अत्युत्कृष्ट कामासाठी आगाऊ वेतनवाढबाबत one extra increment for good work 

अत्युत्कृष्ट कामासाठी आगाऊ वेतनवाढबाबत one extra increment for good work 

अत्युत्कृष्ट कामासाठी आगाऊ वेतनवाढ प्रकरणी मा. उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल अवमान याचिका तात्काळ कार्यवाही करण्याबाबत

.. अवमान याचिका क्र.८५३/२०२३, क्र.५८७/२०२३ क्र.८६१/२०२३, क्र.८६५/२०२३, क्र.८६८/२०२३, क्र.८६९/२०२३, क्र.४४०/२०२३, क्र.२७८/२०२२, क्र.१०/२०२२, क्र.१४/२०२२, क्र.५७५/२०२२, क्र.८४३/२०२४, क्र.२८४/२०२४, क्र.२५७/२०२४, क्र.९८/२०२४ व क्र.२४५/२०२३

संदर्भ:- सहायक सरकारी वकील, मा. उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद यांचेकडील दिनांक ३१.०७.२०२५ रोजीचे पत्र

महोदय,

उपरोक्त विषयांकीत प्रकरणी सहायक सरकारी वकील, मा. उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद यांचे दिनांक ३१.०७.२०२५ रोजीचे पत्र सोबत जोडले आहे.

२. अत्युत्कृष्ट आगावू वेतनवाढी संदर्भात मा. उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल अवमान याचिकांच्या अनुषंगाने दिनांक ३०.०७.२०२५ रोजी सुनावणी झाली असून पुढील सुनावणी दि.२०.०८.२०२५ रोजी ठेवण्यात आली आहे. त्यानुषंगाने पुढील सुनावणीपर्यंत अत्युत्कृष्ट कामासाठी मंजूर आगावू वेतनवाढीसंदर्भात मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अंमलबजावणी करण्याबाबत सहायक सरकारी वकील यांनी दि.३१.०७.२०२५ च्या पत्रानुसार कळविले आहे.

३. अत्युत्कृष्ट कामासाठी आगाऊ वेतनवाढ प्रकरणी मा. उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल अवमान याचिकांप्रकरणी मा. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे अनुपालन करण्याबाबत शासन स्तरावरुन सूचना देण्यात आल्या आहेत. (प्रती सोबत जोडल्या आहेत.) त्यानुषंगाने आपल्या स्तरावरुन सुधारीत वेतननिश्चितीचे आदेश निर्गमित केले आहेत किंवा कसे, याबाबतचा अनुपालन अहवाल अद्याप शासनास अप्राप्त आहे.

सदर अवमान याचिकांप्रकरणी तात्काळ सुधारीत वेतननिश्चितीबाबतचे आदेश निर्गमित न केल्यास मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन यांच्या नावे नोटीस निर्गमित होवू शकते. याबाबीचे गांभीर्य लक्षात घेवून दि.०८.०८.२०२५ रोजी पर्यंत मा. उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करुन आदेश निर्गमित करण्याची कार्यवाही करावी व त्याबाबतचा अनुपालन अहवाल शासनास सादर करावा.

Related posts:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *