रशिया आणि यूक्रेन युद्ध ( Russia Ukrain war):
यूक्रेन आणि रशिया यांच्यात युद्धाला सुरुवात झाली आहे. यूक्रेनची राजधानी कीवसह विविध ठिकाणी स्फोटाचे आवाज ऐकू येऊ लागलेत. कीवच्या क्रूज आणि बॅलेस्टिकवर मिसाइलनं हल्ला (Missile attack on kruj and ballistic) करण्यात आल्याचं समोर येत आहे. कीवशिवाय इतर शहरांमध्येही स्फोट झाले आहेत. गुरुवारी सकाळी Donetsk मध्ये 5 स्फोट( Explosion) झाले. डोनेस्तकला रशियानं स्वतंत्र्य देशासाठी मान्यता दिली होती.
युक्रेनने 18 ते 60 या वयोगटातील नागरिकांना देश सोडून जाण्यास मनाई केली आहे. देशात मार्शल लॉ लागू करण्यात आला असून सर्वांना त्याचे पालन करण्यास सांगितले आहे.
युक्रेनमध्ये गेल्या काही तासांपासून स्फोटांचे आवाज येऊ लागले असून, गोळीबारात एका सैनिकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे तणाव आणखी वाढला आहे. युक्रेनच्या लष्कराने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, डॉनबास परिसरात लढाई सुरू आहे.
अमेरिकेने दिलेल्या माहितीनुसार रशियाने युक्रेनवर 160 मिसाईल सोडले. तर रशियाच्या दाव्यानुसार पहिल्या दिवशी 203 मिसाईल टाकले.
पाहा किती जणांचा बळी गेला?
:
रशियाने युक्रेनवर हल्ला ( Russia invades Ukraine) करून आता 24 तास उलटले आहेत. या युद्धात आतापर्यंत 137 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा युक्रेनने केलाय. तर 316 जण जखमी झाले आहे. मृतांमध्ये सामान्य नागरिक आणि जवानांचा देखील समावेश आहे. राजधानी कीव्हसह युक्रेनच्या सर्व भागातून नागरिक देश सोडून जात आहेत.
रशियाने सुरू केलेल्या या युद्धात सामान्य नागरीक होरपळून निघत आहे.युक्रेनची राजधानी कीववरही (kyiv capital of Ukrain ) रशियन फौजांनी ( Russian Army) हल्ले सुरू केले आहेत. रशियाच्या हल्ल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओ सायकल चालवणाऱ्या एका व्यक्तीजवळ बॉम्ब ( Bomb) पडत असल्याचे सीसीटीव्हीत दिसून आले. या हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
:
रशियाचे एअरक्राफ्ट एंटनोव 26 हे युक्रेनच्या वोरोनेज ( Ukrain oronej) भागात कोसळले. हे एअरक्राफ्ट ( Aircraft) सामुग्री घेऊन जात होते. यात एअरक्राफ्टच्या क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला. रशियाने याबाबतची संख्या सांगितली नाही.
युक्रेनच्या स्नेक आयर्लंडवर रशियाने ताबा मिळवला आहे. युक्रेनच्या स्टेट बॉर्डर गार्ड सर्व्हिसने ( Ukraine state border guard service) या वृत्ताला दुजोरा दिलाय. हवाई हल्ल्यात येथील इमारती कोसळल्या आहेत.