महाराष्ट्र राज्याची अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्गाची यादी maharashtra state anusuchit caste yadi
शासन परिपत्रक येथे पहा pdf download
महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्गाची दिनांक २५ जून, २००८ रोजी यादी अद्ययावत करण्यात आली असून ती जाती प्रमाणपत्र देणा-या व त्याची पडताळणी करणा-या सक्षम प्राधिका-यांना तसेच मागासवर्गीयाचे लाभ लागू करताना सदरहू यादीचा उपयोग व्हावा याकरीता सुलभ संदर्भासाठी जाती जमातींचे एकत्रित संकलन स्वरुपात यादी असून ती यादी शासनाच्या खालील नमूद संकेतस्थळावर ठेवण्यांत आली आहे.
२. वरील यादी ही संकलन स्वरुपात असुन मागासवर्गीय जाती जमातीच्या निश्चितीसाठी तसेच त्या त्या मागासप्रवर्गाचे लाभ लागू करताना सदर जाती जमाती ज्या राष्ट्रपतींच्या आदेशान्वये वा शासन निर्णय वा आदेशाव्दारे त्यांचा समावेश केलेला आहे ते आदेश ग्राह्य धरण्यात यावे.
शासन परिपत्रक येथे पहा pdf download
३. सदर यादी महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर टाकण्यात आली असून त्याचा संकेताक क्रमांक २००८०९२६१४४३०५००१ असा आहे. संदर यादी सर्व जनतेसाठी खुली असून सदरहू वेबसाईट वरुन तीचे अवलोकन करावे वा प्रत् प्राप्ति करुन घ्यावी.
शासन परिपत्रक येथे पहा pdf download