3000+ मराठी शब्दसमूहाबद्दल एक शब्द marathi shbdasamuh ek shabda 

3000+ मराठी शब्दसमूहाबद्दल एक शब्द marathi shbdasamuh ek shabda 

शब्दसमूह एक शब्द 
 
फार कमी बोलणारा अबोल 
देवासाठी करावयाची एक विशिष्ट पूजा अनुष्ठान
आधी जन्म घेतलेला अग्रज
ज्याचा थांग लागत नाही असे अथांग
ज्ञानेन्द्रियनी आकलन होण्यास अशक्त असे अगोचर 
मोजता न येण्यासारखे अगणित
वर्णन न करता येण्यासारखा अवर्णनीय
सीमा नाही असे असीम
ज्याला कोणीही शत्रू नाही असा आजात शत्रू
अनुभव नसलेला अननुभवी 
घरी पाहुणा म्हणून आलेला अतिथी
अन्न देणारा अन्नदाता
धर्मार्थ जेवण मिळण्याचे ठिकाण अन्नछत्र
ज्याचा विसर पडणार नाही असा अविस्मरणीय
ज्याला कशाचीच उपमा देता येणार नाही असे अनुपम
थोडक्यात समाधान मानणारा अल्पसंतुष्ट
अग्नीची पूजा करणारा अग्निपूजक
आवरता येणार नाही असे अनावर
जे साध्य होणार नाही ते असाध्य
ज्याची कशाशी तुलना करता येणार नाही असे अतुलनीय
पायात काही न घालणारा अनवाणी
कोणाच्याही पक्षात सामील न होणारा अपक्ष
कधीही नाश न पावणारे अविनाशी
विशिष्ट मर्यादा ओलांडून जाण्याचे कृत्य अतिक्रमण
देवस्थानात अर्पण केलेले इनाम गाव जमीन अग्रहार
स्वतःबद्दल अभिमान बाळगणारा अभिमानी
ज्या ठिकाणी वन्य प्राण्यांची शिकार करण्यास बंदी असते अभयारण्य
कमी आयुष्य असलेला अल्पायुषी
कमी वेळ जगणारा अल्पजीवी
कमी वेळ टिकणारा अल्पजीवी
पुष्कळ पाऊस पडणे अतिवृष्टी
कधीही जिंकला न जाणारा अजिंक्य
ज्याला अंत नाही असा अनंत
ज्याला मरण नाही असा अमर
पूर्वी कधीही घडले नाही असे अपूर्व
पाऊस मुळीच न पडणे अवर्षण
दुसऱ्यांचे पाहून त्याच्यासारखे वागणे अनुकरण
एखाद्याचे मागून जाणे अनुगमन 
ओळख नसलेला अनोळखी 
प्रत्यक्ष किंवा समोर नाही असे अप्रत्यक्ष
देवाने घेतलेला मनुष्याचा जन्म अवतार
माहिती नसलेला अज्ञानी
जाणून घेण्यास अशक्य असे अज्ञय 
वर्तमानपत्रातील संपादकीय मुख्य लेख अग्रलेख
स्तुती करण्यास अयोग्य अशलाग्य
गुणधर्माचा अभ्यास करणारे शास्त्र अनु वंश शास्त्र
ज्याचे मूल्य सांगता येत नाही असे अमूल्य
ज्याच्याबरोबर दुसऱ्याची तुलना करता येत नाही अतुलनीय
इतरांबरोबर बेपरवाई ने वागणारा अरेरावी
तेज नसलेली अवस्था अवकाळा
जवळ काहीही नसलेला अकुंठित
असाय अवस्थेत सापडलेला अगतिक
न समजण्याजोगे अगम्य 
देवघेवीच्या व्यवहारात मिळणारा मोबदला अडत
जीवात्मा व परमात्मा यांचे ऐक्य प्रतिपादन करणारे मत अद्वैत
धर्माला सोडून नियमबाह्य वर्तन अधर्म
वाईट मार्गाने जाणारा अधोगामी
यज्ञातील मुख्य नेता अपरिचित
आगाऊ खर्चासाठी दिलेली रक्कम अनामत
वाटेल त्यावेळी वाटेल ते घडणारे अनियमित
मोठ्या मनुष्याच्या स्वागतासाठी उठण्याची क्रिया अभ्युत्थान
अनेक अवधानाकडे एकाच वेळी लक्ष देणारा अष्टावधान
वनस्पतीच्या मुळाशी पाण्यासाठी केलेला खोलगट भाग अळे 
उपकार न जाणारा अनुपकारी
ज्याच्यात कोणतेही कर्तृत्व नाही असा मनुष्य अजगळ 
शिकण्याची आवड नसलेली अशिक्षित राहिलेला अक्षरशत्रू
अंग राखून काम करणारा अंगचोर
खूप उंच उंच असे आकाश  अंतराळ 
मुलाला झोप यावी म्हणून म्हणायचे गीत अंगाईगीत 
डोळ्यात घालावयाची काजळ अंजन
विवाह समय नवरा नवरी मध्ये धरावयाचे वस्त्र अंतरपाट
अत्यंत हट्टी अडेल तट्टू
अनेक चांगल्या गुणांनी युक्त अष्टपैलू
बरोबर की चूक योग्य की अयोग्य हा विचार न करता ठेवलेली श्रद्धा अंधश्रद्धा
दार बंद करण्यासाठी योजलेला लाकडी किंवा लोखंडी दांडा अडसर
आ   
देव आहे असे मानणारा अस्तिक
पायापासून डोक्यापर्यंत आपाद मस्तक 
लहानापासून म्हाताऱ्यापर्यंत अबाल वृद्ध
भले हो असे म्हणणे आशीर्वाद
स्वतःच लिहिलेले स्वतः वषयीचे चरित्र  आत्मचरित्र
जे नाही ते आहे असे वाटणे आभास 
हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंत असे तु हिमालय
पूर्वीपासून जंगलात राहणारे लोक आदिवासी
कोणतेही काम करण्याचे कंटाळा करणारा आळशी
परंपरेने चालत आलेली ऐकीव गोष्ट अख्यायिका
उच्च दर्जा असलेला सुंदर महाल आलिशान
कंठ दाटून आल्यावर जो मुखरस गळतात तो आवंडा
न बोलविता येणारा अगंतूक 
देवासमोर ओवळण्याचा दीप आरती
तारका पंजाचा आकाशात दिसणारा तोडा आकण 
दोरीवर चालताना तोल सांभाळण्यासाठी हातात घेतलेला बांबू आढाळ
निरनिराळ्या राष्ट्रातील आंतरराष्ट्रीय
स्वभावाने अतिशय तापट असा मनुष्य आग्यावेताळ
इ   
पूर्वी घडलेल्या हकीकतीचे वर्णन इतिहास
पावसापासून निवारण करण्यासाठी पळसाची व तत्सम मोठी पाने व कामख्या यापासून केलेले आवरण इरले
उ, ए, ऐ, ओ   
नदीची सुरुवात होते ते ठिकाण उगम 
सूर्योदयापूर्वीची वेळ उषःकाल
सतत काम करणारा उद्योगी
वाटेल तसा पैसा खर्च करणे उधळपट्टी
ज्याच्यावर उपकार झाले आहेत असा उपकृत
स्वतःची कोणतीही वस्तू सहज देणारा उदार
उद्याला येत असलेला उदयोन्मुख
शिल्लक राहिलेले उर्वरित
वर्मी लागेल असा स्वर किंवा शब्द उपरोध
लक्ष न दिले गेलेले उपेक्षित
सूर्योदय ज्या पर्वता मागून होतो तो पर्वत उदय गिरी
जमीन व पाणी अशा दोन्ही ठिकाणी राहणारा उभयचर 
लहान मुलास प्रथम अन्न खावयास घालणे  उष्टावळ
मूर्खपणाची मसलत देणारा उंटावरचा शहाणा
अगदी दुर्मिळ झालेली वस्तू किंवा व्यक्ती उंबराचे फूल
विशिष्ट हवामानाचा कालखंड ऋतू
काहीही कष्ट न करता इथे बसून खाणारा ऐत खाऊ 
दुसऱ्यामध्ये न मिसळणारा एकलकोंडा
कंटाळवाणे लांबलचक भाषण एरंडाचे गुऱ्हाळ
हाताचे दोन पंजे जवळ आणून केलेला हाताचा पसा ओंजळ 
क   
फारच दुर्मिळ पुष्कळ काळाने येणारी संधी  कपिलाषष्ठीचा योग
अत्यंत उदार मनुष्य कर्णाचा अवतार
काही निमित्त काढून आपसात कलह माजविणारा कळीचा नारद
देवालयाच्या शिखराचे टोक कळस
वयाने व अधिकाराने सर्वात कमी कनिष्ठ
सतत कष्ट करणारा कष्टाळू
सहसा न घडणारे क्वचित
काम साधून घेण्यापुरते गोड बोलणारा कामापुरता मामा
उपकाराची जाणीव ठेवणारा कृतज्ञ
उपकार जाणण्याची प्रवृत्ती कृतज्ञता
उपकार विसरण्याची प्रवृत्ती कृतघ्नता
दुसऱ्याचे दुःख पाहून कळवळणारा कनवाळू
कर्तव्य तत्पर असणारा कर्तव्यदक्ष
कानांना गोड वाटणारा कर्ण मधुर
कार्य करण्याची जागा कर्मभूमी
कमळाप्रमाणे डोळे असणारी कमलाक्षी
कड्यावरून लोटण्याची शिक्षा कडेलोट
सर्व इच्छा पूर्ण करणारा वृक्ष कल्पवृक्ष
कविता रचणारा कवी
कविता रचना करणारी कवयित्री
कलेची आवड असणारा कला प्रेमी
कर्तव्याकडे पाठ फिरवलेला कर्तव्यपराडमुख
सर्व इच्छा पूर्ण करणारी गाय कामधेनु
क्षुद्र वस्तू चोरणारा काडी चोर
सूर्योदयापूर्वी देवाला करावयाची आरती काकड आरती
कार्यात तत्पर असलेला कार्यक्षम
काम करण्यात कुचराई करणारा कामचुकार
सरकारी कायदे मोडण्याची क्रिया कायदेभंग
खोटी तक्रार करणारा कांगावखोर
सर्वांचा सहार करता व क्रूर असा शत्रू कर्दनकाळ
आपापसात हळूच बोलणे कुजबुज
फार झोपाळू मनुष्य कुंभकर्ण
इंद्राचा खजिनदार अतिशय संपत्तीवान पुरुष कुबेर
नेपाळी लोकांकडे असलेला शस्त्र कुकरी
कुणाला तेज प्राप्त करून देणारा कुलदीपक
आकुंचित मनाचा उपमंडूक
क्षुद्र लोकांची ओरड कोल्हे कोई
धान्य साठवण्याची जागा कोठार
काळोख्या रात्रीचा पंधरवडा कृष्णपक्ष
एकाकी होणारा बदल क्रांती
ख   
आकाशात विहार करणारा खग 
दोन डोंगरांमधील चिंचोली वाट खिंड 
चैनी खुशालीत दिवस घालणारा माणूस खुशालचंद
निरुपयोगी माणसे किंवा वस्तू आणून केलेली भरती खोगीर भरती
नदीच्या दोन्ही बाजूंचा सुपीक प्रदेश खोरे
ग   
वाडवडिलांपासून घरात श्रीमंती आहे असा गर्भ श्रीमंत
आकाशाचा भेद करणारा गगनभेदी
एकाच वेळी अनेक जण बोलत असल्यामुळे होणारा आवाज गलका
दारात हत्ती जुन्या इतकी संपत्ती गजांतलक्ष्मी
अत्यंत प्रिय असलेली व्यक्ती गळ्यातील ताईत
हिंडून करावयाचा पहारा गस्त 
भावनेच्या अतिरेकाने कंठ दाटून येणे गहिवर
काळजात कालवा कालव झाल्यासारखे वाटणे गलबलने 
देवा देवळाचा आतील भाग गाभारा
गाणे जाणारा गायक
नाग साप अजगर यांचा खेळ करणारा गारुडी
ज्याला कोणत्याही गोष्टीची पारख नसते गाजर पारखी
पृथ्वीच्या मध्यबिंदूकडे ओढले जाणे गुरुत्वाकर्षण
डोंगर पोखरून वस्तीसाठी केलेले जागा गुहा 
गोकुळाष्टमीच्या शेवटी होणारा खेळ व प्रसाद गोपाळकाला
गाई साठी काढून ठेवलेला घास गोग्रास
शत्रू कडील बातमी काढणारा गुप्तहेर
अत्यंत गरीब स्वभावाची व्यक्ती गोगलगाय
घ   
नेहमी घरात बसून राहणारा घर कोंबडा
ज्याच्या हातात चक्र आहे असा चक्रधारी
सैन्याची केलेली गोलाकार रचना चक्रव्यू ह 
शुष्क लांबीचे व कंटाळा आणणारे भाषण चर्पटपंजरी
चार पाय असलेला चतुष्पाद 
पांढरी खडी असलेली काळ्या रंगाचे तुकडे चंद्रकळा 
मोडकळीस आलेले घर चंद्रमौळी
गावच्या कामकाजाची जागा चावडी
दुष्ट माणसांची जुट चांडाळ चौकडी
मन आकर्षण घेणारा चित्त वेदक
चित्र काढणारा चित्रकार
बारकाईने चौकशी करणारा चिकित्सक
जोरात उसळून बाहेर पडणारी धार चिळकांडी 
इच्छिलेले देणारा म्हणी चिंतामणी
शर्यतीत एकमेकांच्या सतत पुढे येण्याचा प्रयत्न चुरस
दुसऱ्याच न दिसणारे काम चोरकाम 
चार रस्ते एकत्र करणारे ठिकाण चौक 
मनात येईल तेव्हा किंवा स्वैर वर्तन करणारा छंदिष्ट 
ज   
जगाचा स्वामी जगन्नाथ
पाण्यात राहणारे प्राप्राणी जलचर
थोर पुरुष समाजसेवक साधुसंत यांचा जन्मदिवस जयंती
जेथे जन्म झाला आहे ते तो देश जन्मभूमी
रत्नांचा व्यापार करणारा जवाहिऱ्या
जन्मापासून कायमचा दरिद्री जन्मदरिद्री 
पुष्कळ जमीन असलेला जमीनदार
जादूचे खेळ करून दाखवणरा  जादूगार
पाण्यामध्ये जन्मणारा प्राणी जलचर
पाणी साठवण्यासाठी वापरण्यात येणारे काचेचे भांडे जार
जीवाला जीव देणारा मित्र जिवलग
जाणून घेण्याची इच्छा जिज्ञासा
ज्ञानाची इच्छा करणारा जिज्ञासू
अतिशय रागीट मनुष्य  जमदग्नी 
गोसावी चा एक पंथ जालंदर 
झ   
सतत पडणारा पाऊस झडी
नारळाच्या झाडाची पाने झावळ्या
झाडांचा दाट समूह झाडी
दांडगा येणे किंवा अवस्थेत पणे चालविलेला कारभार झोटिंग शाही
बाहेरून डौल न दाखविणारा पण खरोखरी गुणी मनुष्य झाकले माणिक
तंतू वाद्यावर छेडलेले मधुर स्वर झंकार
सोन्याच्या दुकानातील राख वगैरे गाळून सोन्याचे कण काढणारा झारकरी
ट   
नानी पाडण्याचा कारखाना टाकसाळ
खूप जोराने किंवा एकसारख्या टाळ्या वाजविणे टाळ्यांचा कडकडाट
टोळासारखे नासाडी करीत उगाच हिंडणारे टोळ भैरव
ठ   
लोकांची फसवणूक करून त्यांना लुबडणारा ठकसेन
ड   
डोंगरातील अरुंद मार्ग डोंगर खिंड
डोंगराच्या माथ्यावरील सपाट प्रदेश डोंगर पठार
त   
किल्ल्याच्या भोवतीची भिंत तट
घोडे बांधण्याची जागा तबेला
तप करण्याची जागा तपोभूमी
तांब्याच्या पत्रावर लिहिलेला लेख ताम्रपट
विन्याच्या सांगाड्यावर जिथे तारा लावतात तेथे बसवलेला हस्तीदंताचा तुकडा तारदाणी
शंकराने विश्व सहार काली केलेले नृत्य तांडव नृत्य
आपले कार्य सांगण्यापुरते अर्जव  ताकापुरती रामायण
पूर्णपणे आणखीन किंवा ओशाळा ताटाखालचे मांजर
तोंडावळा सारखा असल्यामुळे फसवणारा तोतया
अवनी न करता भाताचे पीक घेता यावे म्हणून भाजून तयार केलेली जमीन तोरप 
काही उद्योग धंदा न करता दुसऱ्याच्या जीवावर निर्वाह करणारा तुकडमोडे
स्वतः काही न करता इतरांना करण्याविषयी हुकूम वजा गोष्ट सांगणे तोंडपाटीलकी
तीन शिंगे असलेला त्रिशिंगी
तीन रस्ते एकत्र मिळतात ते तिठा 
जवळ काही नसताना मोठा व्यापारी आहोत असा बहाना करणारा तिरकमशेठ 
अंगी कर्तुत्व नसता बढाई मारणारा मनुष्य तीसमारखा
जो इतरांशी मिळून मिसळून राहत नाही असा तिरसिंगराव
भयाने गांजलेली स्थिती त्राही त्राही
तीन कोण असलेली आकृती त्रिकोण
तीन नद्या एकत्र मिळणारे ठिकाण त्रिवेणी
भूत भविष्य वर्तमान या तिन्ही काळात असलेला त्रिकाळ
दर तीन महिन्यांनी प्रसिद्ध होणारे त्रैमासिक
वादी प्रतिवादी अशा कोणत्याही पक्षात नसलेला त्रयस्थ
धड ना इकडे धड ना इकडे त्रिशंकू
एका माणसाला एकाच कामासाठी अनेक ठिकाणी जाण्याचा प्रसंग त्रिस्थळी यात्रा
स्वर्ग मृत्यु पाताळ या तिन्ही लोकांचा समुदाय त्रिखंड 
सत्व रजतम या गुणांचा समुदाय त्रिगुन
तीन तीर्थक्षेत्रांची यात्रा त्रिस्थळी
द   
स्वतःचा पुत्र नसल्याने वंश चालविण्यासाठी कायदेशीर घेतलेला दुसऱ्याचा मुलगा दत्तक
दहा पापे नाहीशी करणारा दशहर
अस्वलांचा खेळ करणारा दरवेशी
कर्तव्य शून्य व भेकर असा मनुष्य दळूबई
 कधीही न बदलणारे वावाक्य दगडावरची रेघ
समाजाकडून उपेक्षिलेले दलित
तोंडा तोंडी चालत आलेली गोष्ट दंतकथा
खूप दानधर्म करणारा दानशूर
दारावरील पहारेकरी द्वारपाल
दररोजचा ठरलेला काकार्यक्रम दिनक्रम
उदार मोठ्या मनाचा दिलदार
आषाढ व कार्तिक महिन्यातील एकादशीला पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी टाळ मृदुंग विना घेऊन सहभागी होणाऱ्या विठ्ठल भक्तांचा समूह दिंडी
स्वतःच्या पराक्रमाने चारी दिशांतील लोकांना जिंकणे दिग्विजय
सतत उद्योग करणारा दीर्घोउद्योगी
खूप आयुष्य असलेला दीर्घायुष्य
तिन्ही बाजूंनी पाणी असलेला प्रदेश द्वीपकल्प
फाजील शहाणा अर्थात मूमूर्ख दीड शहाणा
नेहमी नसा दिसणारी गोष्ट दुर्मिळ
वाईट परिस्थितीचे दिवस दुर्दिन 
हट्टीपणा करणारा दुराग्रही
साधा भोळा निरूपद्रवी मनुष्य देव माणूस
नशिबाने आलेली अवस्था दैवदशा
दैवावर हवाला ठेवून जाणारा दैववादी
देशाची सेवा करणारा देशसेवक
दोनदा जन्मलेला द्विज
मुद्दाम वाकडे जाण्याचा खटाटो द्राविडी प्राणायाम
विणलेल्या कापडाच्या ताब्यात मध्येच एखादा ठिकाणी विरळ विन असते ती जागा दुस्ता
ध   
उंचावरून पडणारा प्रप्रवाह धबधबा
वाटसरूंना उतरण्यासाठी धर्मार्थ बांधलेली इमारत धर्मशाळा
दुसऱ्या धर्मात प्रवेश करणे धर्मांतर
धर्म स्थापन करणारा धर्म संस्थापक
नाचण्याचा गोंधळ धांगडधिंगा
वजनदार मनुष्य धेंड
विशिष्ट ध्येय समोर ठेवून वागणारा ध्येयनिष्ट
धर्मनिष्ठ मनुष्य धर्मराज
मागचा पुढचा विचार करून वागणारी व्यक्ती धोरनी 
न   
नाटकात किंवा चित्रपटात काम करणारा नट
नाटकात किंवा चित्रपटात काम करणारी नटी
शिक्षा करण्याचे यमपुरीतील स्थान नरक
नवीन मतांचा पुरस्कार करणारा नवमतवादी
नृत्य करणारा पुरुष नर्तक
नृत्य करणारी स्त्री नर्तकी
पायाच्या बोटा पासून ते डोक्यावरच्या केसापर्यंत नख शिखांत 
ज्याच्यापाशी अपार द्रव्य आहे तो नवकोट नारायण
उग्र व पराक्रमी मनुष्य नरसिंह
अतिशय उग्र स्वरूप धारण करणारा नरसिंह अवतार
अकल शून्य नंदीबैल
देवापुढे सतत जळणारा दिवा नंदादीप
जनावरांच्या खुरात मारावयाची अर्धवर्तुळ कार लोखंडी पट्टी नाल 
ईश्वर धर्म इत्यादी न मानणारा नास्तिक
पीक न उगवणारी जमीन नापीक
कसलेही व्यसन नसणारा निर्व्यसनी
कसलाही डाग नसलेला निष्कलंक
देवाला वाहण्याचा रंगीत दोरा व त्याला बांधलेली गुलाल इत्यादींची पुडी नाडापुडी 
काही उद्योग न करणारा निरोद्दगी 
घरादाराला पारखा झालेला निर्वासित
मूळचे सुंदर असलेले निसर्ग सुंदर
अक्षर ओळख नसलेला निरक्षर
ज्याचा काही अपराध नाही तो निरपराधी
कसलीच इच्छा नसलेला निरीच्छ 
ज्याला आधार नाही असा निराधार
ज्याला लाज नाही असा निर्लज्ज
ठराविक काळाने प्रसिद्ध होणारे नियतकालिक
कोणत्याही लाभाची अपेक्षा न करता काम करणारा निस्वार्थी
संसार पाश मोडून टाकणारा निसंग
देवाला वाहून काढलेली शेळी फुले निर्मल्य
सतत निंदा करणारा निंदक
देवास अर्पण करावयाचा पदार्थ नैवेद्य
प   
पाळी करायची यात्रा पदयात्रा
दुसऱ्यावर जिवंत असणारा परोपजीवी
पूर्वीपासून चालत आलेले परंपरागत
दुसऱ्यावर अवलंबून असलेला परावलंबी
एकमेकांवर अवलंबून असलेले परस्परावलंबी
रुग्णांची शुश्रुषा करणारी परिचारिका
सिनेमाची कथा लिहिणारा पटकथा लेखक
पायदळी तुडवलेले पददलीत 
अतिशय दुर्मिळ असा आलेला अनुकूल योग पर्वणी 
भोतलची जागा परिसर
परिपूर्ण झालेले असे परिपक्व
पंधरा दिवसांचा काळ पंधरवडा
झाडांची वाळलेली पाणी पालापाचोळा
कवितेच्या प्रत्येक कडव्याच्या शेवटी येणारा चरण पातुपद
शास्त्रीय ग्रंथातील विशेष अर्थाच्या शब्दांची सूची परिभाषा
पूजेच्या शेवटी दोन्ही हातांच्या ओंजळीत फुले घेऊन देवास वाहतात ती पुष्पांजली
गावातून किंवा शेतातून जाणारी लहान वाट पणांदी 
पाण्याची जागा पाणवठा
पश्चिमेकडील प्रदेशातील लोक पाश्चिमात्य
कठोर हृदय असणारी व्यक्ती पाषाण हृदय
फक्त माणसाला पाळी जाता येईल एवढी अरुंदवाट पाऊलवाट
दर पंधरवड्याने प्रसिद्ध होणारे पाक्षिक
रस्त्याने पायी जाणारा पादचारी
पाण्याखालून जाणारी बोट पाणबुडी
ज्याच्यातून आरपार दिसते असे पारदर्शक
घोडा बांधण्याची जाजागा पागा 
हिरव्या रंगाचे रत्न पाचू 
पशु मोफत पोचले जाण्याचे ठिकाण पांजरपोळ
शारीरिक श्रमावर उपजीविका न करणारा पांढरपेशा
अतिशय खोल मसलत करणारा पाताळयंत्री
अतिशय रोड अशी व्यक्ती पाप्याचे पितर
अतिशय वृद्ध झालेला मनुष्य पिकलेले पान
पापा पासून मुक्तता पापक्षालन
तिथी वार नक्षत्र योग यांची माहिती असलेली पुस्तिका पंचांग
पाच दिव्यांची आरती पंचारती
पाच प्रकारचे गोड पदार्थ पंचपक्वान्न
तंटा सोडविण्यासाठी उभय पक्षांनी मान्य केलेले लोक पंच
विस्थापित लोकांना पुन्हा सुस्तीर असे जीवन देणे पुनर्वसन
यज्ञविधी प्रमुख पुरोहित
जुन्या मतांना चिकटून राहणारा पुराणमतवादी
लोकांना पुढे नेणारा पुढारी
पुराच्या तडाख्यात सापडलेली लोक पूरग्रस्त
पूर्वेकडे तोंड उभा करून असलेला पूर्वाविमुख
पिण्याला योग्य असलेले द्रव पेय 
तराजूच्या तोलातला विषम पणा तो विषमता काढून टाकण्यासाठी एका पार्टीत घातलेले वजन पासंग
ज्याला आई-वडील नाहीत असा पोरका
स्वतः मोठा पंडित मानणारा पोंगा पंडित
पूर्वाकडील प्रदेशातील लोक पौर्वात्य 
मुलींच्या पाठीमागे चांदी इत्यादी धातूची केलेली महिरप प्रभावळ
जगाचा नाश होण्याची वेळ प्रलय काळ
नियम व शिस्त यानुसार इतरांवर नियंत्रण ठेवणारी व्यक्ती प्रतोद 
कार्यक्रम पाहण्यासाठी आलेले लोक प्रेक्षक
फ   
ऊस लावलेले वावर फड 
जगावर किंवा युद्धात विजय मिळवणारा फत्ते जंग 
शत्रूला सामील झालेला फितूर
ब   
आधाशीपणे तोंड भरून घेतलेला घास बताना
साहेब लोकांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था ठेवणारा नोकर बटलर
जिथे बस गाड्या थांबतात ते ठिकाण बस स्थानक
ऐकावयास न येणारा बहिरा
ज्याला खूप माहिती आहे असा बहुश्रुत
यज्ञातील आहुती बळी
निरनिराळी सोंग करून दाखविणारा बहुरूपी
बर्फाने आछाडलेला बर्फाच्छादित
लहान मुलांना समजेल असे बाळबोध
बारा जणांचा कारभार असलेला बार भाई
बळेच दाखवलेला अतिशय लांबचा संबंध बादरायण संबंध
ज्याला बांधण्यासाठी 12 बंद किंवा कसे लावले आहेत असा अंगात घालण्याचा एक कपडा बाराबंडी 
लहानपणी मिळालेले वळण अथवा शिक्षण बाळकडू
कसलीही तक्रार न करता बिन तक्रार
कोणालाही कळू न देता बिन बोभाट
ज्याचा मोबदला मिळत नाही असा खर्च बुडीत खर्च
वारसाचा हक्क नसलेला बेवारस
सर्व बाजूंनी पाण्याने वेढलले जमिनीचे क्षेत्र  बेट 
खांबा वाचून असलेला लहान तंबू बेचोबा 
डोंगर पोखरून आरपार गेलेला रस्ता बोगदा
तोंडावर हात मारीत काढलेला आवाज बोंब 
दैवी लिहिलेली कधी न कळणारी गोष्ट ब्रह्म लिखित
भ   
अतिशय मोठे प्रयत्न भगीरथ प्रयत्न 
निरर्थक गोष्टी भाकड कथा 
उत्कर्ष दाखविणाऱ्या तळ हातावरील रेषा भाग्यरेषा
भांडण ऊकरून काढणारी व्यक्ती भांडकुदळ
दारोदारी भिक्षा मागणारा भिक्षाार्थी
जमिनीखालून गेलेला रस्ता भुयार
जमिनीवर राहणारे प्राणी भूचर 
वाईट आई-बाबच्या पोटी चांगली संतती भांगेमध्ये तुळस
कोणताही भोला मनुष्य भोळासांब 
केवळ शोभेची आयते खाऊ मंडळी भोजन भाऊ
म   
नदीकाठची सुपीक जमीन मळी
माकडाचा खेळ करून दाखविणारा मदारी
मनाला आकर्षण घेणारे मनोवेधक
शिकारीसाठी बांधलेला उंच मळा मचान
मन मानेल इतके मनसोक्त
मोठेपणाची जबरदस्त इच्छा असणारा महत्त्वकांक्षी
दुसऱ्याच्या मनातले जाणणारा मनकवडा
विशेष करून असतो ते महाप्राण
मूर्तीच्या मस्तकावर दूध दही पाणी इत्यादींनी घातलेले स्नान महामस्तकाभिषेक 
मनाला वाटेल तसे मन:पूत 
अतिशय सुंदर पुरुष मदनाचा पुतळा
जहाबाज बायको महामाया
लांबत जाणारे काम मारुतीचे शेपूट
मनाला मोहून टाकणारे मनमोहक
पिकांच्या रक्षणासाठी केलेला मांडव माचा
लग्न झालेल्या मुलीच्या आई वडिलांचे घर माहेर
दर महिन्याला प्रसिद्ध होणारे मासिक
हत्तीला काबूत ठेवणारा माहूत 
अन्नाची भिक्षा मागणारा माधुकरी 
मोजकाच आहार घेणारा मित्ताहारी
भिन्न जातीतील वधू-वरांचे लग्न मिश्र विवाह
बाहेरून दिसायला घरी पण आतून लबाड मिश्किल
मूर्तीची पूजा करणारा मूर्तिपूजक
वेडे वाकडे शब्द मुक्ताफळे
हात मागे आवडून बांधणे मुस्क्या बांधणे
मुद्द्याला धरून असलेले मुद्देसूद
कमालीचा मूर्खपणा करणारा मूर्ख शिरोमणी
माशासारखे डोळे असणारी स्त्री मीनाक्षी
अगदी न बोलणारा मुखस्तंभ
ज्याला बोलता येत नाही असा मुका
मृत्यूवर जो विजय मिळवतो तो मृत्युंजय
हरणासारखे डोळे असणारी मृग नयना
म्हातारपणी बुद्धीला झालेली विकृती म्हातारचळ
जडबुद्धीहीन अजागळ मनुष्य मेष पात्र
मोठ्यांना दिलेले थाटामाटाचे जेवण मेजवानी
य   
नियमशास्त्राप्रमाणे यथाशास्त्र
महान कर्तुत्वाच्या व्यक्तीच्या जीवनावर लिहिलेले प्रदीर्घ काव्य यशोगाथा
आपापसातील कलह यादवी
योग्य वळण लावणारा युगपुरुष 
कोणतीही योजना असणार योजक 
चित्ताची तक्राता कशी करावी हे सांगणारे शास्त्र योगशास्त्र
इच्छा अशा लोक सोडून घेऊन ईश्वराची प्राप्ती करून घेण्याचा प्रयत्न करणारा योगी
र   
खाद्य पेयाचे नियमाने ठरलेले प्रमाण रतीब
कोणत्याही गोष्टीची आवड असलेला रसिक 
रत्नांनी मिळवलेले रत्नजडित
युद्धात शौर्य दाखविणारा रणशूर
सदा रडत बसणारा बेहिमती मनुष्य रडतराव
श्रीरामाचे वर्णन करणारे संस्कृत स्त्रोत राम ररक्षा
राजाने मान्यता दिलेली राजमान्य
अग्नि विझल्यानंतर राहणारी पांढरी भुकटी राख 
सूर्योदयापासून पहिले तीन तास राम प्रहर
अचूक गुणकारी असे रामबाण
राष्ट्राला पित्याप्रमाणे असणारी व्यक्ती राष्ट्रपिता
राजाच्या दरबारात नृत्य करणारी नर्तिका राज नर्तिका
हळूहळू एक सारखा पाऊस पडण्याचा प्रकार रिमझिम
कायमची आठवणीत राहणे रुजणे 
ल   
घोड्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्याच्या तोंडात घालावयाची साखळी लगाम 
लाखो रुपये जवळ असणारा लक्षाधीश
मळलेल्या कणकेचा लांबट गोल गोळा लाटा
दाग दागिने नसलेली गरीब स्त्री लंकेची पार्वती
लेख लिहिणारा लेखक
लिहिण्याची शैली लेखन शैली
लोकांच्या सत्तेखाली त्यांच्या संमतीने त्यांच्या हितासाठी असलेली राज्यपद्धती लोकशाही
लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालवलेले राज्य लोकशाही
सामान्य लोकांत न आढळणारा लोकोत्तर
लोकांचा आवडता  लोकप्रिय 
प्रारब्ध योगाने कंटाळा येण्याजोगी कार्य जे गळ्यात पडते ते लोढणे
लोखंडाचे काम करणारा कारागीर लोहार
व   
कोणत्याही विषयावर जो भाषण करतो तो वक्ता
कुणाला दाद न देणारा वस्ताद
वनात राहणारे प्राणी वनाच्या
वार वडिलांनी मिळवलेली संपत्ती वडिलोपार्जित
नवऱ्या मुलाची आई वरमाय 
भाषण करावयाची कला वक्तृत्व
नवऱ्या मुलाचे वडील वर बाप
वर्णन करावयाची हातोटी वर्णन शैली
ज्या स्तंभावर अपराध्याचा वध केला जातो वधस्तंभ
दुपारच्या जेवणानंतर ची झोप वामकुक्षी
एकाकी सुटणारे वारे वावटळ
वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारे वार्षिक
वृत्तपत्रासाठी बातम्या आणून देणारा वार्ताहर
वाट दाखविणारा वाटाड्या
खूप मोठा विस्तार असलेले विस्तीर्ण
संकटे दूर करणारा विघ्नहर्ता
संसाराचा त्याग केलेला विरक्त
जिचा पती मरण पावला आहे अशी स्त्री विधवा
दुसऱ्याच्या कामात अडचण आली म्हणून संतोष मानणारा  विघ्न संतोषी
कशाचीही आठवण न राहणारा विसर भोळा
पगार न घेता काम करणारा विनावेतन
विमान चालविणारा वैमानिक
भगवान विष्णूची उपासना करणारा वैष्णव
व्रताप्रमाणे काही नियम करणारा वृत्तस्त
व्यवहाराविषयी काहीही न कळणारा व्यवहार शून्य
व्याख्यान देणारा व्याख्याता
आचरणासाठी मुद्दाम केलेला एखादा नियम व्रत 
त्याला काय अभ्यास   
श   
कपटी व कृष्णकारस्थाने करणारा मनुष्य शकुनी मामा
शस्त्रे ठेवण्याचे ठिकाण शस्त्र भांडार
शंभर वर्ष आयुष्य जगलेला शतायुषी
मनाला लागून राहिलेले दुःख शल्य
दगडाचे केलेले सुंदर नक्षीकाम शिल्प
दगडातून मूर्ती घडविणारा शिल्पकार
पाषाणावर कोरलेला लेख शिलालेख
डाळ तांदूळ पठ इत्यादी स्वयंपाकाचे साहित्य  शिधा
प्रवासात बरोबर घेतलेले खाद्यपदार्थ शिदोरी
शेजाऱ्यांशी वागण्या बाबतचे कर्तव्य शेजार धर्म
विहिरीतून पाणी काढणे शेंदणे
भगवान शंकराची उपासना करणारा शैव 
चांदणे असलेला पंधरवाडा शुक्लपक्ष
चांगला धष्टपुष्ट पण बुद्धीने मंद असा मनुष्य शुंभ 
कुरूप स्त्री शुरपणखा
कायम टिकणारे शाश्वत
ऐकण्याचे काम करणारा श्रोता
श्रम करून जीवन जगणारे श्रमजीवी
श्रद्धा ठेवून वागणारा श्रद्धाळू
एखाद्या गोष्टीचा आरंभ श्री गणेशा
पितरांच्या स्मृतीचा दिवस व त्यादिवशी करण्याचे कार्य श्राद्ध
ष   
काम क्रोध लोभ मोहम्मद व मत्सर हे मनुष्याचे शत्रू समजले गेलेले सहा रस षडरिपू 
कटू आम्ल मधुर लवन तीख्त आणि कशाय हे अन्नाचे मुख्य सहा रस षडरस
स   
सत्याचा आग्रह धरणारा सत्याग्रही
समाजाची सेवा करणारा समाजसेवक
चांगल्या आचाराने विचाराने वागणारा सदाचारी
एकाच काळात असणारा समकालीन
सभेत धीटपणाने भाषण करणारा समाधिठ
गोल आकाराचा घडवलेला एक दगड सहान 
अनेक पदार्थांच्या समुदायात जे उत्तम असेल ते सरस
सोन्या चांदीचा व्यापार करणारा सराफ
काहीही सहन करण्याचे सामर्थ्य सहनशीलता
नेहमी खरे बोलणारा सत्यवचने
जुन्या रुढींचे पालन करणारा सनातनी
जिचा पती जिवंत आहे अशी सधवा 
आत्मिक बळाने अन्यायाशी झगडून मरणाची ही भीती न बाळगता सत्याची बाजू सांभाळणे सत्याग्रह
सा रे ग म प ध नी संगीतातले सात स्वर सप्तसूर
मोफत जेवण मिळण्याचे ठिकाण सदावर्त
स्थापन करणारा संस्थापक
दोन नद्या एकत्र मिळण्याचे ठिकाण संगम
भिन्न जातीच्या एकत्रीकरणाने नवीन जात निर्माण करणे शंकर
बंदुकीला जोडलेले लांब धारदार पाते संगीन 
शोध लावणारा संशोधक
दर आठवड्याने प्रसिद्ध होणारे साप्ताहिक
लिहिता वाचता येणारा साक्षर
हत्तींना काठीने मारून पळविण्याच्या जुन्या राजे राजवाड्यांचा एक खेळ साठ मारी
चांगल्या गोष्टींचा ठसा संस्कार
एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठी केलेला प्रयत्न अभ्यास साधना
पैसे कर्जाऊ देणारा सावकार
सर्व समाजात समता नांदावी असे म्हणणारा साम्यवादी
सांगेल तेवढेच काम करणारा सांगकाम्या
आश्चर्यकारक दैवी शक्ती सिद्धी
राजाचे बसावयाचे आसन सिंहासन
ज्याच्या हातात सुदर्शन चक्र आहे असा सुदर्शन चक्रधारी
सहज साध्य होणारे सुसाध्य
जीव धोक्यात घालण्यासारखे काम सुळावरची पोळी
दुःखाने सोडलेला लांब श्वास सुस्कार
एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूबद्दल पाळला जाणारा काही दिवसांचा शोक सुतक
चांगला विचार सुविचार
बोधपर वचन सुभाषित
मोजक्या शब्दात सांगितलेले तत्व सूत्र
सूर्य उगवल्यानंतर अंथरुणातून उठवणारा सूर्यवंशी
सेवा करणारा सेवक
सोन्या चांदीचे अलंकार करणारा सोनार
स्वतःच्या इच्छेप्रमाणे स्वरपणे वागणारा स्वच्छंदी
स्वतःच्या मनानेच दुसऱ्याच्या सेवेचे काम करणारा स्वयंसेवक
स्वतःशी केलेले भाषण स्वगत
आपल्याच देशात तयार झालेले स्वदेशी
स्वतः कष्ट करून मिळवलेले स्वकष्टार्जित 
स्वाभिमान बाळगणारा स्वाभिमानी
स्वतःचा फायदा पाहणारा स्वार्थी
स्वतःबद्दल मुळीच अभिमान नसणारा स्वाभिमान शून्य
स्वतःचे काम स्वतः करणारा स्वावलंबी
स्वतःच्या फायद्याचा विचार करणारा स्वार्थ पारायण
स्वतःच्या हिताचा त्याग करणारा स्वार्थ त्यागी 
मृत्यू पावलेल्या माणसाची आठवण म्हणून केलेली गोष्ट स्मारक
धन्याशी निष्ठेने वागणारा स्वामिनिष्ठ
कोणत्याही परिस्थितीत ज्याची बुद्धी स्थिर राहते तो स्थितप्रज्ञ
तात्कालीक विरक्ती स्मशान वैराग्य
मनाला वाटेल तसे वागणारा स्व संपादित
स्वदेशाचा अभिमान असणारा स्वदेशाभिमानी
एक लाभदर्शक धार्मिक प्रतीक स्वास्तिक
शरीरातील तंतुयुक्त भाग स्नायू
यज्ञात बळी किंवा अवती देण्याच्या वेळी मनायचा शब्द स्वाहा
ह   
दुसऱ्याच्या म्हणण्यावर लगेच विश्वास ठेवणारा हलक्या कानाचा
कोणतेही काम करणारा हरकाम्या
सर्व उद्योगधंद्यांचा कसबी हुरहुन्नरी
एकादशीच्या दिवशी भजन कीर्तनात करावयाचे जागरण हरी जागर
जिचे भाग्य नाहीसे झाले आहेत अशी हतभागी
बैलपोळावेत म्हणून तोंडाने केलेला आवाज हैक 
सहज होऊ शकणारी गोष्ट हातचा मळ
विशिष्ट देण्यासाठी प्राणत्या केलेली व्यक्ती हुतात्मा
शत्रू कडील बातमी काढून आणणारा हेर
हृदयाला जाऊन भिडणारे हृदय यांगम 
अंतकरणाला पाझर फोडणारे हृदय द्रावक
स्वतःला अक्कल नसून दुसऱ्याला हो ला हो करणारा होयबा 
थोडीशी दलाली घेऊन मालाची ने आन करणारा दलाल हुंडेकरी
क्ष  
क्षणात नष्ट होणारे क्षणभंगुर
क्षमा करण्याची वृत्ती असणारा क्षमाशील
आकाश जमिनीला टेकलेले दिसते ती मर्यादा क्षितिज
ज्ञ  
ज्ञान मिळवण्यासाठी केलेली उपासना ज्ञानोपासना
पुष्कळ ज्ञान असणारा ज्ञानी
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   
   

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *