- पोलीस मध्ये होणार 7 हजार दोनशे पदांची भरती
:
सरकारी नोकरी हे प्रत्येकाचे स्वप्न असते. आणि त्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. अशीच एक पोलीस भरती करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे.
राज्याचे गृहमंत्री “दिलीप वळसे पाटील” यांनी पोलीस भरतीसाठी खुलासा केला आहे.
वळसे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 7200 महाराष्ट्र पोलीस पदासाठी मान्यता मिळाल्याची माहिती दिली.
:
महाराष्ट्र 5200 पोलीस पदे भरण्याचे काम शेवटच्या टप्प्यापर्यंत आलेले आहे. या भरतीची लेखी परीक्षा चाचणी झाली, शारीरिक क्षमता चाचणी झाली, आता फक्त त्याची अंतिम यादी जाहीर करण्याचे काम सुरू आहे. 5 हजार 200 पदांची पहिल्या भरतीची प्रक्रिया ही अंतिम टप्प्यात असून, ती संपल्यानंतर लगेच दुसरी भरती करण्यात येईल असेही ते म्हणाले.
त्यांनी या दिलेल्या माहितीमुळे पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. राज्यातील पोलिसांचे बळ कमी आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली.