सन २०२५-२६, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या संच मान्यता करणेबाबत shala sanchmanyata paripatrak 

सन २०२५-२६, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या संच मान्यता करणेबाबत shala sanchmanyata paripatrak 

संदर्भः- मा. शिक्षण संचालक (प्राथमिक/माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांचे पत्र क्र. प्राशिसं/सं.मा./२५ /टे-५००/३७०२ दिनांक १९/०८/२०२५

उपरोक्त संदर्भिय विषयाच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की, सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासुन सरल पोर्टल व युडायस प्लस या दोन्ही पोर्टलवरील महिती वेगवेगळी न भरता ती एकाच पोर्टलला भरण्याची सुविधा दिलेली आहे. त्यानुसार युडायस प्लस पोर्टल वरच विद्यार्थी माहिती पुर्ण करण्यात यावी. संच मान्यतेसाठी ऑनलाईन प्रणालीमध्ये युडायस प्लस वरील माहितीच्या आधारे संच मान्यता करण्यात येणार आहे.

सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाची सम्च मान्यता दिनांक ३०, सप्टेंबर २०२५ अखेरची पटावरील नोंद झालेल्या पैकी आधार वैध विद्यार्थी संख्या विचारात घेवून संच मान्यता करण्यात येणार आहेत. दिनांक ३०.०९.२०२५ नंतर आधार वैध झालेले विद्यार्थी संख्या व नव्याने नोंदणी झालेली विद्यार्थी संख्या संच मान्यता अथवा संच मान्यता दुरुस्तीसाठी ग्राह्य धरण्यात येणार नाही.

सन २०२५-२६ या वर्षाची संच मान्यता करताना ३० सप्टेंबर २०२५ अखेरची पटावरील नोंद विचारत गेतना विद्यार्थी वयानुरुप वर्गात प्रवेश घेतलेला असेल याची खात्री करण्यात यावी.

शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) व गटशिक्षणाधिकारी यांनी संच मान्यतेच्या अनुषंगाने पटावरील विद्यार्थी नोंदी आधार वैध पडताळणीचे कामकाज दिनांक ३०, सप्टेंबर २०२५ अखेर किंवा दिनांक ३०.०९.२०२५ च्या तत्पुर्वी पूर्ण करण्यात यावेत. अधिकचा कालावधी देता येणार नाही याची दक्षता घ्यावी हि बाब आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांच्या निदर्नास तातडीने आणून द्यावी.

Related posts:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *