प्रधानमंत्री मुद्रा योजना (पीएमएमवाय) ( PMMY) ही कृषि लघु/सूक्ष्म उद्योगांसाठी 10 लाख पर्यंतच्या कर्जाची सुविधा प्रदान करते.
- मुद्रा लोन योजनेचे उद्दिष्टे:
:
1. देशातील 5.77 कोटी उद्योजकांना वित्तसाहाय्य
2. वार्षिक 7 टक्के दराने 10 लाख रुपयांपर्यंत अर्थपुरवठा
3. 20,000 कोटींचे भक्कम सरकारचे भांडवली पाठबळ
केंद्र सरकारने लघु उद्योग सुरू करणाऱ्यांसाठी प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) सुरू केली आहे. या अंतर्गत लोकांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी थोड्या प्रमाणात कर्ज दिले जाते.
प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) अंतर्गत कोणतेही निश्चित व्याज दर नाहीत. मुद्रा कर्जासाठी वेगवेगळ्या बँका वेगवेगळे व्याजदर आकारू शकतात. व्याज दर देखील कर्जदाराच्या व्यवसायाचे स्वरूप आणि गुंतलेल्या जोखमीवर अवलंबून असते. साधारणपणे किमान व्याज दर 12%आहे.
या योजनेचे उद्दिष्ट म्हणणे, पहिले म्हणजे स्वयंरोजगारासाठी सुलभ कर्ज. दुसरे म्हणजे, लघु उद्योगांद्वारे रोजगार निर्माण करणे.
मुद्रा योजनेअंतर्गत तीन प्रकारची कर्जे दिली जातात.
- शिशु कर्ज
- किशोर कर्ज आणि
- तरुण कर्ज यांचा समावेश आहे.
- शिशु मुद्रा लोन अंतर्गत 50,000 रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते.
- किशोर मुद्रा कर्जाच्या अंतर्गत 50,000 ते 5 लाख रुपयांपर्यंतची कर्जे दिली जातात.
- तरुण मुद्रा कर्जाच्या अंतर्गत 5 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेतले जाऊ शकते.
- मुद्रा लोन घेण्यासाठीची प्रक्रिया:
मुद्रा लोन घेण्यासाठी तुम्ही तुमच्या भागातील बँकेला भेट देऊन तुम्ही मुद्रा योजना बद्दल अधिक माहिती जाणून घेऊ शकतात
मुद्रा लोन योजनेसाठी (PMMY) तुम्हाला सरकारी किंवा बँक शाखेत अर्ज करावा लागेल.
जर तुम्हाला तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला घराची मालकी किंवा भाड्याची कागदपत्रे, कामाशी संबंधित माहिती, आधार, पॅन नंबर यासह इतर अनेक कागदपत्रे द्यावी लागतील.
- मुद्रा लोनचा लाभ घ्यायच असेल तर या गोष्टीं लक्षात ठेवा:
:
कोणत्याही प्रकारचा जामीन नाही.
स्वतःचे 10 टक्के भाग भांडवलची गरज नाही.
हि योजना फक्त सरकारी बँकेतच होणार.
वय 18 वर्षे पूर्ण असले पाहिजेत
अर्जदार कोणत्याही बँकेचा थकबाकीदार नसावा.
- मुद्रा लोनसाठी लागणारे कागदपत्रे:
- ओळखीचा पुरावा – मतदान ओळख पत्र, आधार कार्ड
- रहिवासी पुरावा उदा – लाईट बिल, घर पावती.
- अर्जदाराचे 2 फोटो.
- आपण जो व्यवसाय करणार आहोत किंवा करत आहोत त्याचा परवाना व स्थायी पत्ता.
- व्यवसायासाठी लागणारे मटेरियल किंवा यंत्र सामुग्री इ. त्याचे कोटेशन व बिले.
- आपण ज्या व्यापाऱ्याकडून माल घेतला त्याचे पुर्ण नाव व पत्ता.
- अर्जदाराचे 2 फोटो