State-government-decision-About-Scholarship
परराज्यात गेलेल्या विद्यार्थ्यांसाठी धक्कादायक बातमी आहे. परराज्यात व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या ‘ओबीसी’ विद्यार्थ्यांना (OBC Students) शिष्यवृत्ती देण्यासंदर्भातील निर्णय राज्य सरकारने (State Government) रद्द केला आहे. तसे पत्र राज्य शासनाच्या कक्षाधिकारी संगीता शेळके यांनी निर्गमित केले आहे.
महाराष्ट्राचे रहिवाशी (Resident of Maharashtra) असलेले, मात्र शिक्षणासाठी परराज्यात गेलेल्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती देण्यास नकार दिला आहे.
आघाडी सरकारने 25 मार्च 2022 रोजी परराज्यात व्यावसायिक शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या व्हीजे, एनटी, एसबीसी व ओबीसी विद्यार्थ्यांना (OBC students) शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला होता;
हेही वाचा:https://updatesa2z.com/2022/08/government-updates.html
मात्र, त्यानंतर राज्यात सत्तांतर होऊन शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. या सरकारने आता ठाकरे सरकारचा हा निर्णयही रद्द केला आहे. तसे पत्रक 2 ऑगस्ट रोजी जारी केले आहे.
जाणून घ्या, ‘ओबीसी’ संघटनेन (OBC’ organization) काय आक्रमक केलं.
देशभरातील शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती धोरण निश्चित करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने काढलेले परिपत्रक रद्द केल्याचा दावा शिंदे सरकारने केला आहे. पण, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रद्द केल्याने ‘ओबीसी’ संघटना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे..
व्यावसायिक शिक्षणासाठी महाराष्ट्रातील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारने मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परीक्षा ( Post Matric scholarship, Education, Fees, Exam’s) योजना लागू केली आहे. 1 जुलै 2005 च्या शासन निर्णयानुसार सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य, क्रीडा व विशेष (Social justice, cultural work, sports and special) सहाय्य विभागाने हीच योजना 1 नोव्हेंबर 2003 पासून विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागास व विशेष मागासवर्गातील विद्यार्थ्यांनाही लागू केली.
हे पण वाचा: https://updatesa2z.com/2022/03/rajarshi-shahu-maharaj-scholarship-scheme-for-backward-class-students.html
सरकारच्या या निर्णयानुसार(Decision of Government) मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती (Post Matric scholarship
), शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती, निर्वाहभत्ता (Tuition Fee, Examination Fee Reimbursement, Subsistence Allowance) विद्यार्थ्यांच्या खात्यावर ऑफलाइन (Offline) पद्धतीने दिला जाणार होता. मात्र, शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde, Phadanvis government) हे परिपत्रकच (Circular) रद्द केल्याने विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती (Students Scholarship) बंद झाली आहे. त्यामुळे परराज्यात व्यावसायिक शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या व्हीजे, एनटी, एसबीसी व ओबीसी (VJ, NT, SBC and OBC () students) विद्यार्थ्यांची अडचण होणार आहे.
⚡ Daily latest news app.
वेगवेगळ्या क्षेत्रातील जसे की शेतीविषयी माहिती आणि मार्गदर्शन,सरकारी योजना, आरोग्य , शिक्षण, , beauty tips, खेळ, जगतिग घडालोडी, चालू घडलोडी,
या सर्वांची माहिती तुम्हाला या ॲप वर मिळत राहील.
https://play.google.com/store/apps/details?id=com.updatesa2z