Teacher-update

शिंदे सरकारचा शिक्षकांसाठी महत्त्वाचा निर्णय

  • राज्यातील शिक्षकांसाठी आनंदाची बातमी आहे.. गेल्या काही दिवसांपासून रखडलेल्या शिक्षकांच्या बदल्यांना अखेर मुहूर्त मिळाला. राज्यातील तब्बल 3943 जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचे आदेश सोमवारी (ता. 22) काढण्यात आले आहेत.Teacher-update

 

पुण्यातील विन्सीस आयटी सर्व्हीस (आय) प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामार्फत संगणकीय प्रणालीद्वारे या बदल्या करण्यात आल्या. या प्रणालीत जिल्ह्यांमध्ये साखळ्या तयार केल्याने मोठ्या संख्येने शिक्षकांच्या बदल्या झाल्या. प्रत्येक शिक्षकाला ई-मेलद्वारे बदलीचे आदेश दिले जातील. नव्या प्रणालीमध्ये लॉग इन करून हे आदेश डाऊनलोडदेखील करता येतील.

हेही वाचा: एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी https://updatesa2z.com/2022/08/mpsc-update.html

ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते विधान भवनातील दालनात शिक्षकांच्या बदल्यांचे हे आदेश जारी करण्यात आले. ऑनलाईन प्रणालीद्वारे शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या असून, त्यात कुठलाही मानवी हस्तक्षेप नसल्याचा दावा मंत्री गिरीष महाजन यांनी केला आहे..

 

एकूण अर्जापैकी 33 टक्के बदल्या

दरम्यान, आंतरजिल्हा बदल्यासाठी शिक्षकांचे एकूण 11871 अर्ज आले होते.. पैकी 3943 जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या 34 जिल्हा परिषदेअंतर्गत करण्यात आल्या आहेत. एकूण अर्जापैकी 33 टक्के बदल्या करण्यात आल्या. शिक्षकांना अन्य जिल्हा परिषदेत नेमणूक देण्याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना प्राधिकृत केले आहे.

 

आंतरजिल्हा बदलीसाठी एका जिल्ह्यात 10 वर्षे, त्यापैकी एका शाळेत किमान 5 वर्षे सलग सेवा झालेली असणं गरजेचं आहे. तसेच, पक्षाघात व अन्य दुर्धर आजाराने ग्रस्त, दिव्यांग कर्मचारी, शस्त्रक्रिया झालेले, विधवा, कुमारिका शिक्षक, परित्यक्ता,  याची 53 वर्षे पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांचा समावेश ‘विशेष संवर्ग भाग-1’मध्ये केला आहे. पती-पत्नी एकत्रिकरणासाठी त्यांचा समावेश ‘विशेष संवर्ग भाग-2’मध्ये करण्यात आला आहे..

 

Related posts:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *