सरल प्रणाली व यु-डायस प्लस प्रणाली एकत्रिकरणाबाबत udise plus saral pranali ekatrikaran shasan paripatrak
संदर्भ : मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण विभाग, यांची राज्यस्तरीय आढावा बैठक दि.३०.०५.२०२५
मा. प्रधान सचिव, (शालेय शिक्षण) यांच्या राज्यस्तरीय आढावा बैठक दिनांक ३०.०५.२०२५ रोजी विषय क्र. १३ अन्वये एनआयसी पुणे यांचे व्दारे सरल पोर्टलचे एकत्रिकरणाअंतर्गत सरल प्रणाली व युडायस प्लस प्रणालीचे एकत्रिकरणबाबत एनआयसी पुणे व एनआयसी दिल्ली यांनी तातडीने आवश्यक कार्यवाही करणेबाबत निर्देश प्राप्त आहे.
एनआयसी पुणे यांच्यास्तरावर यु-डायस प्लस व सरल पोर्टलवरील एकत्रिकरणाची कार्यवाही सुरु आहे. त्यानुसार सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून ऑनलाईन प्रणालीमध्ये यु-डायस प्लस वरील माहितीच्या आधारे संच मान्यता व इतर ऑनलाईन प्रणालीवरील कार्यवाही करण्यात येणार आहे.
तद्नुषंगाने सरल पोर्टल वरील स्कूल पोर्टल, स्टुडंट पोर्टल, संच मान्यता पोर्टल व स्टाफ पोर्टलवरील व युद्धायस प्लस वरील तपशील तातडीने आवश्यकतेनुसार अद्यावत करण्यात यावा, जेणे करुन यु-डायस प्लस व सरल पोर्टलवरील माहितीमध्ये तफावत येवून ऑनलाईन कार्यवाही करताना तांत्रिक अडचणी निर्माण होणार नाही याच्या अनुषंगाने दक्षता घ्यावी. सदरची कार्यवाही दि.२२.०८.२०२५ पर्यंत करण्यात येवून त्याबाबतचा अहवाल संचालनालयास दि.२५.०८.२०२५ रोजी सादर करावा.