:
स्वयंसहाय्यता बचत गट ही कोणतीही योजना अथवा प्रकल्प नसून महिलांना व युवकांना संघटित करण्यासाठी, त्यांना विकासात्मक स्वरूपाचे शिक्षण देण्यासाठीचे माध्यम होय.
सर्वसाधारण 15-20 लोकांचा/महिलांचा अनौपचारिक समूह म्हणजे स्वयंसहाय्यता बचत गट.
एकाच कारणासाठी गटातील लोकांच्या उन्नती, विकास व फायद्यासाठी एकत्रित आलेला समूह म्हणजे बचत गट होय.
प्रत्येक सभासद समान रक्कम, ठराविक कालावधीत बचत म्हणून एकत्र करतात व त्याचा उपयोग सभासदांच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी लोकशाही मार्गाने करतात.
हेही वाचा: जाणुन घ्या : काय आहे मुद्रा लोन योजना? कोण कोण या योजनेचा लाभ घेऊ शकतो?
:
- स्वयंसहाययता बचत गटांसाठी कर्ज मर्यादा:
आरबीआयने ( RBI) ने परिपत्रकात असे म्हटलेले आहे की, बचत गटांसाठी 10 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी कोणतीही हमी लागणार नाही आणि त्यांच्याकडून कोणतेही मार्जिन आकारले जाणार नाही. याशिवाय कर्ज मंजूर करताना बचत गटांना कोणतीही ठेव देखील मागितली जाणार नाही.
DAY-NRLM अंतर्गत महिला स्वयंसहाय्यता बचत गटांसाठी हमीमुक्त कर्जाची मर्यादा 10 लाख रुपयांवरून 20 लाख रुपये केली आहे. डीएवाय-एनआरएलएम (DAY-NRLM) ही गरीब, विशेषतः महिलांसाठी मजबूत संस्था उभारून गरिबी निर्मूलनाला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारची एक प्रमुख योजना आहे.
महिला बचत गटांना राष्ट्रीयकृत तसेच सहकारी बँकाकडून कर्जपुरवठा केला जाणार आहे.
या कर्जाचा वापर करून ग्रामीण भागातील महिलांना स्वतःचा व्यवसाय करुन स्वयंपूर्ण होता यावे म्हणून ग्रामीण महिला बचत गट यांना बँकेकडून पतपुरवठा केला जाणार आहे.
ज्या महिला बचत गटांनी, बचत गटातील महिलांना स्वयंरोजगार मिळावा या हेतूने व्यवसाय सुरू केला आहे, अशा गटांना प्रोत्साहन देण्याकरता या निर्णयाचा फायदा होईल.
- असा करा अर्ज: