Political updates: ठाणे जिल्ह्यात शिंदे गट आणि ठाकरे गटात (Shinde group and Thackeray group ) राजकीय वातावरण तापले!!!!!दोन्ही गटात भयंकर राडा…..

Political-updates

ठाण्याच्या किसन नगरमध्ये शिंदे कार्यकर्ते आणि ठाकरे कार्यकर्ते एकमेकांना भिडले…..

अगोदर भट वाडीत हाणामारी झाल्याचं कळतंय, नंतर ठाण्यातील (Thane) श्रीनगर पोलीस स्टेशन बाहेर राडा झाल्याचं पाहायला मिळालं.

राजन विचारे (Rajan Vichare) यांच्यावर शिंदे गटातील काही जणांनी पाण्याची बाटली फेकून मारली असल्याचं सांगितलं जातंय. 

या हल्ल्यामध्ये ठाकरे गटातील एक जण जखमी झालाय. या जखमी कार्यकर्त्याला ठाण्याचा सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

या हल्ल्यानंतर ठाकरे गट श्रीनगर पोलीस ठाण्यात दाखल झालाय.

हेही वाचा: https://updatesa2z.com/2022/10/supreme-court-said-to-affidavit-on-banned-old-notes-to-central-government-and-rbi.html

पोलिसांनी मध्यस्थी करण्याचाही प्रयत्न केला. परंतु अखेर शिंदे  गटाच्या काही कार्यकर्त्यांवर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला.

नेमकं काय घडलं?

ठाण्याच्या किसन नगर येथे ठाकरे गट आणि शिंदे गट आमने-सामने आले. ठाकरे गटाकडून मेळावा घेण्यात येत होता.

यावेळी शिंदे गटाचे  कार्यकर्त्यांकडून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली.

ठाकरे गटाचे खासदार राजन विचारेदेखील घटनास्थळी उपस्थित होते.

हा राडा झाल्यानंतर दोन्ही गटांचे कार्यकर्ते श्रीनगर पोलीस ठाण्यात मोठ्या संख्येनं जमले होते. पोलिसांनी या संपूर्ण प्रकाराची माहिती घेऊन गुन्हा नोंदवून घेत आहेत. पोलीस ठाण्याच्या परिसरातही शिंदे समर्थकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. हे कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करताना पाहायला मिळाले.

 

Leave a Comment

updates a2z