वयाची तीस वर्ष पूर्ण झाली पण अजून लग्नाला मुलगी मिळत नाही अशी स्थिती गावोगावी झाली आहे.गावोगावी शेकडो तरुण पोर बिना लग्नाची आहेत, आई बाप टेन्शन घेऊन आजारी पडत आहेत.कित्येक पोरांची लग्न होतील कि नाही अशी शंका आहे. पण खरंच मुली नाहीत का ? तर मुली आहेत हो प्रमाण जरी कमी असले तरी मुली आहेत.पण त्या मुली सर्वांना मिळणार नाहीत हे पण खरे आणि कोणालाच मिळणार नाहीत असे होणार नाही. तर चला पाहू मुली कोणाला मिळतील, आणि तुम्हाला पण मुलगी पाहिजे असेल तर जरा शांत पूर्वक वाचन करा.लग्न करायचं असेल तर तुम्ही संपूर्ण माहिती किमान एकदा वाचली पाहिजे.
हेही वाचा : गायरान जमिनीवरील घराबाबत सरकारचा मोठा निर्णय जाणून घ्या संपूर्ण माहिती
कोणत्याही मुलीचे आई वडील अश्याच ठिकाणी मुलगी द्यायला तयार होतात ज्या मुलाच्या घरी आर्थिक परिस्थिती बरी आहे, मुलगा नोकरी ला आहे, किंवा त्याचा स्वतः चा व्यवसाय चांगला आहे.
मुलाची घरची आर्थिक परिस्थिती चांगली आहे हे कसे कळते? तर ज्या मुलाचे घर दार चांगले आहे म्हणजे नविन बांधकाम आहे,घरी गाडी आहे,राहणीमान चांगले आहे त्यांची परिस्थिती चांगली असा समज आहे आणि तो कित्येक प्रमाणात खरा पण आहे. म्हणून सर्वात पहिला सल्ला तुम्ही नविन घर नसेल तर घर बांधा, पैसे नसतील तर कोठूनही हात उसने घ्या,काही पण करा पण घराची व्यवस्था करा.लोकांकडून घेतलेले पैसे तुम्ही फेडू शकता पण वेळ निघून गेली तर लग्न नाही होऊ शकत.
घरी बरे आहे पण मुलगा काही काम करत नाही अशी अनेकांची ओरड असते म्हणून, पुणे मुंबई सारख्या शहरात कुठे तरी नोकरी पहा, वेळ प्रसंगी काही पैसे भरून नोकरीला लागले तरी चालेल. नोकरीला आहे बोलल्यास तुमचा मान वाढेल. तुम्ही शहरात राहताय बोलले कि मुली पण पटकन तुम्हाला पसंद करतील.
नोकरी नसेल करायची तर गावात किंवा तालुक्यात काहीतरी प्रतिष्ठित व्यवसाय सुरू करा.
तुमच्याकडे किमान एक मोटर सायकल पाहिजे भले ती हप्त्यावर घेतली असेल तरी चालेल पण कोरी करकरीत हवी, त्या शिवाय तुम्हाला किंमत नाही.
राहणीमानात बदल करा, नवीन नवीन ड्रेस घालायला सुरू करा, कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध नातेवाईकांना भेटायला सुरू करा.
फेसबुक ,व्हाट्स वर बालिश बुद्धी पोस्ट आणि फालतु फोटो वैगरे टाकणे बंद करा याने तुमची किंमत कमी होते.तुमचे वागणे कसे आहे पाहण्यासाठी नातेवाईक तुमचे फेसबुक चेक करतात.
दारू, व्यसन असल्यास बंद करा ,तुम्ही व्यसनी आहात कळाले कि नातेवाईक मुली द्यायला नाकारतात.
आशा प्रकारे तुम्ही तुमच्या जीवनात पटकन बदल करून घ्या, याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. परमेश्वराने सर्वांना जोडीदार तयार केलेले असतात असे बोलले जाते पण तो जोडीदार लवकर मिळावा म्हणून आपण सज्ज झाले पाहिजे. सर्वांचे लवकर विवाह होवोत ही तुम्हाला शुभेच्छा.