Communicative English – Future Readiness (CEFR) कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षणासाठी शिक्षकांना कार्यमुक्त करणेबाबत.
संदर्भ : १) राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचे पत्र ४९.०१/१०/२०२५- English दि. २४.०७.२०२५
२) प्रादेशिक विद्या प्राधिकरण छ. संभाजीनगर यांचे पत्र दि. ०४/०८/२०२५
३) कोटक एज्युकेशन फाउंडेशन यांचे पत्र KEF/GL/२०२५-२६/००३ डी. १७ जुलै २०२५
उपरोक्त संदर्भीय विषयांन्वये Communicative English Future Readiness (CEFR) हा कार्यक्रम
इयत्ता ५ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना संवादात्मक इंग्रजी व २१ व्या शतकातील कौशल्ये प्रदान करण्याच्या उद्देशाने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अंबाजोगाई व कोटक एज्युकेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.
सदर कार्यक्रमांतर्गत खाली दिलेल्या नियोजनाप्रमाणे तज्ञ शिक्षकांच्या प्रशिक्षणाचे आयोजन बीड व अंबाजोगाई येथे करण्यात आले आहे. करिता सोबत दिलेल्या नियोजनाप्रमाणे सकाळी ९.०० वाजे पर्यंत प्रशिक्षणस्थळी उपस्थित राहण्यासाठी शिक्षकांना आपल्या स्तरावरून कार्यमुक्त करण्यासाठी आदेशित करण्यात यावे.
या प्रशिक्षणासाठी प्रत्येक केंद्रातून एक इंग्रजी शिक्षक मास्टर ट्रेनर म्हणून असणे अपेक्षित आहे. यास्तव आपल्या तालुक्यातील प्रत्येक केंद्रातून एक शिक्षक प्रशिक्षणासाठी उपस्थित राहतील याची दक्षता घ्यावी.