नवीन अभ्यासक्रमानुसार इयत्ता पहिली व दुसरी साठी विषययोजना, शालेय कामाचे दिवस, विषय निहाय तासिका विभागणी व शालेय वेळापत्रक निश्चित करणेबाबत navin abhyaskram vishayayojana vibhagani shaley velapatrak 

नवीन अभ्यासक्रमानुसार इयत्ता पहिली व दुसरी साठी विषययोजना, शालेय कामाचे दिवस, विषय निहाय तासिका विभागणी व शालेय वेळापत्रक निश्चित करणेबाबत navin abhyaskram vishayayojana vibhagani shaley velapatrak 

संदर्भ-

शासन परिपत्रक येथे पहा pdf download 

1. या कार्यालयाकडील परिपत्रक जा.क्र. राशैसंप्रपम/अविवि/FS/1292699/2025 दिनांक- 18/06/2025

2. या कार्यालयाकडील परिपत्रक जाक्र. विप्रा/अविवि/तावि/3605अ, दिनांक 05/10/2017

3. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (पायाभूत स्तर) (NCF-FS) 2022

4. राज्य अभ्यासक्रम आराखडा (पायाभूत स्तर) (SCF-FS) व पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम-2024

5. शासन निर्णय क्रमांकः संकीर्ण- 2025/प्र.क्र.94/एस.डी.-4 दि.30/06/2025

राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार राज्याच्या गरजा व वैशिष्ट्ये विचारात घेऊन महाराष्ट्रासाठी राज्य अभ्यासक्रम आराखडा (पायाभूत स्तर) 2024 व पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम 2024 तयार करण्यात आलेला आहे. सद्यस्थितीत संदर्भ क्र.02 येथील परिपत्रक दिनांक 05/10/2017 अन्वये लागू करण्यात आलेली इयत्ता पहिली ते दहावीसाठी विषयवार तासिका विभागणी राज्यात लागू आहे.

संदर्भ क्र.1 अन्वये निर्गमित करण्यात आलेले दि. 18/06/2025 रोजीचे या कार्यालयाचे परिपत्रक या‌द्वारे रद्द करण्यात येत आहे. संदर्भीय शासन निर्णयांना अनुसरून नवीन अभ्यासक्रम लागू झाल्याने इयत्ता पहिली व दुसरीसाठी सुधारित विषययोजना, तासिका विभागणी व वेळापत्रकाबाबत पुढीलप्रमाणे सुधारित सूचना निर्गमित करण्यात येत आहेत.

अ. विषययोजना-

पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम 2024 नुसार विषययोजना (इयत्ता पहिली व दुसरी)

कार्यानुभव विषय यापुढे कार्यशिक्षण या नावाने ओळखला जाईल.

शासन परिपत्रक येथे पहा pdf download 

1/1310935/2025

बनी (स्काऊट / गाईड) हा उपक्रम शाळांसाठी ऐच्छिक राहील.

आ. विषयनिहाय तासिका विभागणी व कालावधी-

इयत्ता पहिली व दुसरीसाठी वार्षिक दिवस व कालावधीची विभागणी पुढीलप्रमाणे असेल.

उपरोक्त संदर्भाना अनुसरुन सुधारित अभ्यासक्रमासाठी इ.1ली साठी विषय निहाय वेळेचे सुधारित नियोजन लागू करण्यात येत आहे. तसेच एकाच सत्रात भरणाऱ्या शाळा व दोन सत्रात भरणाऱ्या शाळांच्यासाठीही वेळेची विभागणी स्वतंत्रपणे देण्यात आलेली आहे.

इ. शालेय वेळापत्रक (सूचना)

1. सदर निर्देश हे इ.1 ली साठी शैक्षणिक वर्ष 2025-26 पासूनच अंमलात येतील. इ.2 री साठी नवीन पाठ्यपुस्तके लागू झाल्यावर यामधील निर्देश बंधनकारक राहतील.

2. इतर इयत्तांसाठी सुद्धा वेळापत्रक याप्रमाणे ठेवण्यास हरकत नाही जेणेकरुन शाळेतील घंटा / Bell वाजविण्याचे नियोजन सुकर होईल. इतर वर्गासाठी त्यांच्या विषयरचनेप्रमाणे विषयनिहाय तासिकांची संख्या याआधी निर्गमित केलेल्या सूचनांप्रमाणे ठेवावी.

3. यासोबत नमुन्यादाखल देण्यात आलेले शाळेसाठीचे साप्ताहिक वेळापत्रक है एक उदाहरण असून त्यामध्ये विषय तासिकेच्या क्रमवारीमध्ये व शाळा सुरु करण्याच्या वेळेमध्ये शाळांना बदल करता येतील. परंतु विषयनिहाय अध्ययन-अध्यापनाचा साप्ताहिक व वार्षिक घड्याळी तासांचा कालावधी कोणत्याही विषयासाठी शाळा स्तरावर कमी करता येणार नाही.

4. वेळापत्रकामध्ये काही ठिकाणी 2 तासिका जोडून घेतलेल्या आहेत. त्यामध्ये तोडी-लेखी-प्रात्यक्षिक-सराव असे वैविध्यपूर्ण अध्यापन होणे अपेक्षित आहे.

5. पूर्णवेळ शाळांमधील अध्यापन कालावधी व दोन सत्रात भरणाऱ्या शाळांमधील अध्यापना कालावधी समान राहील याची दक्षता घेतलेली आहे. केवळ परिपाठ, मधली सुट्टी, अतिरिक्त समृद्धीकरण तासिका (AEP-Additional Enrichment Period) यांच्या कालावधीमध्ये वेळेच्या उपलब्धतेनुसार तफावत असू शकेल.

शासन परिपत्रक येथे पहा pdf download 

6. अतिरिक्त समृद्धीकरण तासिका (AEP) ह्या विद्यार्थ्यांना कोणत्याही अभ्यास विषयात सक्षम करण्यासाठी अतिरिक्त मार्गदर्शनासाठी आहेत. यामध्ये उपचारात्मक अध्यापन, स्पर्धा परीक्षा तयारी, सराव इत्यादी उपक्रम घेता येतील. अतिरिक्त समृद्धीकरण तासिका (AEP) कोणत्या विषयासाठी आवश्यक आहे हे शाळेतील गरजेनुसार ठरवावे.

7. दोन सत्राच्या वेळापत्रकामध्ये अतिरिक्त समृद्धीकरण (AEP) तासिकांसाठी वेळ देता आलेला नाही, अशा शाळांनी शालेय वेळेव्यतिरिक्त / वि‌द्यार्थी विभागणी करून, अतिरिक्त समृ‌द्धीकरण तासिका (AEP) पूर्ततेसाठी प्रयत्न करावेत.

8. AEP ही पूरक मार्गदर्शनासाठी असल्याने त्याचा समावेश नियमित वार्षिक अध्यापन कालावधीमध्ये करण्यात आलेला नाही तथापि ह्या तासिका साप्ताहिक वेळापत्रकामध्ये दर्शविलेल्या आहेत.

9. आनंददायी शनिवार मधील उपक्रम, एका सत्रात भरणाऱ्या शाळांना शनिवारच्या दिवशी आणि दोन सत्रात भरणाऱ्या शाळांना शालेय वेळेव्यतिरिक्त घेता येतील.

शासन परिपत्रक येथे पहा pdf download 

Related posts:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *