भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का. उजव्या गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे रवींद्र जडेजा आशिया चषक २०२२ च्या उर्वरित सामन्यांमधून बाहेर पडला आहे. अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीने रवींद्र जडेजाच्या जागी अक्षर पटेलची निवड केली आहे. “रवींद्र जडेजाला उजव्या गुडघ्याला दुखापत झाली असून तो स्पर्धेतून बाहेर पडला आहे. तो सध्या बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे, असे बीसीसीआयने शुक्रवारी एका निवेदनात म्हटले आहे.
जडेजाच्या दुखापतीबद्दल बीसीसीआयने तपशील दिलेला नाही परंतु बुधवारी हाँगकाँग विरुद्ध भारताच्या अ गटातील शेवटच्या सामन्यात अष्टपैलू खेळाडूच्या गुडघ्याला दुखापत झाली असावी असे दिसते.
आशिया चषक संघात दुखापतग्रस्त रवींद्र जडेजाच्या जागी अक्षर पटेलचा समावेश करण्यात आला आहे.