावे. सदर कार्यशाळेमध्ये सन २०२५-२६ चे प्रपत्र, ऑनलाईन येणाऱ्या अडचणी, वार्षिक नियोजन व अंदापत्रकासाठी माहितीचा उपयोग, PGI याबाबतचे सविस्तर प्रशिक्षण देण्यात यावे.
स्तरावरुन तात्काळ या शाळांशी संपर्क साधून प्रमोशनची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी कळविण्यात यावे, सोबत अहवाल उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
शासन निर्णय येथे पहा pdf download
> विद्यार्थी इयत्ता (नर्सरी, ज्युनिअर, सिनिअर व इयत्ता १ ली मध्ये नोंदविण्याची सुविधा) : दि. ०१ जुलै, २०२५ पासून यु-डायस प्रणालीमधील प्रमोशन पूर्ण झालेल्या शाळांकरीता नर्सरी, ज्युनिअर, सिनिअर व इयत्ता १ ली मध्ये नोंदविण्याची सुविधा यु-डायस प्रणालीमध्ये सुरु केलेली आहे. या सुविधेनुसार शाळेच्या मुख्याध्यापकांनी दि. ३० जुलै, २०२५ पर्यंत विद्यार्थी नोंदविण्याची कार्यवाही पूर्ण करुन घेण्यात यावी.
> इयत्ता दुसरी ते बारावी पर्यंत विद्यार्थ्यांची माहिती अद्ययावत करणे यु-डायस प्रणालीमध्ये सर्व शाळांना प्रमोशन झालेले विद्यार्थी इयत्ता दुसरी ते बारावी पर्यंत या विद्यार्थ्यांची माहिती दि. १० जुलै, २०२५ पासून करण्यात आलेली असून सर्व माहिती दि. ३० जुलै, २०२५ पर्यंत अद्ययावत करण्यासाठी कळविण्यात यावे. यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थ्यांना देण्यात येणारे लाभ-मोफत गणवेश, मोफत पाठ्यपुस्तके, २५% RTE प्रवेश, दिव्यांग विद्यार्थ्यांचा प्रवर्ग, शिष्यवृत्ती, व्यवसाय शिक्षण, जन्म तारीख इत्यादी बाबी अद्ययावत करण्यात यावा.
> ड्रॉपबॉक्स मधील विद्यार्थी: दि. ११/०७/२०२५ रोजीच्या यु-डायस प्रणालीमधील अहवालानुसार राज्यामध्ये २७,९१,५४१ इतके विद्यार्थी दिसून येत आहेत. शाळेच्या सर्व मुख्याध्यापकांना ड्रॉप बॉक्स मधील विद्यार्थी शिकत असलेल्या शाळेमध्ये import करुन घेण्यासाठी आदेशित करावे. ड्रॉपबॉक्स मध्ये शाळेत शिकत असलेला एकही विद्यार्थी राहणार नाही याची दक्षता घ्यावी. याबाबत शिक्षणाधिकारी यांनी आपल्यास्तरावर वेळोवेळी आढावा घेऊन ड्रॉपबॉक्स मध्ये Import करण्यात येणारी संख्या शून्य करण्यात यावी.
> पुर्नप्रवेश विद्यार्थ्यांची माहिती जिल्हास्तरावर पुर्नप्रवेश विद्यार्थ्यांचा अहवाल काढून वेळोवेळी त्याचा आढावा घेण्यात यावा.
> जास्त वय दर्शविलेले विद्यार्थी जिल्हा स्तरावर माहिती अंतिम करतेवेळेस यु-डायस प्रणालीमधून वयोगटानुसार विद्यार्थ्यांची माहिती काढण्यात यावी व त्या माहितीमध्ये वय वर्षे २४ पेक्षा जास्त असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती काढून त्या माहितीची शाळास्तरावरुन तपासणी करण्यात यावी. अशा विद्यार्थ्यांची जन्म तारीख बाबत विचारणा करण्यात येऊन माहिती अद्ययावत करण्यात यावी.
दिव्यांग विद्यार्थी यु-डायस प्रणाली मध्ये दिव्यांगाचे २१ प्रकारामध्ये माहिती नोंदविता येते. शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळेमध्ये असलेले दिव्यांग विद्यार्थी यांची माहिती योग्यत्या २१ Disability प्रकारात नमूद करण्यासाठी कळविण्यात यावे.
शाळा अभ्यासक्रम शाळेच्या मुख्यापकांनी शाळेमध्ये शिकविलेला अभ्यासक्रम कोणत्या बोर्डाचा आहे व त्याचा Affilation of Board अचूक भरले असल्याची खात्री करावी.
>
शासन निर्णय येथे पहा pdf download
पूर्व प्राथमिक : शाळेला पूर्व प्राथमिक वर्ग असल्यास त्याची नोंद करुन यु-डायस प्रणालीमध्ये माहिती भरण्यासाठी कळविण्यात यावी.
> शाखा : उच्च माध्यमिक शाळांमध्ये असलेल्या शाखांची माहिती अचूक नोंदविण्यासाठी कळविण्यात यावी.
> भौतिक सुविधा : शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळेमध्ये असलेल्या भौतिक सुविधांची माहिती/अद्ययावत (शाळेची इमारत, मुला व मुलींकरीता स्वच्छतागृह, शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, लायब्ररी, विद्युत सुविधा, रॅम्प, क्रीडांगण, संरक्षक भिंत, संगणकीय साहित्य, प्रयोगशाळा, इत्यादी) झालेल्या सुविधांची माहिती अचूक भरल्याचे खात्री करुन घेण्यासाठी आदेशित करावे.
> आयसीटी / स्मार्ट क्लासरुम समग्र शिक्षा योजनेतून संगणक प्रयोगशाळा निर्मिती करुन ५ वर्षेपेक्षा जास्त झाले असल्यास/साहित्य बंद असल्यास अशा शाळेमधील संगणकीय साहित्य, शासन निर्णय दि. ०१ ऑगस्ट, २०११ नुसार निर्लेखित करुन सदर शाळेमध्ये संगणक प्रयोगशाळा नसल्याचे नोंद करण्यात यावी.
> PGI निर्देशांक: केंद्रशासनाकडून PGI निर्देशांक काढण्यात येतो. निर्देशांक काढताना विचारात घेतलेल्या सर्व दर्शकाची माहिती यु-डायस प्रणालीमध्ये अचूक भरले असल्याचे कळविण्यात यावे.
> इंटरनेट सुविधा: शाळांमध्ये उपलब्ध असलेल्या सुविधेची माहिती अचूक भरण्यासाठी कळविण्यात यावे.
विद्यार्थी तपशील :
> सन २०२५-२६ या वर्षापासून यु-डायस व सरल प्रणालीमधील माहितीचे एकत्रीकरण करण्याची कार्यवाही सुरु झालेली आहे. यु-डायस प्रणालीमध्ये नोंदविलेली विद्यार्थ्यांची माहिती ऑनलाईन पद्धतीने सरल पोर्टलमध्ये समावेश करण्यात येईल. यु-डायस प्रणालीमध्ये राज्यातील सर्व विद्यार्थ्यांची माहिती शाळानिहाय नोंदणी करणे आवश्यक आहे. एकही विद्यार्थी शाळाबाहय राहणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.
प्रमोशन : यु-डायस प्रणालीमध्ये प्रमोशनची कार्यवाही दि. ३० जून, २०२५ पर्यंत सर्व जिल्हा कार्यालयांना कळविण्यात आले होते. त्यानुसार दि. ११/०७/२०२५ रोजीच्या अहवालानुसार १८५ शाळांची माहिती अद्ययावत करणे बाकी आहे. जिल्हा यु-डायस प्रणालीमध्ये जिल्हयातील सर्व शाळांची माहिती दि. ३० सप्टेंबर, २०२५ पर्यंत अद्ययावत करुन अंतिम माहिती ऑनलाईन पद्धतीने राज्य कार्यालयास पाठविण्याकरीता आपल्या स्तरावरुन संबंधितांना आदेशित करावे.
शासन निर्णय येथे पहा pdf download