15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मराठी भाषण independence day fifteen August Speech in Marathi
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व माझे गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय बाल मित्रांनो. तुम्हाला सर्वांना स्वतंत्र दिनाच्या खुप खुप शुभेच्छा. मी तुम्हाला आज स्वातंत्र्य दिन याविषयी दोन शब्द बोलणार आहे. स्वतंत्र दिन सर्वच भारतीयांसाठी महत्त्वाचा उत्सव आहे. या दिवशी सर्व भारतीय संघर्ष आणि विद्रोह करून स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या महान स्वतंत्र सैनिक आणि नेत्याची आठवण करतात. भारताचा स्वतंत्र दिवस फक्त ब्रिटिश शासना पासून देशाला स्वातंत्र्याची आठवण करून देत नाही, तर हा दिवस देशाची शक्ती देखील जगासमोर दाखवतो. आणि संपूर्ण देशाची एकता जगासमोर मांडतो.
जवळपास 200 वर्षापर्यंत भारतावर राज्य केल्यानंतर 15 ऑगस्ट 1947 ला आपला देश स्वतंत्र झाला. इंग्रजांचे अत्याचार सोसून कितीतरी स्वतंत्र सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. तेव्हा कुठे आपण स्वतंत्र झालो. आजच्या या शुभ दिवशी आपल्या देशाचे पंतप्रधान देशाची राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर देशाचा ध्वज फडकावून भाषण देतात. या दिवशी स्वतंत्र लढ्यात सामील नेत्यांना श्रद्धांजली वाहिली जाते.
आपला देश दिन प्रतिदिन पुढे जात आहे. व लवकरच आपण एक महासत्ता म्हणून जगासमोर उभे राहू. भारताच्या स्वातंत्र्याच्या चार वर्षानंतर आपल्या देशाने राज्यघटना लागू केली. आपल्या राज्यघटनेने देशाला अधिक सक्षम केले. आज आपण जगातील सर्वात मोठी विविधता असलेली लोकशाही आहोत. कृषी क्षेत्रापासून तर औद्योगिकी करणापर्यन्त आपण जगातील मोजक्या प्रगत देशाच्या पंक्तीत आहोत. व सतत आपला देश प्रगतीपथावर पुढे जात आहे.
ज्या पद्धतीने आपण आज देशाच्या महान नेत्यांना आठवण करतो, त्याच पद्धतीने आपण आपल्या महान सैनिकांना न विसरता त्यांनाही धन्यवाद द्यायला हवे. आपल्या देशाचे महान सैनिक दिवस रात्र सीमेवर उभी राहतात. त्यांचे बलिदान लक्षात घेऊन आपण एकजूटतेने देशासाठी कार्य करायला हवे.
आपल्या देशासाठी बलिदान देणाऱ्या सर्व शूरवीरांना माझे विनम्र अभिवादन एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो जय हिंद जय भारत वंदे मातरम !
धन्यवाद !