आता UIDAI ने सर्व केंद्रीय मंत्रालये (Central Ministries) आणि राज्य सरकारांना 11 ऑगस्ट रोजी एक परिपत्रक पाठवले आहे. त्यानुसार जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर तुम्हाला सरकारी योजनांचा (Government Scheme) लाभ मिळणार नाही. त्या परिपत्रकानुसार आता सरकारी सेवा किंवा कोणत्याही लाभासाठी आधार कार्ड (Adhar card) आवश्यक करण्यात आले आहे.
देशात सर्वात महत्वाचं आणि उपयोगात येणाऱ्या कागदपत्रांपैकी एक असं आधार कार्ड (Adhar card) समजलं जातं.देशामध्ये अनेक सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी कुठे कमी कागदपत्रे आवश्यक असतात तर कुठे जास्त कागदपत्रे असतात. सामान्यपणे पाहिलं तर छोट्या मोठ्या कामासाठी आपल्याला आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट साईझ फोटो, रेशन कार्ड, शाळेचा दाखला, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, जन्माचा दाखला, पासपोर्ट, मोटार वाहन कायदा, (Aadhaar Card, PAN Card, Passport Size Photo, Ration Card, School Certificate, Resident Certificate, Income Certificate, Birth Certificate, Passport, Motor Vehicle Act,) 1988 (1988 चा 59) अंतर्गत वाहन चालविण्याचा परवाना. राजपत्रित अधिकार्याद्वारे जारी केलेले ओळखपत्र वापरू शकता, ज्यामध्ये तुमचा फोटो आणि राज्य सरकारने निर्दिष्ट केलेल्या इतर कोणत्याही कागदपत्रांचा समावेश आहे. अशी कागदपत्रे (Documents) आपण कोणत्याही सरकारी योजनेच्या आवश्यकतेनुसार आपल्याकडे काही वेळेपूर्वी तयार ठेवू शकतो.
हेही वाचा: https://updatesa2z.com/2022/08/pm-samajra-swasth-arogya-yojana.html
आता आधार कार्ड क्रमांक किंवा आधार कार्ड (Aadhaar Card) नाव नोंदणीची पावती नसताना लोकांना सरकारी सुविधा आणि अनुदानापासून वंचित राहावे लागणार आहे. नवीन परिपत्रकात दिलेल्या माहीतीनुसार, सबसिडीचा लाभ फक्त अशा लोकांनाच मिळणार आहे की, ज्यांच्याकडे आधार कार्ड किंवा आधारसाठी अर्ज केला असेल तर पावती असेल. सबसिडी आणि सूट मध्ये हेराफेरी आणि गळती रोखण्यासाठी केंद्र सरकार हे प्रयत्न करत आहे.
सरकारच्या परिपत्रकात (Govt circular) देशातील 99 टक्के प्रौढांकडे आधार कार्ड असल्याचं सरकारने सांगितलं आहे. यामुळे जर देशातील नागरिकांचे आधार कार्ड बनले नसेल तर त्यांनी अर्ज करावा आणि पावती घ्यावी म्हणजे सरकारी अनुदानाचा लाभ मिळू शकेल. जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल आणि सरकारी योजनांचा ( Government Scheme) लाभ घ्यायचा असेल, तर तुम्ही आधारसाठी अर्ज करू शकता आणि या अर्जाद्वारे/पावतीद्वारे योजनेचा लाभ घेऊ शकता.
हे पण वाचा: https://updatesa2z.com/2022/01/pantapradhan-mudra-loan-yojana-pmmy.html
UIDAI ने सांगितल्यानुसार, आधार कायद्याच्या कलम 7 मध्ये सध्याच्या तरतूदीनुसार, जर एखाद्या व्यक्तीकडे आधार नसेल तर तो दुसऱ्या ओळखपत्राद्वारे सरकारी योजना, अनुदान (Subsidy) आणि इतर सुविधांचा लाभ घेऊ शकतो. पण आता जर एखाद्याकडे आधार नसेल किंवा त्याने आधारसाठी अर्ज (Application for Adhar card) केला नसेल तर त्याला इतर कागदपत्रे दाखवून सरकारी सूट आता मिळू शकणार नाही.