भरती बाबत मोठा निर्णय पोलिस महासंचालक यांच्या मार्फत होणार भरती

भरती बाबत मोठा निर्णय

पोलिस महासंचालक यांच्या मार्फत होणार भरती

 

 

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनानंतर 78 हजार 257 पदांची भरती करण्याचा आराखडा शिंदे-फडणवीस सरकारने तयार केला आहे. यासंदर्भात सोमवारी (२९) सामान्य प्रशासन विभागाची बैठक झाली. त्यात गृहविभागाच्या सात हजार २३१ पदांचाही समावेश असून, विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, साधारणपणे १५ सप्टेंबरपासून ही भरती प्रक्रिया सुरू होणार आहे.

 

 

राज्य सरकारच्या 29 प्रमुख विभागांमध्ये 152 लाख पदे रिक्त आहेत. येत्या दोन महिन्यांत महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 100 टक्के पदांची भरती होणार आहे.

त्यानुसार संबंधित विभागाने पंधरा दिवसांत मागणी पत्र आयोगाला पाठवावे, असे आदेश सामान्य प्रशासन विभागाने दिले आहेत. सुमारे 11 हजार 26 पदांवर भरती होणार आहे.

हेही वाचा: शेतकऱ्यांसाठी खूशखबर! संत्र्यासह इतर फळं-भाज्याही थेट परदेशात जाणार; केंद्रीय मंत्री गडकरींनी सांगितला प्लॅन

तर दुसरीकडे शासनाच्या महत्त्वाच्या खात्यांमध्ये रिक्त पदांची संख्या वाढल्याने प्रशासनावरील ताण वाढला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पोलिसांची संख्या कमी असल्याने पोलिस यंत्रणेवरही ताण वाढला आहे.

या पार्श्वभूमीवर येत्या दीड ते दोन महिन्यात सरकारकडून ६७ हजार २३१ पदांची भरती केली जाणार असल्याचेही वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी ऐन पावसाळ्यात विधानपरिषदेत बोलताना राज्यातील शासकीय विभागातील रिक्त पदांची माहिती देताना राज्य सरकार अमृतोत्सवानिमित्त ७५ हजार पदांची भरती करणार असल्याचे स्पष्ट केले होते. स्वातंत्र्य

त्याचवेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सात हजार २३१ पोलीस पदांवर लवकरच भरती केली जाईल, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार मेगा भरतीचे नियोजन युद्धपातळीवर सुरू झाले आहे.

हेही वाचा: जात प्रमाणपत्र म्हणजे काय? घर बसल्या काढा प्रमाणपत्र

 

पोलिस भरती प्रक्रियेमध्ये बदल

 

आधी लेखी परीक्षा घेऊन मग शारीरिक चाचणी घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता परंतु आता हा निर्णय बदलण्यात आला आहे. आधी शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे.

हेही वाचा: PM PRANAM Yojana : काय आहे पीएम प्रणाम योजना? शेतकऱ्यांना कसा होणार फायदा? जाणून घ्या..

भरती प्रक्रियेमध्ये पारदर्शकता यावी म्हणून भरती प्रक्रिया कोणत्या खासगी कंपनीद्वारे न घेता. पोलिस महासंचालक यांच्या मार्फत होणार आहे. यामुळे भरती सहज आणि सोपी होणार आहे. आणि गैरव्यवहार टळणार आहे.

 

तसेच मुंबईतील २० मैदाने भरती साठी तयार करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. या मैदानावर CCTV यंत्रणा बसविण्यात येणार आहे यामुळे गैरव्यवहाराला आला बसणार आहे. या निर्णयामुळे उमेदवारांना नक्कीच फायदा होईल आणि पात्र उमेदवाराची निवड होईल.

Leave a Comment

updates a2z