प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शाळांमध्ये परसबाग उपक्रमास प्रोत्साहन देण्याकरीता स्पर्धा आयोजित करण्याबाबत pm poshan mid day meal parasbag upkram competition in school
प्रस्तावना:-
परसबाग उपक्रम स्पर्धा शासन निर्णय येथे पहा
केंद्र शासनाने प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शाळांमध्ये परसबागा निर्माण करुन सदर परसबागांमधून उत्पादित भाजीपाला व इतर पदार्थांचा समावेश शालेय पोषण आहारामध्ये करण्याचे निर्देश दि. १५ ऑक्टोबर, २०१९ रोजीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दिले आहेत. त्यानुषंगाने विद्यार्थ्यांनी परसबागेत पिकवलेला भाजीपाला, फळे इत्यादींचा समावेश शालेय पोषण आहारात करुन विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यात येत आहे. परसबाग निर्मितीमुळे विद्यार्थ्यांची निसर्गाशी जवळीक निर्माण होवून त्यांना नवनिर्मितीचा आनंद मिळणे, ताज्या भाजीपाल्याचा समावेश पोषण आहारात होवून विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार उपलब्ध होणे असे विविध चांगले हेतू या उपक्रमामुळे साध्य होत आहेत, प्रस्तुत योजनेंतर्गत परसबाग उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी मागील शैक्षणिक वर्षामध्ये शासनाने उत्कृष्ट परसबाग स्पर्धा आयोजित केली होती. त्याचा परिणाम म्हणून राज्यामधील
शासन निर्णय क्रमांकः शापोआ-२०१८/प्र.क्र.१७१/एस.डी.३/११४००९२
सुमारे ६८,७०४ शाळांमध्ये परसबागा निर्माण झालेल्या आहेत. राज्यातील सर्व शाळांमध्ये परसबागा निर्माण करण्याचे उद्दिष्ट निर्धारित केले आहे. त्यानुषंगाने राज्यामध्ये प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षामध्येही पसरबाग उपक्रमास प्रोत्साहन देण्याकरीता परसबाग स्पर्धांचे आयोजन करण्याची बाब विचाराधीन होती.
शासन निर्णय :-
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत राज्यातील सर्व पात्र शाळांमध्ये परसबागा निर्माण करण्यास प्रोत्साहन मिळण्यासाठी खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहेत.
1. राज्यातील सर्व शाळांमध्ये परसबागा निर्माण करुन सदर परसबागांमधून उत्पादित ताजा भाजीपाला यांचा वापर शालेय पोषण आहारामध्ये करण्यात यावा.
ii. प्रस्तुत उपक्रमाकरीता शाळांनी नजिकचे कृषि विज्ञान केंद्र, कृषि शाळा, कृषि विभागातील कृषि सहायक / पर्यवेक्षक, कृषि क्षेत्रात काम करणाऱ्या अशासकीय संस्था (NGO), सेंद्रिय शेती करणारे पालक, शेतकरी, कृषि तज्ज्ञ यांचे मार्गदर्शन व सहकार्य घेण्यात यावे.
iii. राज्यात उत्कृष्ट परसबागा तयार होण्यासाठी सदर परसबाग उपक्रमास प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. याकरीता उत्कृष्ट परसबाग स्पर्धांचे तालुका व जिल्हास्तरावर आयोजन करण्यात यावे. त्यादृष्टीने उत्कृष्ट परसबाग स्पर्धेकरीता खालीलप्रमाणे बक्षिसांची रक्कम निश्चित करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
तालुका स्तरावरील स्पर्धेचे मूल्यांकन करुन माहे ऑक्टोंबर, २०२५ अखेर तालुका स्तरीय विजेत्या शाळांची नावे संबंधित गटशिक्षणाधिकारी/अधिक्षक (शापोआ) यांनी घोषित करावीत. तसेच, तालुका स्तरावरील प्रथम क्रमांक विजेत्या शाळेतील परसबागेची तपासणी करुन जिल्हास्तरीय स्पर्धेचा अंतिम निकाल नोव्हेंबर, २०२५ अखेर जाहीर करण्याची जबाबादारी संबंधित जिल्ह्यांचे शिक्षणाधिकारी (प्राथ) यांची राहील.
i. सदर स्पर्धा विहित कालमर्यादेत पूर्ण होण्यासाठी क्षेत्रिय स्तरावर आवश्यक त्या सविस्तर सूचना देण्याची कार्यवाही शिक्षण संचालक (प्राथ) महाराष्ट्र, राज्य, पुणे यांनी करावी.
vi. प्रस्तुत उपक्रमाकरीता येणारा खर्च सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाकरीता केंद्र शासनाने योजनेंतर्गत व्यवस्थापन, संनियंत्रण व मुल्यमापन (MME) या घटकासाठी मंजूर केलेल्या निधीमधून अदा करण्यास शिक्षण संचालक (प्राथ.) यांना मान्यता देण्यात येत आहे. विजेत्या शाळांना त्यांची बक्षिसाची रक्कम माहे डिसेंबर, २०२५ अखेर अदा करण्याची दक्षता शिक्षण संचालक (प्राथ.) यांनी घ्यावी.
प्रस्तुत शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०२५०६०५१४५२३९४५२१ असा आहे. सदर शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
Related posts:
विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असलेली शिक्षण श...
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योज...
समग्र शिक्षा अंतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत पायाभूत चाचणी २०२५-२६ आयोजनाबाबत payabh...
शिक्षकांच्या सेवाज्येष्ठता सूची व पदोन्नतीबाबत shikshak sevajeshthata suchi padonnatti shasan paripa...
राज्य मंडळाच्या सर्व शाळांमध्ये "आनंददायी शनिवार" हा उपक्रम राबविणेबाबत anandadayi shanivar upkram h...
इ.३ री ते १० वी साठी शालेय शिक्षण अभ्यासक्रम (प्रस्तावित) मसुदा- २०२५ ठळक वैशिष्ट्ये shaley shikshan...
भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिन समारंभ शुक्रवार, दिनांक १५ ऑगस्ट, २०२५ शासन परिपत्रक independence day ...
महाराष्ट्र राज्याची अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्गाची...
आनंददायी शनिवार कृतिपुस्तिका इयत्ता पहिली ते आठवी anandadayi shanivar krutipustika first to eighth s...
शिस्तभंगविषयक कारवाई मध्ये ई-मेल व व्हॉट्सअॅपचा वापर करण्याबाबत shistbhang vishayak email what's app