:
सोमवारी 8 ऑगस्ट ला भारतीय संघाची घोषणा करण्यात आली.
आशिया खंडातील (Continent of Asia) सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा (Cricket Match) म्हणजे आशिया कप (Asia Cup). येत्या 27 ऑगस्टपासून आशिया चषक क्रिकेट स्पर्धे ( Asia Cup Cricket Tournament) होत आहेत.
रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघ ( Indian team) या स्पर्धेत उतरणार आहे.. के.एल. राहुल ( K.L.Rahul) याच्यावर संघाच्या उपकर्णधार पदाची (Deputy Captain) जबाबदारी देण्यात आलीय.
काही दिवसांपूर्वीच या वर्षीच्या आशिया कप स्पर्धेचे वेळापत्रक (Timetable) जाहीर झालं होतं. त्यानंतर आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (Board of Control for Cricket in India), अर्थात ‘बीसीसीआय’ने (BCCI) या स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर केल.
भारतीय संघ यादी (Indian team list) जाहीर :
रोहित शर्मा (कर्णधार) (Rohit Sharma (Captain)), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, रवीचंद्रन आश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, आवेश खान.
सगळी जबाबदारी आता भुवनेश्वर कुमारच (Bhuvneshwar Kumar) असेल. या क्रिकेट पटुंची निवड करण्यात आली आहे.
:
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचे वेळापत्रक (Asia Cup Cricket Tournament Schedule) :
सामना, दिवस, दिनांक, संघ, ग्रुप, ठिकाण (Match, Day, Date, Team, Group, Venue) :
1 शनिवार 27 ऑगस्ट अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका बी दुबई
2 रविवार 28 ऑगस्ट भारत विरुद्ध पाकिस्तान ए दुबई
3 मंगळवार 30 ऑगस्ट बांग्लादेश विरुद्ध अफगाणिस्तान बी शारजाह
4 बुधवार 31 ऑगस्ट भारत विरुद्ध पात्र संघ ए दुबई
5 गुरुवार 1 सप्टेंबर श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश बी दुबई
6 शुक्रवार 2 सप्टेंबर पाकिस्तान विरुद्ध पात्र संघ ए शारजाह
7 शनिवार 3 सप्टेंबर ग्रुप बी पात्र 1 विरुद्ध ग्रुप बी पात्र 2 सुपर 4 शारजाह
8 रविवार 4 सप्टेंबर ग्रुप ए पात्र 1 विरुद्ध ग्रुप ए पात्र 2 सुपर 4 दुबई
9 मंगळवार 6 सप्टेंबर ग्रुप ए पात्र 1 विरुद्ध ग्रुप बी पात्र 1 सुपर 4 दुबई
10 बुधवार 7 सप्टेंबर ग्रुप ए पात्र 2 विरुद्ध ग्रुप बी पात्र 2 सुपर 4 दुबई
11 गुरुवार 8 सप्टेंबर ग्रुप ए पात्र 1 विरुद्ध ग्रुप बी पात्र 2 सुपर 4 दुबई
12 शुक्रवार 9 सप्टेंबर ग्रुप बी पात्र 1 विरुद्ध ग्रुप ए पात्र 2 सुपर 4 दुबई
13 रविवार 11 सप्टेंबर सुपर 4 पात्र 1 विरुद्ध सुपर 4 पात्र 2
यादीत स्थान नसलेले क्रिकेटपटू (Unlisted Cricketers) :
हे पण वाचा: क्रिकेट, भारताचे एकाच वेळी दोन सामने आहेत, कसे बघनार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
:
भारताचा अनुभवी गोलंदाज जसप्रीत बुमराह (Bowler Jasprit Bumrah) दुखापतीमुळे या स्पर्धेतून बाहेर आहे. माजी कॅप्टन विराट कोहलीचे (Former captain Virat Kohli) संघात पुनरागमन झाले असले, तरी अनेक वरिष्ठ खेळाडूंना या स्पर्धेसाठी डच्चू देण्यात आलाय.. बुमराहच्या गैरहजेरीत मोहम्मद शमीसारखा अनुभवी गोलंदाजही संघात नाही.
गेल्या काही दिवसांपासून सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) चांगल्या फाॅर्ममध्ये असतानाही, त्यालाही संघात स्थान मिळालेलं नाही. शिवाय ईशान किशन, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर या युवांनाही संधी मिळालेली नाही.