काय असतो CA तसेच CA चं काम काय असतं:
:
Long Form of CA ( Chartered Accountant ) सीए( CA) अर्थात चार्टर्ड अकाऊंटंट (Chartered Accountant ) हा करिअरचा एक उत्तम पर्याय मानला जातो.
CA हा कोर्स करण्या साठी तुम्हाला ICAI ( Institute of Chartered Accountants of India (ICAI)) या CA च्या इन्स्टिट्यूट मध्ये प्रवेश घ्यावा लागतो . सीए कोणतीही कॉलेज मध्ये मिळणारी पदवी नाही .
CA सीएचं काम:
CA सीए टॅक्स रिटर्न्स ( Tax return)भरतो त्याचबरोबर सध्याच्या वाढत्या औद्योगिकीकरणात सीए विविध प्रकारची कामं करू शकतात. व्यावसायिक भाषेत सीएला फायनान्शियल डॉक्टर ( Financial Doctor) म्हटलं जातं; तसेच व्यवसायाच्या दृष्टीने देखील सीए महत्त्वाचा असतो. व्यवसायातील नफा-तोटा आणि व्यवसायावर अप्रत्यक्षपणे नजर ठेवण्याचे जोखमीचे काम त्याला करावे लागते. पूर्णवेळ, अर्धवेळ अशा दोनही स्वरूपांत काम करता येते. इन्कम टॅक्स( Income tax), व्हॅट, सर्व्हिस टॅक्स( Service tax) आणि एलबीटी( LBT) आदी करांसंबंधीची महत्त्वाची कामे CA सीए करतो.
सीए CA झाल्यावर नक्की काय करावं:
CA सीए पूर्ण झाल्यावर तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करू शकतात. एकाद्या मोठ्या कंपनीत सीएफओ( CFO), मॅनेजर( Manager)अशा मोठया पोस्ट वर काम करू शकतात.ते शिक्षक देखील होऊ शकतात . ते मोठं मोठ्या कंपनीत “Tax Advisor” म्हणून काम करू शकतात
CA करण्यासाठीच्या दोन पद्धती :
हेही वाचा: आय टी इंजिनिअर्ससाठी(IT Engineers) आनंदाची बातमी: पुण्यामध्ये लवकरच गूगल(Google) कंपनीचे ऑफिस!!!!!
:
1. 12 वी नंतर सीए( CA)
बारावी नंतर जर सीए( CA) करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला सीए CA Foundation परीक्षे साठी प्रावेश घ्यावा लागतो. Foundation नंतर Intermidiate व नंतर Final आशा प्रकारे तूम्ही बारावी नंतर CA होऊ शकता.
2. पदवी नंतर CA
पदवी नंतर CA मध्ये प्रवेश घेण्यासाठी तूम्ही जर वाणिज्य शाखेतून (Commerce Branch)असाल तर तुम्हाला 55% गुण असणे आवश्यक आहे, आणि जर वाणिज्य व्यतिरिक्त इतर शाखेतून असला तर पदवी परीक्षे मध्ये 60% गुण असणे आवश्यक आहे.
जर तुम्ही पदवी ( Degree) नंतर प्रवेश घेतला तर तुम्हाला Intermidiate व त्यानंतर Final आसा प्रवास करावा लागतो. तुम्हाला Foundation परीक्षा द्यावी लागत नाही. त्याच बरोबर तुम्हाला Intermidiate परीक्षे च्या आगोदर 8 महिने आर्टिकल शिप करणे आवश्यक आसते.
पाहा CA होण्यासाठीच्या परीक्षा?
पहिली परीक्षा – CA Foundation
दुसरी परीक्षा – CA Intermediate
तिसरी परीक्षा – CA Final
CA चा अभ्यासक्रम:
1. CA Foundation : मध्ये चार पेपर असतात:
1.Principles and Practice of Accounting
2a. business laws
2b. business correspondence and reporting
3. Business Mathematics and Logical Reasoning & Statistics
4.a Business Economics
4.b Business and Commercial Knowledge
2. CA intermediate : या मध्ये दोन ग्रुप्स असतात प्रत्येक ग्रूप मध्ये प्रत्येकी चार पेपर्स असतात.
Group: 1
Paper 1: Accounting
Paper 2: Corporate and other Laws
Paper 3: Cost and Management Accounting
Paper 4: Taxation
Group: 2
Paper 5: Advanced Accounting
Paper 6: Auditing and Assurance
Paper 7: Enterprise Information Systems & Strategic Management
Paper 8: Financial Management and Economics for Finance
3. CA Final: मध्ये तुम्हाला CA Final चे पेपर देण्या आगोदर २.५ वर्षाची आर्टिकल शिप करणे आवश्यक असते त्या नंतर तुम्ही CA Final चे पेपर देऊ शकता.
CA Final मध्ये देखील दोन ग्रुप्स असतात व प्रत्येक ग्रूप मध्ये चार पेपर्स असतात. दुसऱ्या ग्रूप मधला एक पेपर साठी तुम्हाला पर्याय दिलेले असतात त्या मधल्या एका विषया ची निवड करून तुम्हाला पेपर द्यावे लागतात.
Group 1
Paper 1: Financial Reporting
Paper 2: Strategic Financial Management
Paper 3: Advanced Auditing and Professional Ethics
Paper 4: Corporate and Economic Laws
Group:2
Paper 5: Strategic Cost Management and Performance Evaluation
Paper 6: Elective Paper
Paper 7: Direct Tax Laws & International Taxation
Paper 8: Indirect Tax Laws
.