नमस्ते मित्र बांधवांनो , प्रत्येक तरुण तरुणींचे पुणे मुंबई सारख्या शहरात नोकरी करण्याचे स्वप्न असते. खरं तर असे स्वप्न पाहिले पण पाहिजेत या शिवाय आपली प्रगती होत नाही मात्र योग्य शिक्षणाचा अभाव, मार्गदर्शन नसणे यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरातील नोकऱ्या संदर्भात जास्त माहिती मिळत नाही.पण तुम्ही देखील शहरात नोकरीचे स्वप्न पाहत असाल तर ही माहिती एकदा वाचलीच पाहिजे.
शहरांमध्ये लाखो प्रकारच्या विविध कंपनी मध्ये नोकऱ्या उपलब्ध आहेत.अगदी सेक्युरिटी गार्ड पासून,कॉल सेंटर ते आयटी कंपनी मध्ये नोकरी असे विविध प्रकार या आहेत. तर आपण पाहू या साठी आपल्या कडे काय काय गुण अपेक्षित आहेत.
1)मुळात शहरात नोकरी म्हणली की बऱ्या पैकी इंग्लिश बोलता आली पाहिजे आणि कळाली पण पाहिजे म्हणुन इंग्लिश मध्ये सुधारणा करा आणि सतत प्रॅक्टिस पण करा.
2)सगळी दुनिया आता कॉम्प्युटर वर काम करते ,त्यामुळे कॉम्प्युटर चे ज्ञान असणे गरजेचे आहे.कॉम्प्युटर चे छोटे मोठे कोर्सेस करत रहा आणि सोबत कॉम्प्युटर टायपिंग पण नक्की करून घ्या.
3)कंपनीत नोकरी साठी अनेक ठिकाणी किमान कोणत्याही शाखेचा पदवीधर लागतो म्हणून पदवी पूर्ण होई पर्यंत शिक्षण घेत रहा.दहावी बारावी वर देखील नोकऱ्या असतात पण पेमेंट कमी,जरा कमी दर्जाचे काम असा प्रकार होतो.
यात तुम्हाला तीन गोष्टी समजल्या असतील कि, इंग्लिश, कॉम्प्युटर आणि पदवी पर्यंत शिक्षण गरजेचे आहे.
आता पाहू कागदपत्रे काय काय तयार हवेत.
1)तुमचे पॅन कार्ड पण खूप गरजेचे आहे म्हणून काढले नसेल तर काढून घ्या.
2) तुमचे आधार कार्ड कायम गरजेचे आहे.
3)सोबत काही छान असे पासपोर्ट फोटो काढून घ्या आणि घेतलेले शिक्षण आणि कुठे आगोदर छोटी मोठी नोकरी केलेली असेल तर याचे अनुभव सहित तुमचा रिझुम -बायोडाटा तयार करून घ्या.
वरील प्रमाणे कागदपत्रे कोणत्याही नोकरी साठी आवश्यक आहेत.
नोकऱ्या लाखो उपलब्ध आहेत पण त्या नोकऱ्यांसाठी आपण लायक होयला हवे. म्हणून वर दिलेली माहिती नुसार तुमची तयारी करून घ्या, मगच शहरात जा तुम्हाला कुठे ना कुठे नक्कीच नोकरी मिळेल फक्त विश्वास ठेवा आणि प्रयत्न करत रहा.