दिवाळी आधी मिळणार पीक विमा
शेतकऱ्यांची दिवाळी होईल अधिक गोड
खरीप पीक विमा 2022 मिळविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
पीक विमा काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
पीक विमा योजना लागू करताना खालील नियम लक्षात ठेवा.
ज्या शेतकऱ्यांचे नुकसान 50 टक्क्यांपेक्षा जास्त आहे त्यांना 25 टक्के आगाऊ विमा दिला जातो.
पीक विमा योजनेच्या नवीन नियमांनुसार या संदर्भातील अधिकार जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीकडे असतील.
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली समिती पीक विमा कंपनीला २५ टक्के पीक विमा वाटप करण्याचे आदेश देणार आहे.
ज्या महसूल मंडळाचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे अशा सर्व शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.
शेतकऱ्यांनी खरीप पीक विमा 2022 भरला असेल, तर त्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यास पीक विमा कंपनीकडे तक्रार करावी, असे आवाहनही करण्यात येत आहे.
प्ले स्टोअर वरून फसल बिमा ॲप crop insurance डाउनलोड करा. तिथे तुम्ही तक्रार करू शकता.
किंवा विमा कंपनीच्या हेल्प लाइन क्रमांकावरही संपर्क साधू शकता.
हेही वाचा: जाणून घ्या काय आहे पीएमएवाय (PMAY), कसा व कोणाला होणार फायदा.
खालील पद्धतीने पीक विमा क्लेम
सर्व प्रथम गुगल प्ले स्टोअरवर जा आणि पीक विमा अॅप डाउनलोड करा.
अॅप्लिकेशन ओपन केल्यानंतर, तुम्ही भाषा बदला वर क्लिक करून भाषा निवडू शकता.
त्यानंतर ‘नोंदणीकृत खात्याशिवाय काम सुरू ठेवा’ वर क्लिक करा.
पुढे, ‘पीक नुकसानीची पूर्व चेतावणी’ या पर्यायावर क्लिक करा.
आता मोबाईल नंबर टाका आणि ओटीपी द्या. (पीक विमा दावा)
त्यानंतर खरीप किंवा रब्बी हंगाम निवडा, वर्ष, योजना, राज्य निवडा आणि तळाशी असलेल्या हिरव्या बटणावर क्लिक करा.
आता पीक नुकसान घटनांची तक्रार करण्यासाठी घटनेचा प्रकार, पीक वाढीचा टप्पा, नुकसान टक्केवारी, नुकसान फोटो आणि व्हिडिओ अपलोड करा.
सर्व माहिती भरल्यानंतर ‘सबमिट’ बटणावर क्लिक करा. तुमच्या दाव्यावर यशस्वीपणे प्रक्रिया केली जाईल.
तसेच ‘Docet ID’ तुमच्या समोर येईल, त्याचा स्क्रीनशॉट घ्या.
या डॉकेट आयडीद्वारे तुम्ही पीक नुकसानीची स्थिती तपासू शकता
Updatea2z वेगवेगळ्या क्षेत्रातील अधिक अपडेट्स मिळण्यासाठी हे ॲप इन्स्टॉल करा.