ग्राहकांना स्वस्तात सोने खरेदी करता यावे, यासाठी केंद्र सरकारने नोव्हेंबर 2015 मध्ये एक योजना सुरु केली होती. ‘सॉवरेन गोल्ड बाँड’ योजना असं त्याचं नाव..!! ‘आरबीआय’मार्फत केंद्र सरकार दरवर्षी ही योजना राबवत असते.
गेल्या काही दिवसांत सोन्यातील गुंतवणूक वाढली आहे. परंतु आता या योजेअंतर्गत सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
जाणून घ्या, कशी करायची गुंतवणूक…
हेही वाचा: https://updatesa2z.com/2022/02/kalyankari-yojana-updates.html
‘सॉव्हरेन गोल्ड बाँड’ (Sovereign Gold Bond) योजनेत प्रत्येक व्यक्तीला एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त 4 किलो, तर कमीत कमी 1 ग्रॅम ( gram) ‘गोल्ड बॉण्ड’ खरेदी करता येतात. तसेच, ट्रस्ट (trust) किंवा तत्सम संस्थांना सूट देण्यात आली असून, त्यांना 20 किलोपर्यंत ‘गोल्ड बॉण्ड’ खरेदी करता येतात. निवासी व्यक्ती, हिंदू अविभक्त कुटुंबे (HUF), ट्रस्ट, विद्यापीठे, धर्मादाय संस्थांना (Trust, Universities, charities) हे खरेदी करता येतात.
तसेच ‘गोल्ड बॉण्ड्स’साठी अर्ज (Application) करणार्या, तसेच ऑनलाईन पेमेंट करणार्यांना प्रति ग्रॅममागे 50 रुपये सूट दिली जाते.. गुंतवणूकदारांना निश्चित किंमतीवर सहामाही आधारावर वार्षिक 2.5 टक्के व्याज दिले जाते. परताव्याबद्दल बोलायचे झाल्यास, गेल्या वर्षात ‘गोल्ड बाॅंड’मधून गुंतवणूकदारांना 7.37 टक्के नफा मिळालाय आहे.
हेही वाचा: https://updatesa2z.com/2022/08/pm-samajra-swasth-arogya-yojana.html
‘सॉवरेन गोल्ड बाँड’ (Sovereign Gold Bond) योजना सीरिज :
सोन्यातील गुंतवणूक वाढावी, त्यात पारदर्शकता यावी, यासाठी केंद्र सरकार वेळोवेळी ‘सॉवरेन गोल्ड बाँड’ (Sovereign Gold Bond) योजनेची सीरिज जारी करीत असते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियातर्फे (RBI) यंदाची या योजनेची पहिली सीरिज 20 ते 24 जून दरम्यान झाली होती. त्यानंतर आता ‘आरबीआय’ने योजनेच्या दुसऱ्या टप्प्याच्या तारखा जाहीर केल्या आहेत.
आरबीआय’च्या (RBI) माहितीनुसार, या वर्षातली या योजनेची दुसरी मालिका 22 ऑगस्टपासून ( August) सुरु होणार असून, ती 26 ऑगस्टपर्यंत चालणार आहे.. मात्र, या योजनेतील ‘गोल्ड बाॅंड’ (Gold Bond) च्या किंमती अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. लवकरच या किंमती जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.