- केंद्र सरकारच्या पीएम सन्मान निधी योजनेअंतर्गत मोठा बदल करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात. पी एम किसान सन्मान निधीचा बारावा हप्ता लवकर च शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. त्या अनुषंगाने हा बदल केल्याची माहिती मिळत आहे
नवीन बदला अंतर्गत लाभार्थी आपल्या मोबाईल नंबर वरून
आपल्या हप्त्याचे स्टेटस पाहू शकणार आहे, जसे की तुमच्या खात्यात किती हप्ता जमा झाला आहे आणि कोणत्या खात्यात जमा झाला आहे हे तुम्ही पाहू शकता.
हेही वाचा: Government updates: आता सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड आवश्यGovernment updates: आता सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड आवश्य
अगोदर मोबाईल क्रमांक ,आधार नंबर, किंवा खाते क्रमांक टाकून आपण आपली स्थिती पाहू शकत होतो, त्यानंतर केंद्र सरकारकडून ती सुविधा बंद करण्यात आली होती.
आता जर तुम्हाला तुमची स्थिती पाहायची असेल तर सर्वात अगोदर तुम्हाला www.pmkisan.gov.in या लिंक वर जायचं आहे, तिथे गेल्यानंतर तुम्हाला एक फॉर्मस कॉर्नर नावाचा ऑप्शन असेल, तेथे गेल्यानंतर तुम्हाला लाभार्थी स्थितीवर क्लिक करायचा आहे. त्यानंतर तेथे जे पेज ओपन होईल तेथे तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक किंवा तुमचा मोबाईल नंबर टाकू शकता, त्यानंतर इमेज कोड टाकून तुम्हाला गेट डाटा वर क्लिक करायचा आहे
त्यानंतर तुम्हाला तुमच्या डाव्या बाजूला नो युवर रजिस्ट्रेशन नंबर ची लिंक मिळेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा जो मोबाईल नंबर रजिस्टर केला आहे तो मोबाईल नंबर टाकून कॅपचा कोड टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला गेट मोबाईल ओटीपी यावर क्लिक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर ओटीपी येईल तो ओटीपी इंटर करायचा आहे आणि गेट डिटेल्स वर क्लिक करायचा आहे. अशाप्रकारे तुम्ही तुमची स्थिती पाहू शकता