शरीर संबंध ठेवण्यास तरुणीचा नकार पिडीतेची अश्लील फोटो व्हायरल

शरीर संबंध ठेवण्यास तरुणीचा नकार

पिडीतेची अश्लील फोटो व्हायरल

 

 

 

 

 

राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अनैतिक संबंधातून खुनाच्या घटनाही समोर येत आहेत. नाशिकमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शरीर सुखाची मागणी केल्यानंतर मुलीने नकार दिल्याने धक्कादायक कृत्य करण्यात आले. या मुलीचा अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची घटना समोर आली आहे.

 

 

काय आहे संपूर्ण प्रकरण-

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी आरोपी रोहन बंजारा (रा. नंदुरबार) याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 1 जून ते 19 सप्टेंबर दरम्यान घडल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपी रोहन बंजारा याने टाकळी परिसरातील एका फ्लॅटमध्ये पीडितेला गाठले आणि तिच्याकडे शारीरिक सुखाची मागणी केली. मात्र, पीडितेने आरोपीची मागणी फेटाळून लावली. यानंतर संशयित रोहन बंजारा याने तिला तिचा न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली होती.

हेही वाचा: मालगाडी अंगावर जाऊनही तरुण जिवंत अंगावर शहारे आणणारा Video Viral

 

कॉलेजमध्ये शिकत असताना पीडित मुलगी आणि आरोपी यांची भेट झाली होती. आरोपी नाशिकमध्ये पदवी मिळवण्यासाठी आला होता. काही महिन्यांपासून दोघांमध्ये जिव्हाळ्याचे संबंध होते. पण कालांतराने दोघांचे मार्ग वेगळे झाले. त्यानंतर आरोपीने पीडितेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आणि सोशल मीडियावर बदनामीची धमकी दिली. पीडितेने तिला भेटण्यास नकार दिल्याने संशयिताने पीडितेचे फोटो आणि मेसेज इन्स्टाग्रामवर सात बनावट अकाउंटवरून व्हायरल केले आणि व्हॉट्सअॅपवर पीडितेच्या नातेवाईक आणि मित्रांचा विनयभंग केला. या प्रकरणी रोहनविरुद्ध भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: लाच मागणाऱ्या अधिकाऱ्याला पैसे म्हणून दिले कपडे काढून, पहा संपुर्ण प्रकार

 

एवढेच नाही तर त्याने तिच्या मोबाईलवरून पीडितेचे अश्लील फोटो आणि मेसेज तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पीडितेच्या मित्र-मैत्रिणींना आणि भाऊ-बहिणीला पाठवले. याप्रकरणी पीडितेने भद्रकाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी रोहन बंजाराविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ठाकूर अधिक तपास करत आहेत.

Related posts:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *