शिक्षकांच्या सेवाज्येष्ठता सूची व पदोन्नतीबाबत shikshak sevajeshthata suchi padonnatti shasan paripatrak
राज्यातील खाजगी शाळा व्यवस्थापनाच्या माध्यमिक शाळांमधील शिक्षकांच्या सेवाज्येष्ठता व पदोन्नतीबाबत दि.१३.१०.२०१६, दि.२४.०१.२०१७ तसेच दि.१४.११.२०१७ च्या शासन परिपत्रकान्वये सूचना पारित करण्यात आलेल्या आहेत.
मा. सर्वोच्च न्यायालयाने सिव्हील अपील क्र.७६९९/२०१४ तसेच विशेष अनुज्ञा याचिका क्र.१३४२९/२०१७ मध्ये दिलेल्या निर्णयास अनुसरुन शिक्षकांच्या सेवाज्येष्ठतेबाबतचे निकष महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१ मधील संबंधित तरतूदीस अनुसरुन तपासण्याची बाब शासन स्तरावर विचाराधीन आहे. यास्तव, शिक्षकांच्या सेवाज्येष्ठता व पदोन्नतीबाबत सर्व संबंधित प्राधिकाऱ्यांना खालीलप्रमाणे कार्यवाही करण्याचे सूचित करण्यात येत आहे:-
१) शिक्षकांच्या सेवाज्येष्ठता व पदोन्नती संदर्भात शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत, माध्यमिक शाळेमधील शिक्षक संवर्गात उक्त नियमावली, १९८१, अनुसूची “फ” नुसार “क” प्रवर्गात मोडणाऱ्या शिक्षकांच्या पदोन्नतीची कार्यवाही तात्पुरत्या स्वरुपात स्थगित करण्यात यावी.
२) दरम्यानच्या कालावधीकरीता माध्यमिक शाळेमधील आर्थिक व दैनंदिन कार्यालयीन कामकाज पार पाडण्याकरीता संबंधित शाळेतील सेवाज्येष्ठ असलेल्या शिक्षकास प्रभारी मुख्याध्यापक म्हणून मुख्याध्यापक पदाचा कार्यभार नियमानुसार सोपविण्यात यावा.
वरीलप्रमाणे सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी आपल्या स्तरावरुन करण्याची दक्षता घेण्यात यावी.