शिक्षकांच्या ज्येष्ठतासूची बाबत shikshak jeshthata suchi
संदर्भ :- शासन परिपत्रक क्र. संकिर्ण-२०१६/प्र.क्र.३२०/टीएनटी-१, दि.०३/०५/२०१९ (प्रत संलग्न)
शासनाने शिक्षकांच्या ज्येष्ठता सुचीबाबत उपरोक्त शासन परिपत्रक पहावे.
पदवीधर शिक्षकांच्या ज्येष्ठतासूचीबाबत शासनाने दि.१४ नोव्हेंबर, २०१७ आणि २४ जानेवारी, २०१७ च्या परिपत्रकान्वये कार्यपध्दती विहित केलेली होती. सदर परिपत्रकास मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे रिट याचिका क्र.१४२४२/२०१८ व इतर अनुषंगिक याचिकांअन्वये आव्हानित करण्यात आले होते. त्या अनुषंगाने शासनाने मा. न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षकांची सेवाज्येष्ठतेबाबतची दि.१४ नोव्हेंबर, २०१७ आणि २४ जानेवारी, २०१७ची परिपत्रके उपरोक्त संदर्भाकित शासन परिपत्रकान्वये अधिक्रमित केली आहेत. व खाजगी शाळेतील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांची सेवाज्येष्ठता महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१, नियम १२ मधील अनुसूची “फ” मधील तरतुदीनुसार निश्चित करण्याबाबत व मा.उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची सेवाजेष्ठता संबंधित शिक्षक त्या त्या प्रवर्गात समावेश झाल्याच्या दिनांकापासुन ठरविण्याबाबत उपरोक्त संदर्भाकित शासन परिपत्रक निर्गमित केलेले आहे. शिक्षकांच्या सेवाजेष्ठतेबाबत उपरोक्त संदर्भाकित परिपत्रकामध्ये शासनाने दिलेल्या निर्देशानुसार आवश्यक ती कार्यवाही आपले स्तरावरुन करण्यात यावी.