प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या पूरक आहारामध्ये बेदाण्याचा समावेश करणे बाबत pm poshan mdm new update mid day meal in school 

प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या पूरक आहारामध्ये बेदाण्याचा समावेश करणे बाबत pm poshan mdm new update mid day meal in school 

संदर्भ :- शालेय शिक्षण विभाग पत्र आशवा-२०२४/प्र.क्र. ११/एस.डी.३ दि. ०२.०२.२०२४.

प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण (पूर्वीची शालेय पोषण आहार) योजनेंतर्गत सद्यस्थितीत तादळापासून बनविलेल्या पाककृतीच्या स्वरुपात नियमित आहाराचा लाभ विद्यार्थ्यांना देण्यात येतो. तसेच, सदर नियमित आहारासोवत अन्न शिजविणाऱ्या यंत्रणांनी आठवड्यातून किमान एक दिवस विद्यार्थ्यांना फळे, सोयाविस्कीट, दूध, चिक्की. राजगीरा लाडू, गुळ, शेंगदाणे, वेदाणे, चुरमुरे इ. स्वरुपात पूरक आहार देण्याचे निर्देश शासन निर्णय दि.०२ फेब्रुवारी, २०११ अन्वये दिले आहेत.

राज्यामध्ये सद्यस्थितीमध्ये योजनेस पात्र सर्व शाळांमधून आठवड्यातून एक दिवस अंडी व केळी उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात द्राक्ष उत्पादन होत आहे. राज्यातील काही शाळा विद्यार्थ्यांना आठवड्यातून एक दिवस पूरक आहारामध्ये बेदाण्याचा लाभ देत आहेत. त्यानुषंगाने आपणास कळविण्यात येते की, प्रस्तुत योजनेंतर्गत शासन निर्णय दि.०२ फेब्रुवारी, २०११ मध्ये नमूद केल्यानुसार नियमित आहारासोबत आठवड्यातून एक दिवस पूरक आहार म्हणून फळे, सोयाविस्कीट, दूध, चिक्की, राजगीरा लाडू, गुळ, शेंगदाणे, बेदाणे, चुरमुरे इ. स्वरुपात लाभ देण्याबाबत आपल्या स्तरावरुन पुनःश्च सर्व शाळा / केंद्रीय स्वयंपाकगृह संस्थांना लेखी निर्देश देण्यात याव्यात.

Related posts:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *