किती असेल पारधी घरकूल योजनेसाठी अनुदान?
या योजनेसाठी पारधी समाजाला मिळेल 1 लाख 30 हजार अनुदान….
राहण्यासाठी स्वतःचे पक्के घर नसलेल्या लाभार्थ्यांचे राहणीमान उंचावण्यासाठी पक्के घर बांधणे.
आदिवासी विकास विभागामार्फत सन 2011-12 पासून पारधी विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
पारधी घरकुल योजना ही अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी आहे. ग्रामसभेने निवडलेल्या अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांची अंतिम निवड करण्यासाठी घरकुल निर्माण समिती आहे. या योजनेचा उद्देश अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना कायमस्वरूपी पक्क्या घराचा लाभ मिळवून देणे हा आहे.
या योजने अंतर्गत कोणकोणते लाभ घेता येणार?
1) घरकुलासाठी प्रति लाभार्थी अनुदान – 1 लाख 20 हजार रुपये, नक्षलग्रस्त आणि डोंगराळ भागासाठी 1 लाख 30 हजार.
2) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत 90 दिवसांचा रोजगार आणि स्वच्छ भारत मिशनद्वारे ग्रामीण शौचालय बांधण्यासाठी 12 हजार रुपये अनुदान.
3) पारधी घरकुल योजनेंतर्गत लाभार्थ्यांना दिले जाणारे अनुदान पीएफएमएस प्रणालीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केले जाते.
या योजनेसाठी च्या अटी?
1.लाभार्थी निवडीचे अधिकार ग्रामसभेला दिले जातात आणि अंतिम निवड जिल्हास्तरीय समिती करते.
2.लाभार्थी महाराष्ट्रात किमान पंधरा वर्षे वास्तव्य केलेला असावा.
3. सक्षम प्राधिकाऱ्याने प्राधिकृत केलेले जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
4) लाभार्थी बेघर असावा किंवा पक्के घर नसावे.
5) कुटुंबाची कमाल वार्षिक उत्पन्न मर्यादा 1 लाख 20 हजार रुपये आहे.
6) लाभार्थी सामाजिक, आर्थिक आणि जात सर्वेक्षण प्राधान्य यादीच्या निकषांच्या बाहेर असावे.
अधिक माहितीसाठी संपर्क साधणे:
प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प/तालुका समूह विकास अधिकारी, पंचायत समिती.